Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!

 Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
कलाकृती विशेष

Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!

by रसिका शिंदे-पॉल 02/04/2025

हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक म्हटलं की आधीच तीन खान डोळ्यांसमोर येतात.. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान… विविधांगी भूमिका किंवा वेगळे विषय हाताळणारे चित्रपट तिनही खान्सने केले खरे पण इतरही बरेच अभिनेते होते ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्या अभिनयाने, अॅक्शनने तरुन ठेवली.. यातीलच एक नाव म्हणजे विशाल देवगण… कन्फ्यूज झालात? अहो म्हणजे आपला सिंघम किंवा विजय साळगांवकर साकारणारा अजय देवगण (Ajay Devgan)…अजयने आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपट केले त्यात त्याने ९ भूमिका या मराठी charcter च्या केल्या आहेत.. अगदी डेब्यू चित्रपटातील अजय साळगांवकर पासून सुरु झालेला मराठी कॅरेक्टरचा त्याचा प्रवास दृश्यममधील विजय साळगांवकरपर्यंत येऊन ठेपला आहे.. आज अजय देवगणच्या वाढदिवशी जाणून घेऊयात त्याने साकारलेले चित्रपट ज्यात त्याने मराठी पात्रं साकारली आहेत…(Ajay Devgan Birthday special)

अजय देवगणचं बालपणापासूनच बॉलिवूडशी कनेक्शन होतं… त्याचे वडिल वीरू देवगण हे अॅक्शन मास्टटर होते.. त्यामुळे लहानपणापासूनच चित्रपट काय असतो याचे संस्कार अजयवर झाले… आणि अभिनयाची वाट पकडून त्याने १९९१ मध्ये फुल औंर कांटे (Phool Aur Kaate) या चित्रपटातून इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून एन्ट्री केली… पहिल्याच चित्रपटात अजयने मराठी पात्र साकारले होतं ज्याचं नाव होतं अजय साळगांवकर… बॉलिवूडमध्ये प्रत्येकाच्या पात्राचं नाव ही त्याची ओळख होण्याचा एक ट्रेण्ड होता जो आजही कायम आहे.. म्हणजे काय तर राहूल म्हणजे शाहरुख खान…प्रेम म्हणजे सलमान खान.. तसं अजय देवगणने आपल्याच नावाचा ब्रॅण्ड तयार केला आणि स्वत:ची ओळख निर्माण केली… (Bollywood classic movies)

अजय देवगण (Ajay Devgan) आणि मराठीचं एक वेगळंच कनेक्शन आहे… त्याची सासू मराठी.. बायकोमुळे (Kajol) घरात पंजाबीसोबत मराठी वातावरण आलंच.. या सगळ्याचं रिफ्लेक्शन अजयने साकारलेल्या बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसलं… मघाशी सांगितलं तसं अजयच्या डेब्यू चित्रपटाची सुरुवातच मराठी कॅरेक्टरने झाली.. त्यानंतर अजयने २००१ मध्ये आलेल्या तेरा मेरा साथ रहे (Tera Mehra Seth Rahe) या चित्रपटात राज दीक्षित हे पात्र साकारलं.. या चित्रपटात त्याने मराठी कॅरेक्टर प्ले केलं होतंच शिवाय चित्रपटाचं दिग्दशन महेश मांजरेकर यांनी केलं होतं..अजय सोबत चित्रपटात सोनाली बेंद्रे, नम्रता शिरोडकर, दुश्यंत वाघ, रिमा लागू, शिवाजी साटम, जयंत सावरकर आणि स्वत:महेश मांजरेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती.. (Bollywood tadaka)

त्यानंतर, २००४ मध्ये आलेल्या खाकी (Khakee) चित्रपटात त्याने ex inspector यशवंत आंग्रे ही भूमिका साकारली होती.. मग, आला आपल्या सगळ्यांचा आवडता सिंघम (Singham)… रोहित शेट्टीने २०११ मध्ये सिंघमपासून कॉप युनिवर्स बॉलिवूडमध्ये आणलं.. आता पोलिस म्हणजे मराठी माणूस हवाच.. त्यामुळे अजय देवगणने साकारला बाजीराव सिंघम… आणि हे मराठी पात्र इतकं लोकप्रिय झालं की आजही त्याची क्रेझ इतक्या वर्षांनी तितकीच आहे… त्याच वर्षात म्हणजे २०११ मध्ये रास्कल्स (Rascals) हा चित्रपट आला होता ज्यात अजयच्या कॅरेक्टरचं नाव भगत भोसले होतं… एकीकडे बाजीराव सिंघम हे पोलिस पात्र साकारणारा अजय रास्कल्स चित्रपटात चोराच्या म्हणजे अगदी उलट भूमिकेत दिसला होता..(Ajay Devgan films)

अजयने साकारलेल्या सिंघमच्या फिव्हरमधून आपण बाहेर येत होतोच तितक्यात २०१५ मध्ये अजयने दृश्यम (Drushyam)चित्रपटातून विजय साळगांवकर हे स्ट्रॉंग मराठी कॅरेक्टर सादर करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात पाडलं…. मग आला तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिकपट तान्हाजी.. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव, शिवराज वाळवेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती.. त्यामुळे कथा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची होतीच पण त्याचं दिग्दर्शन ते अगदी संगीतही अजय अतूल या मराठी संगीतकार जोडीने केलं होतं.. 

मग २०२१ मध्ये आलेल्या भूज (Bhuj) चित्रपटात अजयने squadron leader विजय कर्णिक ही भूमिका साकारली होती..आणि शेवटी २०२४ मध्ये औरो में कहा दम था (Auro Mai Kaha Dum Tha) या चित्रपटात कृष्णा हे कॅरेक्टर त्याने प्ले केलं होतं ज्यात मराठमोळ्या चाळ संस्कृतीत राहणारा कृष्णा आणि त्याचं आयुष्य चित्रपटात दाखवण्यात आलं होतं.. यात तब्बू त्याची नायिका होती आणि तब्बूच्या (Tabbu) तरुणपणीची भूमिका सई महेश मांजरेकर हिने केली होती…(Entertainment Dhamaka)

==================

हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा

==================

आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपट अजय देवगण याने केले पण त्यात त्याने मराठी कॅरेक्टर्स सादर करुन चाहत्यांची विशेष मनं जिंकली.. इतकंच नाही तर आपला माणूस या मराठी चित्रपटाची त्याने निर्मिती केली होती आणि त्यात नाना पाटेकर यांच्या मुलाची भूमिकाही त्याने साकारली होती.. एकीकडे सगळे खान्स असूनही दुसरीकडे विविध पात्र साकारुन आपलं स्वत:च कलाविश्व आणि फॅन फॉलोईंग अजय देवगण याने तयार केली… चित्रपटांमधून हिंदीत अमराठी असूनही मराठीपण जपणारा हा कलाकार आहे यात शंकाच नाही…

अजय असा स्थिर गंभीर चेहऱ्याचा असूनही त्याने ‘फुल औंर कांटे’ चित्रपट केला आणि ‘ऑल द बेस्ट’’, किंवा ‘गोलमाल’ची फ्रेंचायझी असे विनोदी चित्रपटही केले.. अॅक्शन आणि स्टंट हिरो अशी ओळख १९९१ पासून आज २०२५ पर्यंत कायम टिकवून ठेवणाऱ्या आणि अजय ते विजय ही नावं जरी वेगळी असली तरी साळगांवकर हे आडनाव कायमस्वरूपी प्रेक्षकांना लक्षात राहिल अशी तगडी भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा… (Ajay Devgan birthday)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: action heero Ajay Devgan bhuj Bollywood bollywood movies drushyam Entertainment News entertainment tadaka golmal Kajol singham tanhaji veeru devgan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.