Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री ठेवायची रोजे
हिंदी चित्रपटसृष्टीला एकाहून एक टॅलेंटेड कलाकार लाभले आहेत… उत्कृष्ट अभिनय, विलन किंवा विनोदाचं अचूक टायमिंग असलेल्या कलाकरांची बॉलिवूडला कमी नाही… आता या सगळ्याच क्वॉलिटी ज्या अभिनेत्यामध्ये होत्या ते म्हणजे दिग्गज अभिनेते मेहमूद (Mehmood)… आजही त्यांचे चित्रपट चिरतरुण आहेत… ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’ यातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असून प्रेक्षकांना त्यांची कमी आजही भासते… तुम्हाला माहित आहे का जेव्हा मेहमूद आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होते तेव्हा ते जास्तच धार्मिक झाले होते… तरुण असताना ते रमजानचे रोजे तर ठेवायचेच; पण, ते श्रावणदेखील पाळायचे. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीकडून… (Retro Bollywood News)

मराठीसह हिंदीतही उत्कृष्ट भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) यांनी मेहमूद यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली… १९५०-६० च्या दशकात शुभा खोटे व मेहमूद यांनी एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यात फार सुंदर मैत्री झाली होती…एका मुलाखतीत मेहमूद यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलच त्यांनी किस्से सांगत रोजे आणि श्रावण ते पाळायचे व एकमेकांच्या धार्मिक उपवासाच्या वेळी ते कसे साथ देत होते याची आठवही त्यांनी सांगितली…

तर, शुभा खोटे यांनी नुकतीच रेड एफएम पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “आम्ही सहा वर्षे एकत्र काम केलं. आम्ही अनेक चित्रपटांत स्क्रीन शेअर केली. जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळी श्रावण महिन्यात मी उपवास करायचे. जेव्हा ते कठीण जाऊ लागलं, त्यावेळी मी सोमवारी आणि शनिवारीच उपवास करू लागले. अशाच प्रकारे रमजानमध्ये मेहमूद शुक्रवारी रोजे ठेवायचे.”
पुढे शुभा म्हणाल्या की, “जेव्हा मी सोमवारी व शनिवारी उपवास करायचे तेव्हा मेहमूददेखील त्या दिवशी उपवास करायचे. जेव्हा ते शुक्रवारी रोजे ठेवायचे, तेव्हा मीदेखील त्यांच्याबरोबर त्या दिवशी रोजे ठेवायचे. आम्ही एकत्र इतकं काम केलं होतं की, आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांच्या रीतिरिवाजांचे आणि धर्मांचे पालन करू लागलो होतो”.
================================
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
दरम्यान, मेहमूद यांच्या चित्रपटांची यादी तशी फार मोठी आहे… त्यांनी ‘गरम मसाला’, अं’दाज अपना अपना’,’ पती पत्नी’, ‘हावडा ब्रीज’, ‘सीआयडी’, ‘कलाकार’, ‘पॉकेट मार’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली आहेत… आजही भारतीय चित्रपटसृष्टी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची आभारी आहे…(Mohmood movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi