Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Border 2 मध्ये वरुण धवनसोबत झळकणार ही अभिनेत्री!; अर्जून रामपाल सोबत केलं आहे काम….
१९९७ साली आलेला ‘बॉर्डर’ (Border Movie) चित्रपट आजही प्रेक्षकांना भावूक करतो… सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जे पी दत्ता यांनी केलं होतं… आता तब्बल ३० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल बॉर्डर २ येणार आहे… विशेष म्हणजे ‘बॉर्डर २’ (Border 2) मध्येही सनी देओलची (Sunny Deol) प्रमुख भूमिका असून यात वरुण धवनचीही एन्ट्री झाली आहे… आता वरुण धवनसोबत कोणती अभिनेत्री झळकणार तिचं नाव अधिकृतपणे मेकर्सने घोषित केलं आहे…(Bollywood Movies)

तर, ‘बॉर्डर २’ चित्रपटात अभिनेत्री मेधा राणा (Medha Rana) वरुण धवनसोबत झळकणार आहे… मेधाने याआधी ‘इश्क इन द एयर’,’फ्रायडे नाइट प्लॅन’ आणि ‘लंडन फाइल्स’ या चित्रपटांमध्ये कामं केली असून बॉर्डर २ चित्रपटातून ती मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय… तसेच, मेधा हिचं आर्मीचं बॅग्राऊंड असल्यामुळे तिचं कास्टिंग या चित्रपटात योग्य असल्याचं सांगितलं जात आहे… खरं तर बॉलिवूडमध्ये लीड हिरोईन म्हणून ‘बॉर्डर २’ सारखा चित्रपट मिळाल्यामुळे मेधा राणा हिचं वरुण धवनसह (Varun Dhawan) संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांनीही अभिनंदन केलं आहे…(Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
=================================
‘बॉर्डर २’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार असून २३ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट देशभरात रिलीज होणार आहे… या चित्रपटात वरुण धवन आणि सनी देओल यांच्यासह दिलजित दोसांझ, मौनी रॉय, अहान शेट्टी, मेधा राणा यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत…(Border 2 movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi