Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रसाद ओकचा अगामी सिनेमा ‘परिनिर्वाण’चं मोशन पोस्टर प्रदर्शित

 प्रसाद ओकचा अगामी सिनेमा ‘परिनिर्वाण’चं मोशन पोस्टर प्रदर्शित
kalakruti-motion-poster-of -prasad-oaks-upcoming-marathi-film -parinirvana-out-marathi-info
मिक्स मसाला

प्रसाद ओकचा अगामी सिनेमा ‘परिनिर्वाण’चं मोशन पोस्टर प्रदर्शित

by शुभांगी साळवे 27/04/2023

प्रसाद ओक हल्ली वेगवेगळ्या भूमिकेतून तसेच दिग्दर्शनातून  प्रेक्षकांना अचंबित करत आहे. अनेक दर्जेदार मराठी सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता नुकतचं त्याच्या आगामी ‘परिनिर्वाण‘ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलितांचा उद्धारकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे एकंदरीत जीवन पाहता, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे! ही ओळ त्यांना अतिशय अनुरूप ठरते. अशा या ‘महामानवा’ने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. या मन हेलावणाऱ्या क्षणाचा एक असा साक्षीदार आहे, जो विषमतेच्या वणव्याला न जुमानता, अनेकांना प्रेरणा देत, डौलाने घट्ट उभा राहिला, अशा या महावृक्षाच्या परिनिर्वाणाची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.(Parinirvana Marathi movie)

Parinirvana Marathi movie
Parinirvana Marathi movie

‘परिनिर्वाण’ हा चित्रपट एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याने आपल्या ‘नॅशनल हिरो’साठी एक असामान्य पाऊल उचलले. नामदेव व्हटकर असे या सामान्य व्यक्तिमत्वाचे नाव असून ही व्यक्तिरेखा खुद्द प्रसाद ओक साकारणार आहेत. नुकत्याच एका भव्य सोहळ्यात ‘परिनिर्वाण’च्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपटाच्या इतर टीमसोबत नामदेव व्हटकर यांचे कुटुंबीय ही उपस्थित होते. यावेळी नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावरील चित्रफित दाखवण्यात आली. तसेच नामदेव व्हटकर यांनी टिपलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण यात्रेची आणि गर्दीची काही चित्रण उपस्थितांना दाखवण्यात आली होती. शैलेंद्र कृष्णा बागडे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माता सुनिल शेळके आहेत. या सिनेमात प्रसाद ओक यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत अंजली पाटील असून रोहन – रोहन यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. 

Parinirvana Marathi movie
Parinirvana Marathi movie

‘नामदेव व्हटकर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रसाद ओक म्हणतात, ”जेव्हा एखादा सिनेमा माझ्याकडे येतो तेव्हा मी माझी भूमिका बघण्याआधी सिनेमा काय आहे, ते बघतो मग त्या सिनेमात माझी व्यक्तिरेखा काय करतेय, ते बघतो. या चित्रपटाची संहिता ऐकताना पहिल्या पानापासून काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्याचे जाणवले. मला नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारायला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो, नामदेव व्हटकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. प्रत्येक वाटेवरचा त्यांचा प्रवास अत्यंत अवघड होता आणि लेखकाने तो अतिशय सुंदर गुंफला आहे. ती सुंदरता आणि सहजता पेलवून नेण्याकरता माझा कस लागणार आहे. परिनिर्वाण झाल्यानंतर मोक्ष मिळतो, मात्र त्यासाठी माणसाला मृत्यू यावा लागतो. परंतु मला जीवंतपणी परिनिर्वाण करायला मिळणार आहे. ही कलाकृती आम्ही उत्तम करू शकलो तर प्रेक्षकांना आणि आम्हालाही समाधानाचा मोक्ष मिळणार आहे.’’ 

त्याबरोबर नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र जयवंत व्हटकर या सिनेमाबद्दल म्हणतात, की, ” आज आम्ही भावंडं जे काही घडलो ते आमच्या वडिलांमुळेच, आमच्यात जो काही बदल आहे, त्यामागे वडिलांचीच पुण्याई आहे. माझ्या वडिलांमध्ये परिस्थितीशी झगडण्याचा गुण होता. ही फिल्म ज्यावेळी त्यांनी बनवली तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. मात्र वडिल जाण्यापूर्वी आमची या विषयावर चर्चा व्हायची. या ‘महामानवा’ने आपल्या समाजासाठी विशेषत: अस्पृश्य समाजासाठी आपले रक्त आटवले आहे, त्यामुळे त्यांचे महत्व आजच्या पिढीसमोर, घराघरांत पोहोचवण्याचा माझ्या वडिलांचा प्रयत्न होता. या महायात्रेच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आमचे घर गहाण ठेवले होते, छापखाना विकला होता.”(Parinirvana Marathi movie)

===========================

( हे देखील वाचा: शाळेची घंटा वाजणार ! ‘बॅक टू स्कूल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला )

===========================
‘परिनिर्वाण’चे मोशन पोस्टर अंगावर अक्षरशः शहारा आणणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकारच नसून ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदारही होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: dr.babasaheb ambedkar Entertainment Marathi Movie namdev vhatkar Parinirvana Marathi movie Prasad Oak prasad oak movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.