सापडला तो चोर
फायनली सुशांतच्या मृत्यू प्रकरणानं नको तो टर्न घेतलाच. आधी नेपोटिझमवरून सुरू झालेला तपास सीबीआयकडे गेला अन आंधळा मागतो एक.. अन देव देतो दोन असं झालं. रिया चक्रवर्तीचे मेसेज चेक करता करता ड्रग्जचा वास यायला लागला ईडीला. आता हे मेसेज तपासायला सुरूवात झाली होती ती मनी लॉंड्रिंग तपासण्यासाठी.. पण त्यातून भलतंच प्रकरण समोर येऊ लागलंय.
झालं.. या प्रकरणात नार्कोटिक्स डिपार्टमेंट आलं. आणि मग टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या.. सुशांतने केलं होतं गांजाचं सेवन.. सुशांत का करत होता गांजाचं सेवन.. त्याला कोण गांजा देत होत? वगैरे वगैरे प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली.
आता काय बोलावं..
मेरा मुह मत खुलवाओ.
आतली बातमी हा धनंजय माने सांगतो आहे ते ऐका. खरंतर गांजा ओढणं ही बातमी नाहीचे मुळी. अरे गांजा कुणीही ओढतं. होय.. आणि हिंदी कशाला कित्येक मराठी कलाकारही गांजा मारतात. होयं. मारतात गांजा. अगदी मुंबई पुण्याचे लोक मारतात गांजा. रेव्ह पार्ट्यांवर पडलेले छापे बघत नाही का आपण..? आता आपले लोक गांजा मारतात म्हणजे तो मिळतो म्हणून मारतात. अहो, पुण्याच्या अट्टल सदाशिव पेठपर्यंत गांजा पोचला असेल तर तिथं हे बॉलिवूडवाले काय चीज आहेत ते नव्यानं सांगायला नको की. आणि गांजा कशाला.. कोकेनपासून इतर अनेक गोष्टी ओढतात हे लोकं. काही वर्षांपूर्वीचा फरदीन खान आठवतोय का? गेला बाजार प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन यांचा पीए.. मोईत्रा.. आठवतोय.. नाही? गुगल करा. मोईत्रा साहेबांना कसला ओव्हरडोस झाला होता ते शोधा. मिळेल उत्तर.
बॉलिवूडचे ढीग कलाकार ड्रग्जचं सेवन करतात. तो त्यांच्या जगण्याचा भागच झाला आहे हो. आता ते कुठून येतं.. कसं येतं.. हे बघायला हवं ना. आता ते विकणारा कोणीतरी असेलच की… त्याशिवाय का ते पब्लिकला मिळतं.
पण इथं कसं आहे सापडला तो चोर. आता त्या सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयने रिया, संदीप सिंग यांना टारगेट केलं आहे. ते सुब्रमण्यम स्वामी काय येडे आहेत काय, सारखं दुबई कनेक्शन शोधा म्हणायला. सब दुबईसे आता है. संदीप सिंग सारखा दुबईला का पळतो? मोठी प्रोसेस आहे.
बरं ते सोडा, रियाला ते मानेशिंदे वकिल लगेच कसे मिळतात सांगा. ते सलमानचे वकिल आहेत. म्हणजे, त्यांची फी सलमानला परवडते. या बाईला कशी परवडली? आणि एका दिवसांत ते वकिल तिला मिळाले कसे? याने कोई बडा बंदा शामील हे इस मे…
आता सगळ्या बॉलिवूडची लागलीये. नार्कोटिक्स आलं ना यात. आता सगळे सापडणार.. म्हणजे सापडायला हवेत. आता आपल्याकडं कसंय.. मॅनेज होतात गोष्टी. फरदीन खान जेव्हा सापडला तेव्हा लावलेला सापळा अचानक काढण्यातचं आला ना. आता तो सापळा का उठवला.. कुणाच्या आदेशाने उठवला.. त्याय नको पडायला. रात गयी बात गयी. लेकीन इस रात की सुबह लगती है नही होगी…
आईच्या गावात… होऊ दे खर्चं.
धनंजय माने