DEVMANUS : लव फिल्म्सच्या बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ हे रोमँटिक

Chhaava : मुंबईत बॉलिवूडचीच हवा; मग मराठी चित्रपट कुठे गेला?
ज्या क्षणाची किंवा ज्या दिवसाची खरं तर प्रत्येक शिवप्रेमी वाट पाहात होते तो दिवस अखेर आला… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा अखेर पार केला आहे… ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ चित्रपटानंतर ६०० कोटी पार करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे.. बरं एकामागून एक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड्स छावाने मोडलेच पण फक्त मुंबई सर्किटमध्ये २०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘छावा’ तिसरा चित्रपट ठरला आहे.. या सगळ्यात केवळ बॉलिवूड किंवा साऊथचे (Bollywood And Tollywood) चित्रपट जे हिंदीत डब केले गेले त्यांच्यात उल्लेख येतो.. पण बॉक्स ऑफिसच्या आकड्यांच्या या खेळात मराठी चित्रपट (Marathi Movies) कुठेच दिसत नाही आहेत… नेमकं काय गंडतय? मराठी चित्रपटच मुंबईत आपली जागा तयार का करु शकत नाहीयेत याची काही कारणं जाणून घेऊयात… (Entertainment news)

मुंबई सक्रिटमध्ये बॉलिवूडचाच बोलबाला
‘छावा’x चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झाला.. पहिल्याच आठवड्यात २१९.२५ कोटी कमवत छावाने ग्रॅड ओपनिंग केली होती.. आता नवव्या आठवड्यात यशस्वी घोडदौड करत चित्रपटाने ६०१.३ कोटींची कमाई केली आहे… छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर चित्रपटरुपात साकारत असल्यामुळे नक्कीच देशभरासह महाराष्ट्र आणि मुंबईत प्रेकांनी चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला… एकट्या मुंबई सर्किटमध्ये ‘छावा’ चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.. या आधी ‘पुष्पा २’ (Pushpa 2) आणि ‘बाहुबली २’ (Bahubali 2) या साऊथ चित्रपटांच्या हिंदी डबने १५० कोटींचा टप्पा पार केला होता.. तर ‘स्त्री २’ (Stree 2) या एकट्या बॉलिवूड चित्रपटाने केवळ मुंबईत १५० कोटी पार केले होते त्यात आता ‘छावा’ची एन्ट्री झाली आहे.. मुंबई हे वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटाचं खरं तर हब आहे… बॉलिवूडचा पूर्णपणे मुंबईवर हॉल्ड जरी असला तरी आता त्यात साऊथ चित्रपटेंच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक विभागले गेलेयेत.. पण या सगळ्यात आपला मराठी चित्रपट कुठेच दिसत नाहीये…. हिंदी किंवा साऊथ चित्रपट जे मुंबईत रिलीज होतात त्यांच्यासोबत मराठी चित्रपटही रिलीज होतात.. पण मराठी चित्रपटांना प्रेक्षक फारसा दिसत नाही आहे.. त्याची कारण काय असतील? (Bollywood news)

प्रेक्षकांना मराठी चित्रपट किंवा नाटक पाहायला आता आवडत नाहीये का? तर तसं नाही आहे.. कारण मराठी नाटकं हाऊसफुल्लच्या पाट्या नाट्यगृहांबाहेर लावत आहेत… किंवा मग बाईपण भारी देवा सारखे चित्रपट पाहण्यासाठी घरातील स्त्रीया बाहेर पडून आवर्जून चित्रपट पाहात आहेत.. म्हणजेच काय तर प्रेक्षकांना मराठी कलाकृती पाहायच्या आहेत.. पण कदाचित सध्या त्यांच्या आवडीचे विषय किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे जर का कथा मांडल्यात जात नसल्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक फारसा प्रतिसाद देत नाहीयेत हे कारण नक्कीच असू शकतं.. (Marathi films)
कथानकाची मांडणी आणि…
मराठी चित्रपट हा content drivern आहे… मराठी चित्रपटांचा प्रमुख नायक ही कथा आहे.. पण आता मुळ कथेचं लिखाण आणि त्यानंतर त्याची मांडणीच गंडली आले आणि त्यामुळे मोठ्या प़डद्यावर जे execution दिसतंय ते प्रेक्षकांना आवडत नाही आहे.. प्रेक्षकांना झोंबिवलीसारखा हॉरर कॉमेडी चित्रपटही आवडतो, संगीत मानापमान सारखा classical music चित्रपटही भावतो आणि तोच प्रेक्षक फसक्लास दाभाडे या फॅमेली entertaining चित्रपटालाही भरघोस प्रतिसाद देतो.. मात्र, वेगवेगळे विषय मांडण्याची continuity मराठी मेकर्स ठेवत नसल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहायला येत नसावे… किंवा पूर्वीच्या काळी जसे विनोदी चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहता येत होते तसे विनोदी चित्रपट आता फारसे येत नाहीत.. विनोदाचा दर्जा जरा उतरल्यामुळे किंवा तोचतोचपणा आल्यामुळेही प्रेक्षक कदाचित कंटाळले असावेत… आणि या वातावरणात प्रेक्षकांना बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री इतके वेगवेगळे चित्रपट, कथा, genere देत आहेतत्यामुळे मराठी चित्रपट या शर्यतीत पुढेच येत नाहीये.. हिंदी किंवा टॉलिवूडमध्ये बायोपिक्स, ऐतिहासिक, थ्रिलर अशा चित्रपटांची रांग लागलीच की त्यांना कॉपी न करता मराठी चित्रपटांनी वेगळे विषय मांडले तर नक्कीच त्यांना प्रतिसाद मिळू शकतो.. (Entertainment trending news)
===========================
हे देखील वाचा: Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
===========================
मल्टिप्लेक्स आणि प्राईम टाईम शो
यानंतर अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे मराठी चित्रपटांना न मिळणारे मल्टिप्लेक्समधील शो आणि प्राईम टाईम शो…. मुंबईतील एकपडदा चित्रपटगृह म्हणजे सोप्प्या भाषेत सांगायचं तर सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद झाल्यामुळे त्याचा सर्वात वाईट परिणाम मराठी चित्रपटांवर झाला आहे.. कारण मल्टिप्लेक्समध्ये डिस्ट्रीब्युटर्सना हिंद आणि साऊथचे ओरिजनल आणि डब चित्रपट एकाच दिवसात कोटींची कमाई करुन देतात.. पण इथे मुळातच मराठी चित्रपटांचं संपूर्ण budget हे फारचं चौकटीत असल्यामुळे त्यांचं आर्थिक गणित जरा बिघडत… परिणामी मार्केटिंग किंवा अलीकडे सुरु झालेलव्या प्रमोशनल activities यात अधिक पैसे जात असल्यामुळे प्राईम टाईम शो मिळवणं मराठी चित्रपटांना कठिण होतं चाललं आहे..

मुंबईतच जर का मराठी चित्रपटांना शो मिळत नसतील तर ही फारच गंभीर बाब आहे असं म्हणावं लागेल.. यासाठी काहीतरी उपाय काढायलाच हवे.. मग काय करता येईल तर हिंदी आणि साऊथ चित्रपटांच्यासमोर मराठी चित्रपट रिलीज होण्याचं प्रमाण काही अंशी कमी करता येईल का हे पाहावं लागेल.. किंवा सिंगल स्क्रिन थिएटर सुरु करुन तिथे फक्त मराठी चित्रपट दाखवले जावे…. तसंच.. प्रेक्षकांमध्ये मराठी चित्रपटांची curiosity अधिक निर्माण करण्याची देखील गरज आहे… आणि या सगळ्यात मराठी चित्रपटांनी technology मध्ये स्वत:ला अपग्रेड करत आपली मुळं, आपली संस्कृती आणि आपल्या मातीतली गोष्ट सोड़ता कामा नये… आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मराठी चित्रपटांचं बजेट किंवा मराठी चित्रपटांना चांगले निर्माते किंवा निर्मिती संस्थांचं पाठबळ मिळणं देखील तितचं गरजेचं आहे.. (Chhaava movie)
===========================
हे देखील वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj : शिवराय साकारलेल्या ’या’ अभिनेत्यांना पूजतात!
===========================
वर्षभरात ३-४ मराठी चित्रपट कोटींच्या घरात असावेत
पण जसं नाण्याला दोन बाजू असतात तसंच केवळ मेकर्सने आपल्या चित्रपटांवर केवळ मेहनत करुन भागणार नाही तर सध्या रिलीज होत असलेले मराठी चित्रपटही प्रेक्षकांना आवर्जून पाहून त्यावर आपली मतं दिली पाहिजे.. इतर भाषांसोबत मराठी चित्रपटही स्वत:हून पाहिले गेले तरच मुंबईत मराठी चित्रपट मोठा होऊ शकतो.. आणि बॉलिवूड, टॉलिवूडच्या शर्यतीत स्वत:चं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करु शकतो… जाता जाता आणखी एक सांगायचं होतं.. १०० कोटींचा टप्पा पार करणारा सैराट हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.. त्यानंतर बाईपण भाऱी देवा, वेड अशा मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी गाठले.. आणि आपण अजूनही त्याच चित्रपटांना कवटाळून बसलो आहोत.. अभिमान आणि आनंद आपल्याला असायला हवाच पण या सगळ्यात प्रेक्षक आणि मेकर्स यांनी मनी एक निर्णय पक्का केला पाहिजे की वर्षभरात किमान ३-४ १०० कोटींचे मराठी चित्रपट आपण दिलेच पाहिजे… आणि तसं जर का झालं तर हिंदी आणि साऊथच्या तोडीस तोड आपण उभे राहू शकतो…
आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) येणार आहे.. ज्याचं दिग्दर्शन रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतही रितेशच दिसणार आहे.. तसंच, ‘साडे माडे तीन’, ‘येरे येरे पैसा’ अशा चित्रपटांचे सीक्वेल्सही रिलीज होणार आहेत.. त्यामुळे येत्या काळात रिलीज होणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांनीही आवर्जून पाहावे आणि आपल्या मराठी चित्रपटाचं अस्तितव त्यांनीही टिकवून ठेवावं हिच विनंती…..
रसिका शिंदे-पॉल