‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मेहमूदने अमिताभला दिला होता ‘हा’ सल्ला
‘बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिये’ राजेश खन्नाच्या आवाजातील हा डायलॉग अजरामर होऊन गेलेला आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातील हा आणि याच्यासारखे कित्येक डायलॉग, कित्येक सिन्स प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून बसले आहेत.आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणून ‘आनंदी’ गुदगुल्या करण असो अथवा आयुष्यातील व्याकूळतेचे तंतोतंत चित्र दाखवून, पोटात खड्डा पाडत, डोळ्यांच्या कडा ओल्या करणे असो. आजही आनंद तेवढाच प्रभावी ठरतो. चित्रपटाचा शेवटचा सीन, ज्यात आनंद या जगातून निघून गेला हे जेव्हा पहिल्यांदा अमिताभ बच्चनच्या पात्राला कळून तो ज्या आर्ततेने आनंदला ‘तुम ऐसे नही जा सकते’ म्हणतो, ते बघून जवळच्या व्यक्तीचं निघून जाण्याची कल्पना किती भयावह असू शकते याची प्रचीती येते.
आनंद रिलीज झाला. लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. राजेश खन्ना सुपरस्टार होतेच पण त्यांच्यासोबत नवख्या अमिताभ बच्चनचं (Amitabh Bachchan) देखील भरभरून कौतुक झालं. अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) कारकिर्दीतील पूर्ण लांबीचा रोल असणारा हा पहिलाच चित्रपट होता. राजेश खन्ना सारख्या सुपरस्टार सोबत काम करतांना अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामात आपल्या नवखेपणाचं जराही दडपण पडद्यावर जाणवू दिलं नाही. अमिताभच्या पूर्ण कामाचं एकंदरीत कौतुक झालंच परंतु आनंद मरतो त्या सीनमधील अमिताभचा (Amitabh Bachchan) परफॉरमन्स सगळ्यांकडून वाखाणला गेला. अमिताभने आपल्या अभिनयची कमाल दाखवत मृत्यूचा तो सीन अक्षरशः जिवंत केला. त्यांनी काम केलं, त्यांचं कौतुक झालं. परंतु राजेश खन्ना सोबत तो सीन करण अमिताभसाठी सोपं नव्हतं.
झालं असं की, तो सीन शूट होणार होता आणि अमिताभला (Amitabh Bachchan) तो सीन कसा परफॉर्म करायचा याची मात्र जराही कल्पना येत नव्हती. शूटच्या तीन चार दिवस अगोदर पासूनच ते याला घेऊन खूप अस्वस्थ होते. त्यांनी सगळं करून बघितलं पण त्यांना त्या सीनचा सूर काही गवसला नाही. आनंदचं मरण हा चित्रपटातील खूप महत्वाचा टप्पा होता. तो तेवढ्या तीव्रतेने, खरेपणाने प्रेक्षकांसमोर मांडणे गरजेचे होते. अमिताभ खूप अस्वस्थ होता.
त्याकाळी मेहमूद अमिताभच्या (Amitabh Bachchan) खूप जवळचे होते. अमिताभ आपली ही अडचण घेऊन मेहमूदकडे गेले. मरणाचा सीन कसा करायचा असतो याची काहीही कल्पना नसणाऱ्या अमिताभने आपली अडचण त्यांना सांगितली. मेहमूदने त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाले, असं समज की राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टीची गंभीरता लक्षात येतेय? सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मृत्यू होणं ही खूप मोठी आहे. अमिताभने (Amitabh Bachchan) हीच गोष्ट लक्षात ठेवली आणि तो सीन परफॉर्म केला किंबहुना त्या सीनमध्ये जीव फुंकला. प्रेक्षकांनादेखील तो सीन बघून आपले अश्रू रोखता आले नाहीत. आनंदमधील कामगिरीनंतर अमिताभ बच्चन रातोरात स्टार झाले.
=====
हे देखील वाचा : ऑस्करवारी केलेले भारतीय सिनेमे!
=====
हृषीकेश मुखर्जी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले तर गुलझार यांनी सिनेमाचे संवाद लिहिले होते. चित्रपटात अमिताभ (Amitabh Bachchan) आणि राजेश खन्ना यांच्यासोबतच सुस्मिता सन्याल आणि रमेश देव यांनी देखील अभिनय केला आहे. गोष्ट सांगताना हृषीदाची हृदयाला थेट हात घालण्याची पद्धत, सुपरस्टार राजेश खन्ना सोबत नवख्या अमिताभची अफलातून केमिस्ट्री यामुळे ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही’ म्हणत ‘आनंद’ अजरामर झाला.