Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत
Urmila Kothare अपघाताच्या १३ दिवसांनी उर्मिला कोठारेने शेअर केली पहिलीच पोस्ट
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या (Urmila Kothare) गाडीला मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आणि उर्मिला आणि तिच्या ड्रायव्हरला मार देखील बसला होता. ही घटना २८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईमध्ये घडली. अपघातानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र उर्मिला किंवा तिच्या नातेवाइकांनी कोणीही मीडियासमोर येत काहीही भाष्य केले नव्हते. (Urmila Kothare)
आज या अपघाताच्या १३ दिवसांनी अभिनेत्री उर्मिला कानेटकर – कोठारेने सोशल मीडिया पोस्टवर शेअर करत या अपघाताची सर्व माहिती सर्वांना दिली आहे. यासोबतच तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती, तिची मुलगी जिजा आणि वडील गणपती बाप्पासमोर नमस्कार करताना दिसत आहेत. उर्मिलाने या पोस्टमध्ये तिला देखील मार लागल्याचे सांगितले आहे. (Urmila Kothare News)
उर्मिलाने तिच्यापोस्टमध्ये लिहिले, “२८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास माझ्या गाडीचा मोठा, गंभीर अपघात झाला. पोईसर मेट्रो स्टेशनजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर माझा हा अपघात झाला. तिथे मेट्रोचे देखील काम सुरू होते आणि मोठी यंत्रसामग्री, वाहनं जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर पार्क केलेले होते. माझा ड्राइव्हर माझी गाडी चालवत होता. अचानक वळण आले आणि याच वळणामुळे आमचा हा दुर्दैवी अपघात झाला. (urmila kothare first post after accident)
या अपघातात मी आणि माझा ड्राइव्हर देखील गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने आम्हाला लगेचच मदत मिळाली आणि रुग्णालयात नेण्यात आले. मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे मी आभार मानते. त्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मी आता माझ्या घरी आहे. (Entertainment mix masala)
मला पाठीला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अजूनही मी यातून बरी झालेली नाही. डॉक्टरांनी मला किमान चार आठवडे तरी कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. बाप्पाचे आभार. हे आणखी वाईट घडू शकले असते. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार, ज्यांनी काळजी केली आणि माझ्यासाठी, मी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली. (Bollywood Masala)
======
हे देखील वाचा : Hrithik Roshan ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशन झाला ५१ वर्षाचा
======
हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल. हे विधान पोलिसांच्या एफआयआरनुसार आहे.” उर्मिलाच्या या पोस्टवर मनोरंजविश्वातील कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. (Social News)
दरम्यान उर्मिलाच्या झालेल्या या अपघातामध्ये सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला. तर उर्मिला आणि तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते.