दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
या हॉलीवूडपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना आले होते विचित्र अनुभव
हॉरर चित्रपटांचा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग आहे. या प्रेक्षकवर्गाला हॉलिवूडचे चित्रपट विशेष भावतात. अर्थात यात काही विशेष नाही. हॉलिवूडमध्ये चित्रपट बनवताना वापरण्यात येणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान, लोकेशन्स, साउंड इफेक्टस यांच्यामुळे चित्रपट बघताना थरार अनुभवता येतो. पण अशा चित्रपटांचं चित्रीकरण करताना कलाकार, तंत्रज्ञ किंवा संपूर्ण टीमला असाच थरारक अनुभव आला तर? अशाच काही हॉलीवूडपटांबद्दल माहिती घेऊया ज्यांच्या चित्रीकरण दरम्यान विचित्र, भयानक अनुभव आले होते (Mysterious Incidents on Horror Movie Sets)-
द एक्सॉसिस्ट (1973)
या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेला संपूर्ण सेट जळून खाक झाला आणि तो पुन्हा बांधावा लागला. तसंच सेटवर सुरक्षा रक्षक आणि एफएक्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. चित्रपटातील अभिनेता जॅक मॅकगॉवरन याचा चित्रीकरणानंतर काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेक प्रेक्षकांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अर्थात असं असलं तरी आजच्या काळातही अनेकजण आवडीने हा चित्रपट बघतात. तुम्हालाही हा चित्रपट बघायचा असेल, तर अमेझॉन प्राईम, गुगल प्ले मुव्हीज अँड टीव्ही आणि यु ट्यूबवरही उपलब्ध आहे. पण यासाठी पैसे खर्च करावे लागतील कारण युट्यूबवर फ्री मध्ये उपलब्ध नाहीये. IMDB वर या चित्रपटाला 8.1 रेटिंग देण्यात आलं आहे.
द ओमेन (1976)
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विचित्र अनुभवांची शृखंलाच सुरु होती. द ओमेनच्या चित्रीकरणादरम्यान नायकाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे. त्याचं कारण कधी समजलंच नाही. आयुष्यात कोणतीही समस्या नसताना आणि अगदी आदल्या दिवशीपर्यंत आनंदात असणाऱ्या मुलाने आत्महत्या का केली हे एक न सुटलेलं कोडं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही दिवसातच स्पेशल इफेक्ट डायरेक्टर जॉन रिचर्डसन यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे चित्रपटामध्ये असाच अपघाताचा प्रसंग चित्रित करण्यात आला होता. आणि स्थळ व तेथीक काही तपशीलही सारखेच होते. याशिवाय अनेक प्रसंग आहेत. ते यासंबंधित प्रसिद्ध झालेल्या स्वतंत्र लेखात वाचायला मिळतील.
हा चित्रपट कुठेच उपलब्ध नाहीये. पायरेटेड व्हर्जन उपलब्ध असल्यास त्याबद्दल माहिती नाही. IMDB वर या चित्रपटाला 7.5 रेटिंग देण्यात आलं आहे. (Mysterious Incidents on Horror Movie Sets)
द एक्सॉर्सिझम ऑफ एमिली रोज (2005)
चित्रीकरण सुरू असताना, मुख्य अभिनेत्री जेनिफर कारपेंटरचे रेडिओ अलार्म घड्याळ वारंवार चालू होत असल्याची तक्रार केली. हे घड्याळ चालू झाल्यावर प्रत्येक वेळी फक्त एकच गाणे प्ले होत असे – ते होते पर्ल जॅमचे अलाइव्ह. यानंतर टीममधील अजूनही काही सदस्यांनाही असाच अनुभव आल्याची तक्रार त्यांनी केली. अखेर सर्वांनी आपल्या हॉटेलच्या खोल्यांमधून रेडिओ काढून टाकले आणि या भितीदायक घटना थांबल्या. असं का झालं, याचं स्पष्टीकरण आजपर्यंत कोणीही देऊ शकलं नाहीये.
या चित्रपटाला IMDB वर केवळ 6.7 रेटिंग देण्यात आलं असून बहुदा भारतातल्या कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीये
द एमिटीविले हॉरर (2005)
या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सर्व टीम सेटवर पोचली होती. परंतु चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी सेटच्या जवळच्या किनाऱ्यावर एक मृतदेह वाहून गेला. या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला होता. त्यामुळे काही दिवस चित्रोकरण पुढे ढकलण्यात आले. चित्रीकरणाच्या कालावधीत मुख्य नायक रायन रेनॉल्ड्स आणि इतर टीम सदस्यही दररोज पहाटे 3:15 वाजता उठू लागले. याबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण चित्रपटात दाखविण्यात आलेल्या हत्येची वेळही पहाटे 3:15 हीच होती.
हा चित्रपट प्रेक्षकांनाही फारसा आवडला नसावा कारण IMDB वर या चित्रपटाला केवळ 5.9 रेटिंग देण्यात आलं आहे. (Mysterious Incidents on Horror Movie Sets)
================
हे ही वाचा: रात्री एकटे असाल तर, चुकूनही बघू नका या 5 हॉरर हिंदी सिरीज
नीना गुप्ता यांना जेव्हा निर्मात्याने विचारलं, “तू रात्री इथे थांबणार नाहीयेस”, तेव्हा….
==============
द इनकीपर्स (2011)
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान टीम मेम्बर्सना सतत अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्या खोलीमधले टीव्ही अचानक चालू आणि बंद होत असे. ‘यँकी पेडलर इन’ हे हॉटेल तसं हॉंटेड म्हणून प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये चित्रीकरण करत असताना अनेकांनी विचित्र स्वप्नं पडत असल्याची तक्रार केली होती. चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला तिच्या खोलीत तिच्यासोबत कोणीतरी अदृश्य रूपात वावरत असल्याचे सतत भास होत असत.
हा चित्रपट प्रेक्षकांनाही फारसा आवडला नसावा कारण IMDB वर या चित्रपटाला केवळ 5.5 रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट कुठेच उपलब्ध नाहीये. पायरेटेड व्हर्जन उपलब्ध असल्यास त्याबद्दल माहिती नाही.