Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Vishakha Subhedar : वि(वेक)नोद संपला! रणवीर अलाहाबादिया वादावर विशाखा सुभेदारची प्रतिक्रिया
मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावरील स्टार मुलाखतकार असलेल्या रणवीर अलाहाबादिया (ranveer allahbadia) कमालीचा चर्चेत आला आहे. त्याने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांच्या खासगी जीवनाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे तो सतत टीकेचा सामना करत आहे. अतिशय प्रसिद्ध युट्यूबर म्हणून रणवीर अलाहाबादिया ओळखला जातो. आतापर्यंत रणवीरने त्याच्या चॅनेलवर अनेक मोठमोठ्या आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत. (Vishakha Subhedar)
मात्र रणवीरने केलेल्या विवादित वक्तव्यामुळे त्याने जेवढी लोकप्रियता कमावली तेवढी सर्व गमावली आहे. त्याने आणि इतर लोकांनी त्यांच्या या चुकीवर माफी मागितली आहे. (ranveer allahbadia controversy) मात्र तरीही तो आणि दुसरे सोशल मीडिया स्टार ट्रोल होताना दिसत आहे. रणवीरवर जिथे सर्वच नेटिझन्स टीका करत असताना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी देखील त्याला खडेबोल सुनावले आहे. अशातच मराठी मनोरंजनविश्वातील कलाकार देखील त्याच्या चुकीच्या वक्तव्यावर मत मांडताना दिसत आहे. विनोदी अभिनेत्री असलेल्या विशाखा सुभेदाराने देखील यावर तिचे मत मांडले आहे. (Vishakha Subhedar Post)
विशाखाने याबद्दल तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, “वि(वेक)नोद संपला.
माणसं दारू पितात. ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक. पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला, तर आपण काय म्हणतो; तो दारूवर नाही, तर दारू त्याच्यावर स्वार झालीय. आजच्या सो कॉल्ड तरूण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेला आहे, की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झालाय. त्यामुळे झालंय असं, की त्याने आपला विवेक गहाण ठेवलाय, हेही त्याला कळत नाही. सद्सदविवेकबुध्दी नावाची काही गोष्ट असते, हे तो पूर्ण विसरून गेला आहे. झटपट प्रसिध्दीसाठी…(Entertainment Masala News)

सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागलाय. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं. अगदी ताजं उदाहरण म्हणजे युट्यूबवरचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी नीचतम पातळी असेल, तर रणवीर अलाहाबादीया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आई वडिलांच्या प्रायव्हसी संदर्भात प्रश्न विचारून विनोद करणं, हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरंतर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादीयाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादीयापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं.(Marathi Top Stories)
महाराष्ट्रात दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या व्दयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरून दाद दिली. पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. चि. वि. जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही.(Marathi Latest News)
परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादीयालाही आईवडील असतील. बहीण असेल. याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना येनकेन प्रकारेण पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघण्याची गरज आहे. आता स्टॅण्डअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं.”
=============
हे देखील वाचा : चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल
Sharvari : अमृतसरमध्ये शर्वरीची अटारी-वाघा सीमेला खास भेट!
=============
विशाखा सुभेदारने तिच्या कमालीच्या विनोदाच्या शैलीने मोठा नावलौकिक कमावला आहे. मराठीमध्ये एक प्रगल्भ विनोदी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. विनोदाच्या अनेक भूमिकांमधून तिने तिच्यात असणाऱ्या विनोदाची समज आणि विनोदाचे अचूक टायमिंग सिद्ध केले आहे. दरम्यान विशाखा सुभेदारबद्दल बोलायचं झालं तर तिने विनोदी भूमिकांसोबतच खलनायकी, भावनिक सर्वच प्रकारच्या भूमिका प्रभावी पद्धतीने निभावल्या आहेत.