Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prajakta Koli : Mostly Sane होणार नेपाळी कुटुंबाची सून

 Prajakta Koli : Mostly Sane होणार नेपाळी कुटुंबाची सून
कलाकृती तडका

Prajakta Koli : Mostly Sane होणार नेपाळी कुटुंबाची सून

by रसिका शिंदे-पॉल 24/02/2025

यंगस्टर्सची आवडती मोस्टली सेन अर्थात प्राजक्ता कोळी हिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. १३ वर्षांपासून अधिक काळ रिलेशनमध्ये असणाऱ्या प्राजक्ताने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत अखेर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये असूनही प्राजक्ता कधीच आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कुठल्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उघडपणे काहीही बोलली नव्हती. मात्र, आपल्या आवडत्या मोस्टली सेन प्राजक्ताच्या जीवनाचा जोडीदार नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागल्यामुळे अखेर तिने काही महिन्यांपूर्वी वृषांकसोबतचं रिलेशन जाहिर केलं. (Prajakta Koli)

‘मिसमॅच’, ‘जुग जुग जियो’, ‘ये शादी नही हो सकती’ अशा चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकलेल्या प्राजक्ताने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. सध्या क्लोज फ्रॅंड्स आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे धुमधडाक्यात करण्याचा जणू काही ट्रेण्डच आला आहे. आणि त्याच ट्रेण्डला फॉलो करत प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल लग्नगाठ लवकरच बांधणार आहेत. प्राजक्ता-वृषांकच्या मेहंदीनंतर हळद आणि इतर पारंपरिक प्रथा संपन्न होणार असून मिळालेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राजक्ता आणि वृषांक लग्न करणार आहेत. (Mostly Sane)

मुळची ठाणे गर्ल असणारी प्राजक्ता कोळी नेपाळी कुटुंबाची सून होणार आहे. गेल्या काही काळात तिने तिच्या आणि वृषांकच्या रिलेशनबद्दल आठवणींना उजाळा देत ९०च्या दशकातील इतर कपल्सप्रमाणे ब्लॅकबॅरी मॅसेंजरवर वृषांक आणि प्राजक्ताची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दोघांच्याही कॉमन मित्रामुळे झालेली ही मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. बरं १३ वर्षांपेक्षा अधिक काळ सोबत असणाऱ्या प्राजक्ताला हे रिलेशन इतकी वर्ष पुढे जाईल अशी खात्रीच नव्हती पण वृषांकने कायमच तिला, तिच्या करिअरला सपोर्ट केल्यामुळे आज ते दोघेही आयुष्याची नवी सुरुवात नव्या बंधनाने करतायत. (Vrishank Khanal)

===========

हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय

===========

रेडिओ जॉकी ते लेखिका…

प्राजक्ता कोळीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तिने रेडिओ जॉकी म्हणून सुरुवात केली होती. आणि त्यानंतर करोना काळात खरंतर जसं बऱ्याच जणांनी आपलं करिअर बदललं किंवा काही जणांनी घरबसल्या काहीतरी नवीन ट्राय करुन पाहू असा विचार केला अगदी त्याचप्रमाणे प्राजक्ताने तिच्या Mosley Sane या युट्यूब चॅनल अगदी सामान्य लोकांना, किंवा 90’s च्या मुलांना रिलेट होतील असे व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यात प्राजक्ताने आई, बाबा, प्राजू आणि मॉंन्टू असं तिचं कुटुंब दाखवत त्यात होणाऱ्या गमतीजमती दाखवल्या आणि प्रेक्षकांनी तिच्या कंन्टेटला उचलून धरलं.

यानंतर प्राजक्ताने हळूहळू एक्टिंगला सुरुवात करत काही हिंदी चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. बरं अभिनय, रेडिओ जॉकी, युट्यूबर, इन्फ्लूएन्सर इतक्यावरच तिचं काम थांबत नाही तर ती एक सोशल वर्कर देखील आहे. प्राजक्ताने पर्यायवरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. इतकंच काय तर मिशेल ओबामांनाही ती भेटली असून त्याचा स्पेशल व्लॉगही तिने तिच्या चॅनलवर पोस्ट केला होता. करिअरमध्ये अनेक शिखरं गाठल्यानंतर नुकतचं प्राजक्ताने तिचं ‘टू गूड टू बी ट्रू’ हे तिचं पहिलंच पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं. (Bollywood News)

कोळींचा नेपाळचा जावई…

आता वळूयात मोस्टली सेनच्या नवऱ्याकडे.  प्राजक्ता कोळीचा होणारा नवरा वृषांक खनाल हा पेशाने वकिल आहे. वृषांक काठमांडूचा असून पहिल्यांदा प्राजक्ता आणि वृषांकची ओळख मित्राच्या घरी गणपती पूजेला झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात होत ती आता दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. मराठी मुलगी नेपाळची सून होणार या विचाराने प्राजक्ताचे चाहते फारच उत्सुक असून तिने पोस्ट केलेल्या मेहेंदीच्या व्हिडिओ, फोटोजवर कमेंचा वर्षाव करतायत. तर, दीया मिर्झा, विक्रांत मेस्सी, टिक्सा चोप्रा, गौहर खान अशा अनेक सेलिब्रिंटीनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Entertainment News)

लहानपणीच प्राजक्ताने आपल्या वडिलांना केलेली पैशांची मदत…

जाता जाता प्राजक्ताने तिच्या वडिलांसोबत एका पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीचा एक भावूक क्षण शेअर केला होता. प्राजक्ताचे वडिल नोकरीला होते पण काही कारणास्तव अडचण आली आणि त्यामुळे त्यांच्याकडील होते नव्हते ते सगळे पैसे संपले होते. त्यावेळी प्राजक्ताला पिगी बॅंकमध्ये पैसे साठवण्याची सवय होती. प्राजक्ताच्या घरी पैशांची इतकी अडचण झाली होती की अगदी एकावेळेच्या जेवणाची सोय होईल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता आणि त्याचवेळी प्राजक्ताची पिगी बॅंक फोडून त्यातून ते पैसे हातात आले त्यात घरखर्च निभावला. हा किस्सा सांगताना प्राजक्ता आणि तिच्या वडिलांचे डोळे पाणावले होते. तेव्हा तिचे वडिल असं देखील म्हणाले की त्यावेळेपासून ते आजपर्यंत प्राजक्ता आमचं घर चालवत आहे आणि मला हातभार लावत आहे याचा मला अभिमान आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood gossips Entertainment Entertainment mix masala Entertainment News mostly sane News Prajakta vrishank Prajatka koli trending news vrishank khanal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.