Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अप्सरा थिएटर: या चित्रपटाच्या प्रीमिअरला चक्क कॉलेजच्या मुलांना आमंत्रित केलं होतं

 अप्सरा थिएटर: या चित्रपटाच्या प्रीमिअरला चक्क कॉलेजच्या मुलांना आमंत्रित केलं होतं
टॉकीजची गोष्ट

अप्सरा थिएटर: या चित्रपटाच्या प्रीमिअरला चक्क कॉलेजच्या मुलांना आमंत्रित केलं होतं

by दिलीप ठाकूर 03/06/2022

इतकी वर्षे चित्रपट पाहता तर, तुमचं आवडतं चित्रपटगृह कोणतं? असा प्रश्न करणारे अनेक चाहते अथवा फिल्मवाले भेटताक्षणीच डोळ्यासमोर येतं ते अप्सरा थिएटर! मला हे थिएटर अनेक कारणांमुळे आवडायचे. (Apsara Theater Mumbai)

मी नेहमीच म्हणतो की, जुन्या एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे प्रत्येकाचे आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते किंवा आहे. प्रत्येक थिएटर वेगळे दिसायचे. त्या काळात अनेक चित्रपट रसिकांचे स्वतःचं असं एक आवडतं थिएटर असायचं. कळत नकळत त्या आवडत्या थिएटरशी भावनिक नातं निर्माण होत असे. त्या काळात फक्त चित्रपट पाहणं एवढ्यापुरतीच चित्रपटाची ओढ नसे, तर ते ओलांडून थिएटरशी नाते जुळत जाई. आणि मग त्या थिएटरला जाऊन अधिकाधिक चित्रपट पहावेसे वाटत. 

अप्सरा चित्रपटगृह! म्हणताक्षणीच डोळ्यासमोर येते ती अतिशय आकर्षक नक्षीकाम केलेली, देखणी आणि ग्लॅमरस लूक असलेली भव्य आणि मान उंचावून पाहत रहावी अशी वास्तू! हे आडव्या स्वरुपाचे चित्रपटगृह होतं. (Apsara Theater Mumbai)         

दक्षिण मुंबईतील विशेषतः धोबीतलाव, गिरगाव ते सात रस्ता आणि गिरगाव चौपाटी ते खेतवाडी/कुंभारवाडा, ताडदेव, गवालीया टॅन्क  या परिसरात साठ, सत्तरच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या अगणित चित्रपट रसिकांना ही वास्तू एव्हाना आठवली असेलच. ही वास्तू डाॅ. भडकमकर मार्गावरील गिल्डन लेन मैदानासमोर होती. दुर्दैवाने आज ती इतिहासजमा झाली आहे. त्याच्या कोणत्याही खाणाखुणाही शिल्लक नाहीत. राहिल्यात फक्त आणि फक्त आठवणी!  

ही वास्तू अतिशय देखणी आणि टुमदार होती. आत शिरताच बाल्कनीकडे जाण्यासाठी तिरका परंतु पायऱ्या नसलेला जीना. आणि त्याखाली पाण्याचा झरा. त्याचा एक लयबद्ध आवाज. संपूर्ण थिएटरला रेड कार्पेट. तुम्हीच सांगा, आपोआपच सकारात्मक मूड निर्माण होतो ना? तिकीट काढून आत शिरलो आणि सीटवर जाऊन बसलो, अशी यांत्रिक गोष्ट नव्हती. इथे बसल्यावर चित्रपट मनात मुरत जायचा. इथल्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. तसंच तिथून एखाद्या वाहनाने अथवा अगदी चालत जरी जायचा योग आला तरी त्या थिएटरकडे आवर्जून पाहणे होई. (Apsara Theater Mumbai) 

मला सर्वप्रथम ‘अप्सरा थिएटर’ माहित झालं ते दिलीप कुमारची भूमिका असलेल्या ‘गोपी’ (१९७०) या चित्रपटामुळे. अगदी लहानपणापासून रसरंग, मार्मिक, सोबत अशी साप्ताहिके वाचत असताना १९७० साली दिलीप कुमारचा ‘गोपी’, देव आनंदचा ‘जाॅनी मेरा नाम’ आणि राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ या तीन चित्रपटातील स्पर्धेबाबत लिहिलेलं समजून घेऊन वाचत होतो. त्या वर्षी टप्प्याटप्प्याने अथवा काही आठवड्यांच्या अंतराने हे तीन चित्रपट प्रदर्शित होत गेले. ‘गोपी’ चित्रपट अप्सरा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 

मुळात अप्सरा थिएटरच्या जागी इंग्रजांच्या काळापासून ‘लॅमिन्टन’ नावाचं थिएटर होतं (आणि म्हणूनच हा रस्ता तेव्हापासून अगदी आजही लॅमिन्टन रोड म्हणून ओळखला जातो. नंतरचं नाव डाॅ. भडकमकर मार्ग.) माझ्या अगोदरची पिढी लॅमिन्टन थिएटरची आठवण सांगताना ते फार पूर्वीच्या बसक्या थिएटरसारखे होतं, असं सांगतात. त्या लॅमिग्टन थिएटरमध्ये गृहस्थी, चार चांद असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. (Apsara Theater Mumbai) 

लॅमिन्टन थिएटर पाडून त्या जागी १९६४ साली भव्य असे अप्सरा चित्रपटगृह उभे राहिले. हजार बाराशे आसनक्षमता असलेल्या या वातानुकूलित भव्य चित्रपटगृहाच्या उदघाटनाचा पहिला चित्रपट तसाच बहुचर्चित आणि  उच्च दर्जाचा असायला हवा ना? तो होता, आर. के. फिल्म बॅनरचा राज कपूर दिग्दर्शित पहिला रंगीत चित्रपट ‘संगम’. 

१८ जून १९६४ या दिवसाच्या मुहूर्तावर सकाळी दहा वाजता ‘संगम’ या चित्रपटाच्या भव्य प्रीमियरने अप्सरा चित्रपटगृहाचे उदघाटन झाले. या शोला चित्रपट समीक्षकांना आवर्जून आमंत्रित करण्यात आलं होतं. हा पहिला शो संपल्यावर या चित्रपटगृहात खास जेवणाचा बेत होता. खरंतर राज कपूर कायमच ओल्या (चिअर्स) फिल्मी पार्टी संस्कृतीसाठी नावाजलेला, पण यावेळी श्रीखंड पुरी अतिशय चविष्ट होती, असे मागील पिढीतील पत्रकार आजही आवर्जून आठवण काढत सांगतात. (Apsara Theater Mumbai) 

‘संगम’ने त्या काळातील सुपर हिट पिक्चरप्रमाणे अप्सरा थिएटरमध्ये पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला.  चित्रपटाची लांबी चार तासापेक्षा जास्त असल्याने त्याला दोन मध्यंतर होती. त्यामुळे शोच्या वेळा ११ वाजता, साडेतीन वाजता आणि आठ वाजता अशा होत्या.

अप्सरा चित्रपटगृहाची वास्तू अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक होती. तुम्ही चित्रपट पाहायला या असं जणू ती खुणवायची. माझ्याप्रमाणेच इतरांच्याही अशाच भावना असणार. चित्रपटगृहात स्टाॅल, अप्पर स्टाॅल आणि बाल्कनी असे तीन प्रकार होते. खालच्या आणि वरच्या मजल्यावरील सिनेमाची शो कार्ड्स पाहताना अनेक चित्रपट रसिकांना आनंद मिळे. अनेक रसिकांना चित्रपट सुरु होण्यापूर्वी अशी शो कार्ड्स पाहण्याचं वेड होतं.  बाहेरच्या बाजूलाही डावीकडे अशी शो कार्ड्स पाहण्यास मिळत. (Apsara Theater Mumbai) 

अप्सरा थिएटरमध्ये तीन, सहा आणि नऊ असे दिवसा तीन खेळ असत. तसेच मॅटीनी शोला कधी जुने, तर कधी नवीन चित्रपट प्रदर्शित होत. बाह्यदर्शनी भागावरचे प्रदर्शित चित्रपटाचे पोस्टर डेकोरेशन पाहण्यात विशेष आनंद मिळे. तो काळच वेगळा होता..ते दिवसच वेगळे होते. दक्षिण मुंबईतील जवळपास सर्वच चित्रपटगृहे ही पूर्वी मेन थिएटर होती. तेव्हाची चित्रपट रिलीजची पारंपरिक संस्कृती आज हरवली आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ती माहित नाही. 

अप्सरा चित्रपटगृहात अनेक चित्रपट प्रचंड हिट ठरले. तुमसे अच्छा कौन है, शर्मिली, हीर रांझा, सफर, हसते जख्म, त्रिशूल, धर्मा, प्रेम रोग, शराबी, क्रांती, संन्यासी, गोपी, त्रिशूल, युध, नाम, नूरी, बेताब, नाम  वगैरे वगैरे. त्या काळात पब्लिकला पिक्चर आवडला रे आवडला की ज्युबिली हिट नक्की. सत्तरच्या दशकात अप्सरा थिएटरमध्ये स्टाॅलचा तिकीट दर दोन रुपये वीस पैसे, अप्पर स्टाॅल तीन रुपये तीस पैसे आणि बाल्कनी तिकीट दर चार रुपये चाळीस पैसे, असे होते. 

मनोजकुमार आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख असलेल्या सोहनलाल कंवर दिग्दर्शित ‘संन्यासी ‘पासून ते वाढले. तोही इथे ज्युबिली हिट झाला होता. फिरोझ खान अभिनित निर्मित आणि दिग्दर्शित ‘कुर्बानी’ने अप्सरा थिएटरमध्ये अक्षरशः धमाल यश मिळवलं. कधीही थिएटरवर जावं, तर ॲडव्हास बुकिंगचा चार्ट हाऊसफुल्ल असे. बरं ब्लॅक मार्केटमध्ये चढ्या दरात तिकीट घेण्याची ऐपत नव्हती. एकच पर्याय होता, तास दीड तास रांगेत उभं राहून ॲडव्हास बुकिंगला तिकीट काढून ठेवणं. (Apsara Theater Mumbai) 

“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये….” असं काही सुपर हिट होते की, सगळीकडे तेच ऐकू येई. झीनत अमानच्या ग्लॅमरस लूकवर अप्सरा थिएटरची संस्कृती जणू फिदा झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचं मुंबई विभागातील वितरण कमला फिल्म यांनी केलं. ती चित्रपट वितरण कंपनी विनोद खन्ना आणि विनोद मेहरा यांनी भागिदारीत सुरु केली होती. 

काही चित्रपटांनी शंभर दिवसांचे यश संपादले. ते आहेत, शिर्डी के साईबाबा, दो अन्जाने, दुसरा आदमी, रखवाला, जानेमन, इन्साफ (ऐशीच्या दशकात विनोद खन्नाने या चित्रपटाद्वारे केलेल्या कमबॅकला रसिकांचा असा  उत्फूर्त प्रतिसाद मिळाला की, सोमवारी आगाऊ तिकीट विक्रीची खिडकी उघडण्यापूर्वीच विनोद खन्नाच्या फॅन्सची अक्षरशः प्रचंड झुंबड उडाली आणि शुक्रवारी सिनेमा रिलीज होईपर्यंत आठवड्याची तिकीटे हाऊसफुल्ल!. तो ‘भरलेला चार्ट’ पाहणेही एक थ्रील असे), सौतन, खून भरी मांग वगैरे वगैरे…महेश भट्ट दिग्दर्शित ‘काश’ इथे बरा चालला होता. (Apsara Theater Mumbai) 

काही चित्रपटांनी अप्सरात मॅटीनी शोला यश प्राप्त केले. अमोल पालेकर यांची भूमिका असलेला बी. आर. फिल्म निर्मित आणि बासू चटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात’ इथे मॅटीनी शोला रिलीज होताना तो एक स्वच्छ मनोरंजक चित्रपट म्हणून रिलीज झाला होता, त्यात तथ्यही आहे. पण माऊथ पब्लिसिटीवर हा चित्रपट असा काही यशस्वी ठरला की, त्याने इथे पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केला. 

रवीन्द्र महाजनी यांनी भूमिका साकारलेला हिंदी चित्रपट ‘बेअब्रू’नेही इथे मॅटीनी शोला रौप्यमहोत्सवी यश संपादले. रेश्मा और शेरा, अपने पराये, अगर, आंचल, रंगबिरंगी, प्यारी बहेना, जवानी, काॅल गर्ल हे इथे मॅटीनी शोला रिलीज झाले होते. 

आमिर खान आणि जुही चावला यांना स्टार केलेला मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपटही इथेच मॅटीनी शोला रिलीज झाला. त्या दिवशी आवर्जून सिने पत्रकारांसह काॅलेजमधील युथला आमंत्रित केले होते. त्यांच्या उत्फूर्त प्रतिसादावरुन हा चित्रपट सुपरहिट नक्कीच होणार, असा जणू सिग्नल मिळाला. आणि पुढे काय घडलं हे तुम्हाला माहिती आहेच. विशेष म्हणजे, आमिर खानने ‘माझा कट्टा ‘मध्ये अप्सरा थिएटरमधील आपल्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाच्या प्रीमियर शोची आठवण अगदी खुलवून रंगवून सांगितली होती. अप्सरा थिएटरची माझी ही वेगळी आठवण! (Apsara Theater Mumbai) 

=======

हे देखील वाचा – एकेकाळी परकं वाटणाऱ्या इराॅस थिएटरशी असं जुळलं जवळचं नातं 

======

अप्सरात  जोरदार आपटलेला पिक्चर  ओ. पी. रल्हन निर्मित आणि दिग्दर्शित ‘तलाश’. बलराज सहानी, राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर आणि खुद्द ओ. पी. रल्हन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची ‘एक कोटीचा चित्रपट’ अशी अगदी महागडी जाहिरात करण्यात आली होती. पन्नास वर्षांपूर्वी एक कोटी ही प्रचंड मोठी रक्कम होती. त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक तीनशे रुपये पगार म्हणजे खूप मोठा आनंद असे. यावरुन एक कोटीची किंमत काढा. या अपयशाची बरीच चर्चा झाली होती. 

अप्सरा थिएटरमध्ये हिन्दुस्तान की कसम, ३६ घंटे, गुलाम बेगम बादशाह, द चीट, हमशकल, अपने रंग हजार,  हमारे तुम्हारे, छत्तीस घंटे, देशप्रेमी, विश्वनाथ, आखरी गोली, टक्कर, जोशिले,…. तर मॅटीनी शोला घुंगरु की आवाज, ‘नौकरी’ असे अनेक चित्रपट आले तेच गेले. (Apsara Theater Mumbai) 

एके दिवशी बातमी आली की, ही वास्तू पाडण्यात येऊन नवीन चकाचक इमारतीत वरच्या मजल्यावर तीन मल्टीप्लेक्स स्क्रीन देणार. बदलत्या काळानुसारचा बदल होणं स्वाभाविकच आहे म्हणा. काही महिन्यांतच नवीन इमारत उभी राहिली आणि त्यात तीन छोटे स्क्रीन आले. नवीन युगाचा हा नवीन फंडा होता. पण याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा सिनेमा थिएटरचा फिल येत नव्हता आणि काही कारणास्तव हे स्क्रीन बंदही झाले. ते सुरु होणार अशी अधूनमधून कुठून तरी बातमी येते आणि जाते. (Apsara Theater Mumbai) 

=======

हे देखील वाचा – थिएटरला गर्दीचा वेढा….

=======

असे करता करता अप्सरा चित्रपटगृह आठवणीत जमा झाले. आजही तेथून जाताना ती रुबाबदार वास्तू आणि त्यात आवडीने पाहिलेले आणि अधिकच आवडलेले असे छोटी सी बात, प्रेम रोग, शराबी, बेताब असे चित्रपट नक्कीच आठवतात. अप्सरा थिएटरची देखणी वास्तू आजही डोळ्यासमोर आहे. आज तेथून जाताना आपण आपले आवडते अप्सरा थिएटरच पाहतोय असाच भास होतो. खरंच एक युग “सिनेमा थिएटर” आवडावे असेही होते आणि एखादी वास्तू आवडत असेल, तर स्वाभाविकच त्यातील अनेक गोष्टीही आपल्याशा वाटतात/पहाव्याश्या वाटतात. आपल्या देशातील चित्रपटाचे वेड अशा मार्गानेही जाते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Apsara Theater Bollywood Entertainment
Previous post
Next post

1 Comment

  • Jayesh Ratilal Desai says:
    03/06/2022 at 4:43 pm

    खूप मस्तच दिलीप. छान लेख.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.