Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

‘या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर Mohammad Rafi मन्ना डे यांच्या गळ्यात पडून रडले होते!
चेतन आनंद यांनी भारत- चीन युध्दा नंतर १९६४ ‘हकिकत’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट भारतातील पहिला युद्धपट म्हणून देखील ओळखला जातो. आज हा चित्रपटपद प्रदर्शित होऊन साठ वर्ष होऊन गेली तरी या चित्रपटाची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. या युद्धातील आपल्या देशाचा परभव हि प्रत्येकाच्या मनातील हळवी जखम आहे. या चित्रपटातील गाणी हा एक खरं तर वेगळ्या लेखाचा विषय आहे.

गीतकार कैफी असमी यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत मदन मोहन यांनी संगीत दिले होते. अतिशय अप्रतिम काळजात घर करणारं भावस्पर्शी असं हे संगीत होतं. ‘कर चले हम फिदा …’ सारखं देशभक्तीपर गीत यात होते. या चित्रपटात एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मोहम्मद रफी यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा येत होत्या. या गाण्याच्या रेकोर्डिंग नंतर त्यांच्या मनाचा बांध फुटला होता आणि सह गायकाच्या गळ्यात पडून ते रडले होते! हे गाणं गाताना सर्वच पार्श्वगायक, संगीतकार आणि वादक भाऊक झाले होते. रफी आधीच खूप संवेदनशील कलाकार होते. त्यामुळे या गाण्यातील भावना त्यांना खूप वेदना देऊन गेल्या.
हे गाणं होतं ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा….’ मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद आणि भूपिंदर सिंग यांनी हे गाणं गायलं होतं. भूपिंदर सिंग यांचे हे पहिलंच गाणं होतं. या गाण्यात आपल्या जवळच्या माणसांना बिछडण्याचं दुःख होतं. ही वेदना खूप कष्टप्रद असते. समर प्रसंगी सैनिक आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या जवळची घरातील माणसं आपल्या जाण्याने कसे व्यक्त होतील व्यथित होतील या भावना होत्या. कैफी आजमी यांनी यातील एक एक शब्द काळजात घर करावा असा लिहिला होता. या गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये झाले.

जेव्हा याच्या रिहर्सल चालू होत्या त्यावेळी रफी यांना जेव्हा पहिल्यांदा गाण्याचा कागद हातात दिला गाणं वाचल्यानंतर रफी एकदम इमोशनल झाले . ते पटकन खाली बसले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कैफी आजमी यांच्याकडे पाहून ते म्हणाले ,”फार भावनाप्रधान तुम्ही लिहिले आहे.” गाण्याच्या रिहर्सलच्या वेळीच त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत होत्या. दुसऱ्या दिवशी गाण्याचे रेकॉर्डिंग होतं. या रेकॉर्डिंगच्या वेळेला रफी खूपच इमोशनल झाले होते. रफी सोबत गाणारे तलत मेहमूद, मन्नाडे आणि भूपिंदर सिंग हे देखील खूप भाऊक झाले होते.

संगीतकार मदनमोहन यांचे सूर गीताच्या भावना आणखी गडद करणारे होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झालं एका क्षणी तर रफी यांना हुंदका इतका दाटून आला की त्यांना गाणं थांबवावं लागलं नंतर पुन्हा गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झालं. गाणं संपलं. आणि रफी मन्नाडे यांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडले. एखाद्या गाण्याचं खरं यश काय असतं ते इथे कळतं. त्यावेळी फेमस स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगच्या वेळेला गायकांसाठी फक्त दोनच माईक होते . त्यामुळे एका माईकवर रफी आणि भूपिंदर सिंग तर दुसरा माईकवर मन्नाडे आणि तलत होते. भूपिंदर सिंग यांचे भाग्य थोर की त्यांना आयुष्यातलं पहिलं गाणं ते देखील रफीच्या शेजारी उभा राहून एकाच माइक मधून गायला मिळाले.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
रेकॉर्डिंगच्या वेळेला कलाकारांची ही भावोत्कट अवस्था असल्यामुळे चित्रपट पाहताना देखील प्रेक्षकांची अशीच अवस्था होती . आज देखील हे गाणं पाहताना आपण खूप इमोशनल होतो. त्या काळात प्रत्येक कलाकार हा जीव ओतून काम करायचा. त्यामुळे त्यांच्या भावना सच्चेपणा त्यांच्या कलाकृतीमध्ये उतरत असायच्या. याच कारणाने कदाचित ही गाणी साठ साठ-सत्तर सत्तर वर्षानंतर देखील आपल्याला तितकीच आवडतात. या गाण्यांच्या लोकप्रियतेचे कदाचित हेच गमक असावं. हा किस्सा गायक भूपिंदर सिंग यांनी विविध भारतीवरील एका कार्यक्रमात सांगितला होता. आज १४ जुलै संगीतकार मदनमोहन यांचा स्मृतीदिन . त्या निमित्ताने हा भावस्पर्शी किस्सा.