Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला स्वीकार; ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यावधींची मालकीण
फिल्म इंडस्ट्री म्हटलं की सुपरस्टार हा एक शब्द येतोच… आणि तो एखादा अभिनेताच असतो… म्हणजे कितीही फिमेल सेंट्रिक चित्रपट आले तरीही लीड रोलच्या बाबतीत कायम अभिनेत्याची वाहवा किंवा मानधनही त्यांनाच जास्त दिलं जातं असं दिसून येतं.. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री आहे जी सध्या साऊथ इंडस्ट्रीमधील (South Film Actress) सर्वात Higest Paid अभिनेत्री तर आहेच पण तिने चक्क ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्म स्वीकारला आहे… कोण आहे ही अभिनेत्री आणि तिचा स्टारडम आहे तरी किती जाणून घेऊयात…(Entertainment News)

बॉलिवूडच्या किंग खानसोबत खरं तर हिने एकच चिपट केला पण अख्ख्या इंडस्ट्रीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं… ती अभिनेत्री म्हणजे नयनतारा (Nayantara)… लेड सुपरस्टार अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या नयनतारा हिचं वैयक्तिक जीवन फारच इंटरेस्टिंग आहे… कर्नाटकात जन्म झालेल्या नयनतारा हिचं खरं नाव ‘डायना मरियम कुरियन’. भारतीय हवाई दलातील अधिकारी असणाऱ्या कुरियन कोडियाट्टू आणि ओमाना कुरियन यांची मुलगी असून तिचा मुळ धर्म ख्रिश्चन होता… मात्र, नयनताराने चेन्नईच्या आर्य समाज मंदिरात जाऊन वयाच्या २७ व्या वर्षी हिंदु धर्म स्वीकारला… त्यानंतर २०२२ साली तिने फिल्ममेकर विग्नेश शिवनसोबत लग्न केलं होतं…

नयनताराच्या वैयक्तिक जीवनानंतर आता तिच्या चित्रपटांच्या कारकिर्दिकडे वळूयात…तिने अभिनयाची सुरुवात २००३ साली मल्याळम चित्रपटसृष्टीतून केली होती. ‘मनसिनक्कारे’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या नयनतारा हिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता प्रेक्षकांचं तिनं लक्ष वेधलं होतं…यानंतर २००५ मध्ये तिचा ‘अय्या’ हा तामिळ चित्रपट आला होता आणि या चित्रपटामुळे दाक्षणित्य चित्रपटसृष्टीत तिला विशेष प्रसिद्धी मिळाली होती…सद्यस्थितीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी नयनतारा असून एका चित्रपटासाठी जवळपास १० कोटी इतकं मानधन ती घेते…(Nayantara Movies)
================================
=================================
नयनतारा हीचं २०० कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ मुंबईत १०० कोटींची किंमत असणारे 4BHK फ्लॅट्स नयनताराच्या नावी आहेत… इतकंच नाही तर,तिच्याकडे लग्जरी कारचं कलेक्शन असून एका प्रायव्हेट जेटची देखील ती मालकीण आहे… ‘जवान’ (Jawan Movie) नंतर पुन्हा ती बॉलिवूडमध्ये दिसावी अशी जरी तिच्या चाहत्यांची इच्छा असली तरी सध्या तरी तिचा काही तसा प्लॅन दिसत नाही आहे… सध्या नयनतारा ‘मूकुथी अम्मान २’ या चित्रपटाच्या मेकिंगमध्ये बिझी असून याचित्रपटासोबतच ती अनिल रविपुडी आणि मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबतही एका नव्या चित्रपटात झळकणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi