Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गिरीजा ओकला पाहून Emraan Hashmi देखील झालेला फिदा!; एकत्र विमान प्रवासातला ‘तो’ किस्सा चर्चेत

 गिरीजा ओकला पाहून Emraan Hashmi देखील झालेला फिदा!; एकत्र विमान प्रवासातला ‘तो’ किस्सा चर्चेत
मिक्स मसाला

गिरीजा ओकला पाहून Emraan Hashmi देखील झालेला फिदा!; एकत्र विमान प्रवासातला ‘तो’ किस्सा चर्चेत

by रसिका शिंदे-पॉल 29/12/2025

२०२५ या वर्षात मराठीसह हिंदी फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच घटना घडल्या… बरेच नवे कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून आपल्या भेटीला आले तर काही सेलिब्रिटींचं आयुष्य रातोरात बदललं… त्यापैकी एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak)… निळ्या साडी नेसून लोकांना वेड लावणारी गिरीजा या वर्षातील नॅशनल क्रश झाली… बऱ्याच वर्षांपासून मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये ती कामं कत होतीच; परंतु, एखा मुलाखतीमुळे तिला नॅशनल क्रश ही ओळख मिळाली… पण तुम्हाला माहित आहे का आपल्या या मराठमोळ्य़ा गिरीजाला पाहून चक्क इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) दंग झालेला… नेमका काय होता तो किस्सा जाणून घेऊयात… अभिनेत्री-दिग्दर्शिका कांचन अधिकारी (Kanchan Adhikari) यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा ओक (National Crush Girija Oak) आणि इम्रान हाश्मीचा एक खास किस्सा सांगितला…

२००४ मध्ये गिरीजा आणि स्वप्नील जोशीचा ‘मानिनी’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटाच्या शूटनंतर गिरीजा दुबईवरुन भारतात येत असताना विमानात चक्क इम्रान हाश्मी तिच्याकडे एकटक पाहत होता. हा किस्सा सांगताना कांचन म्हणाल्या की, “२००४ साली मी ‘मानिनी’ हा माझा पहिला चित्रपट केला. आम्ही तीन निर्माते होतो. तिघांनी मिळून पैसे जमवले आणि मानिनी केला. तो पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्याचं परदेशात शूट झालं. आम्ही दुबईला १२ दिवसांचं शूट केलं होतं. गिरीजा ओक जी आता तुमची नॅशनल क्रश आहे ती तेव्हा त्या चित्रपटात होती. आम्ही दुबईवरुन येत होतो तेव्हा विमानात इम्रान हाश्मी होता. तो ‘मर्डर’ (Murder Movie) चित्रपटाचं शूटिंग करुन येत होता. गिरीजा तर तेव्हा कॉलेजमध्ये होती. तेव्हा तिचे लांबसडक सरळ केस होते. तजेलदार त्वचा आणि दिसायला अतिशय सुंदर होती. आजही आहेच. नॅशनल क्रश ती होणारच होती कारण तेव्हा इम्रान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता. त्यामुळे इम्रान हाश्मीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच ना! माझ्या असिस्टंटने येऊन मला सांगितलं की,’मॅडम, बघा तो तिच्याकडे पाहतोय’.” (Entertainment News)

पुढे कांचन म्हणाल्या, “पण आज मला गिरीजा नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेली पाहिल्यावर तिच्या काही व्हिडिओवरील कमेंट्स वाचून वाईट वाटलं. मराठी माणूस आधी पाय खेचण्यातच उस्ताद असतो. अरे तुम्ही तिने आधी काय काय काम केलंय, स्ट्रगल केलाय ते बघा. तिचं ‘गौहर जान’ काय सुंदर नाटक आहे. तिने कधीच चुकीचं काही केलं नाही. अंगप्रदर्शन करुन तिने कधीच प्रसिद्धी मिळवली नाही. तुम्ही तिचं कौतुक केलं पाहिजे. आपली मराठी मुलगी त्या स्टेजवर पोहोचलीये त्याची स्तुती करा’”, असं म्हणत ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिलं आहे… (Bollywood News)

कांचन अधिकारी यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून कामं करत प्रसिद्धी मिळवली… इतकंच नाही तर काही वर्ष त्यांनी बॅंक ऑफ इंडियात नोकरी देखील केली… रंगभूमीवर काम करता करता  दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर भक्ती बर्वे यांच्या प्रोत्साहनाने निवेदिका म्हणून त्यांची निवड झाली. १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या काळात त्यांनी दूरदर्शन वाहिनीवर निवेदिका व वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं…‘बबन प्रभू’ लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून कांचन अधिकारी यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले.  (Kanchan Adhikari)

================================

हे देखील वाचा : न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला पाहून लोकं झाली सैराट!

================================

तर,‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ यांच्यासोबत नायिका म्हणून या चित्रपटात काम केले. पुढ कांचन यांनी बाबा सावंत यांच्या ‘हिचं काय चुकलं?’ या चित्रपटात रंजना, विक्रम गोखले यांच्यासह भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या चित्रपटातही भूमिका साकारली. तसेच, १९९५ मध्ये ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेचं त्यांनी दिग्दर्शन करत अनेक पुरस्कारही मिळवले… याव्यतिरिक्त आगे की सोच’,  ‘ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियॉं’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय ‘अभी तो मै जवान हूं’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियॉं’, ‘हॅंसी वो फसी’ या हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केलं आहे. (Girija Oak National Crush)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Emraan Hashmi emraan hashmi movies Girija Oak girija oak movies kanchan adhikari manini movie murder movie national crush girija oak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.