Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mother India : बिदाई गीताच्या रेकोर्डिंगला शमशाद बेगम का रडत होत्या?

 Mother India : बिदाई गीताच्या रेकोर्डिंगला शमशाद बेगम का रडत होत्या?
बात पुरानी बडी सुहानी

Mother India : बिदाई गीताच्या रेकोर्डिंगला शमशाद बेगम का रडत होत्या?

by धनंजय कुलकर्णी 15/01/2025

दिग्दर्शक मेहबूब यांचा ‘मदर इंडिया‘ (Mother India) हा चित्रपट भारतातील एक सर्वकालीन असा यशस्वी आणि माईल स्टोन चित्रपट आहे. या चित्रपटात भारतीय नारीचा संघर्ष फार प्रभावी पद्धतीने दिग्दर्शकाने दाखवला आहे. हा चित्रपट त्यावर्षी ऑस्करसाठी देखील पाठवला गेला होता. या चित्रपटाने भारतीय सिनेमात एक आगळं वेगळं असं स्थान प्राप्त केलं आहे. या चित्रपटातील प्रत्येक पैलू हा अतिशय विचारपूर्वक आणि कौशल्याने सादर केला गेला. या चित्रपटातील गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत नौशाद अली यांचं होतं. संगीतकार स्वतः साहित्याचे मोठे जाणकार होते त्यामुळे या चित्रपटातील गाणी अतिशय दर्जेदार बनली.

या चित्रपटातील एका बिदाई गीताचा किस्सा फार सुंदर आहे. हे गाणं होतं ‘पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली…’  दिग्दर्शक मेहबूब यांनी १९४० साली आलेल्या आपल्याच ‘औरत’ (१९४०) या चित्रपटाचा रिमेक म्हणजे मदर इंडिया होता. ‘औरत’ या चित्रपटात देखील विदाई घेत होतो पण ते अनिल विश्वास यांनी गायलं होतं. ‘मदर इंडिया’ (Mother India) या चित्रपटातील विदाई गीत शमशाद बेगम आणि कोरस यांनी गायलं होतं. या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा खूप भावस्पर्शी आहे.

दिग्दर्शक मेहबूब यांनी नौशाद यांना सांगितलं की, ”गरीब शेतकऱ्याची मुलगी आपल्या मातापित्यांना सोडून लग्नानंतर सासरी निघाली आहे. तिच्या पालकांनी खूपच कमी हुंडा दिला आहे. बैलगाडीमध्ये बसून ती नववधू आपल्या पतीच्या घरी निघालेली आहे. हुंडा कमी दिला आहे हे तिला माहिती नाही. तिची कल्पना मात्र आई-वडिलांनी सर्व काही दिलं असंच आहे. या सिच्युएशनवर आपल्याला गाणे करायचे आहे.” ही सिच्युएशन ऐकल्यानंतर संगीतकार नौशाद अली यांना अमीर खुस्रो यांची एक रचना आठवली. ही रचना अशी होती. (Mother India)

सुंदर सारी मोरी मैके मे मेल भयो,
का लेके जो हो गौनवा हाय राम…’

गीतकार Shakeel Badayuni यांनी अमीर खुसरोच्या या रचनेचा आधार घेत गाण्याचा मुखडा लिहिला. ‘पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली रोये माता पिता उनकी दुनिया जली…’  पुढे शकील यांनी लिहिले कोई गुण ढंग न मुझ मे कोई बात है मोरी चुनरियों की लाज अब तेरे हात है!’  दुसऱ्या अंतऱ्यामध्ये शकील म्हणतात,

भैय्या बाबा सुख मोरे सारे दिये
मोरे गोने मे चाँद और सितारे दिये
साथ लेके मैं सारा गगनवा चली…’

हे बोल ऐकल्यानंतर मेहबूब मियां इतके खूश झाले त्यांनी शकील  यांना मिठीत मारली आणि म्हणाले “मला जी गोष्ट हवी होती ती या शब्दातून बरोबर व्यक्त होत आहे!” गीताचे चित्रीकरण रात्रीच्या दृश्याच्या नुसार ठेवलं होतं. मुलीचे आई वडील शोकमग्न होऊन उभे आहेत. नई नवेली दुल्हन बैलगाडीमध्ये बसून आपल्या पतीच्या घरी निघालेली आहे. आकाशातील चांद सितारे तिच्या साथीला आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर हे गाणे येते. (Untold stories)

मोरे गौने में चांद सितारे दिये
साथ लेके मे सारा गगनवा चली…

एका गरीब सुसंस्कारीत स्वाभिमानी भारतीय नववधूच्या भावनांना खूप चांगल्या पद्धतीने यात व्यक्त केलं होतं. प्रेक्षकांना एक भावनात्कट दृश्य पाहायला मिळाले. या गीताच्या रेकोर्डिंगचा किस्सा तर आणखी भावस्पर्शी आहे. गीत ध्वनिमुद्रित होत असताना कोरसमध्ये जाणाऱ्या मुलींच्या आवाज कमी होऊ लागला. नौशाद यांना वाटलं मशीनमध्ये काही गडबड झाली का? त्यांनी गायिकांच्या बाजूला पाहिलं तर सर्व कोरस गाणाऱ्या मुली हुंदके देऊन मुसमुसत रडू लागल्या होत्या.  नौशाद रेकॉर्डिंग रूममध्ये गेले आणि शमशाद बेगमला विचारलं, ”काय झालं? ह्या मुली का रडत आहेत?” शमशाद बेगम यांच्या डोळ्यात देखील पाणी होतं. (Mother India)

त्या म्हणाल्या ,”नौशाद साहेब माझी मुलगी ही आता तरुण आहे आणि तिचे लग्न काही दिवसात होईलच. गीत गाता गाता मला माझ्या मुलीची आठवण झाली. एक दिवस ती देखील मला सोडून अशीच निघून जाणार! या कोरसमध्ये गाणाऱ्या मुली देखील तरुण आहेत. त्यांच्या देखील भावना या शब्दांनी खूप भरून आल्या आहेत!!” नौशाद यांनी ब्रेक घेतला आणि सर्वांना चहा दिला. आणि शमशादला विचारलं, ”आपण रेकॉर्डिंग उद्या करायचं का?” त्यावर त्या म्हणाल्या, ”नको नको आजच आणि आत्ताच रेकॉर्डिंग करू. कारण तुमच्या गाण्यात जे जजबात हवेत ज्या भावना हवेत त्या आत्ताच योग्य रीतीने मिळतील!” नंतर गाण्याच रेकॉर्डिंग पूर्ण झालं. (Entertainement mix masala)

===============

हे देखील वाचा : V. Shantara : सेहरा चित्रपटातील रफीच्या गाण्याचा बेहतरीन किस्सा!

===============

दुसऱ्या दिवशी Naushad यांनी ते गाणं मेहबूब यांना ऐकवलं आणि म्हणाले की, ”हे गाणं गाताना संपूर्ण स्टुडिओमधील महिला अखंड रडत होत्या. त्यावर Mehboob Khan म्हणाले “नौशाद जी हे गाणं गाताना सिंगर्सची ही अवस्था झाली तर चित्रपट पाहताना प्रेक्षकांची काय अवस्था होईल? हा चित्रपट आणि हे गाणं शंभर टक्के यशस्वी होणार आणि भारतातील प्रत्येक स्त्री हा चित्रपट कायम लक्षात ठेवणार याची गॅरंटी मी आत्ताच देतो!” (Mother India)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor aurat Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured mother india shakil badayuni shamshad begum
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.