Gulkand : हिंदी चित्रपटांना ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची

Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
Angry Young Man अशी ओळख कमावणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आजवर आपण विविध भूमिकांमधून पाहिलं आहे. अशीच त्यांची एक वेगळी अभिनयाची बाजू मांडणारा चित्रपट ‘भूतनाथ’ (Bhoothnath) २००८ मध्ये आला होता. ज्यात अमिताभ बच्चन चक्क भूत झाले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक अधिकच बच्चन यांच्या प्रेमात पडले होते. चित्रपटात त्यांच्या बायकोची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांनी केली होती. नीना यांनी अमिचाभ बच्चन यांच्या मोठेपणाचा एक खास किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. (Bollywood news)

नीना कुळकर्णी म्हणाल्या की, “ ‘भूतनाथ’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बायकोची मी भूमिका केली होती. तर त्यासाठी एकूण ७ सीन्स आम्ही एकत्र केले होते त्यातले ३-४ सीन्सच ठेवण्यात आले. असो… पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत ७ सीन्स शुट करणं म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. चित्रपटात मी फार आजारी असते आणि त्यामुळे माझं शरीर अशक्त झालं आहे असं एकंदर तो सीन होता. वेगवेगळ्या अॅंगल्सने शुट करावं लागत असल्यामुळे मध्येच थांबवलं जातं. पण मी कट जरी दिग्दर्शकाने म्हटलं असेल तरी त्याच इमोशन्समध्ये राहणारी कलाकार असल्यामुळे मी कुणाशी कट झाल्यावरही बोलत नसे”. (Untold stories)

पुढे नीना म्हणाल्या की, “तर तो भावनिक सीन शुट होत होता आणि मध्ये अॅंगल बदलत असल्यामुळे ब्रेक घेण्यात आला होता. त्यावेळी लहान मुलं सेटवर होती काही नवे असिस्टंट होते तर बच्चन साहेब त्यांच्याशी गप्पा मारत होते. मात्र, एका क्षणाला त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांनी टीमला सांगितलं की आता जास्त उशीर करुन चालणार नाही कारण ती म्हणजे मी इमोशन्स सांभाळून कॅरेक्टर मध्येच असल्यामुळे लवकर शुट करणं गरजेचं आहे. ते ऐकून मला फार छान वाटलं”. (Bhoothnath movie)

“अमिताभ बच्चन सारख्या मेघास्टारने मी कॅरेक्टरमध्येच आहे याची दखल घेणं आणि त्यासाठी लवकर शुट करण्याची गरज चित्रपटाच्या टीमला दाखवून देणं ही फार मोठी बाब होती. त्यामुळे चित्रपट जरी संपला, शुट पुर्ण झालं तरी या अमुल्य गोष्टी कलाकाराला कायमस्वरुपी स्वत:कडे ठेवता येतात”,अशी फारच अभिमानास्पद आठवण नीना यांनी शेअर केली. (Amitabh bachhcan)
===============================
हे देखील वाचा: Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….
===============================
नीना कुळकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं कर मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट, हिंदी चित्रपट आणि मालिकाविश्व देखील त्यांनी गाजवलं आहे. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘वटवट सावित्री’, ‘महासागर’, ‘ध्यानीमनी’, ‘देहभान’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. याशिवाय ‘सवत माझी लाडकी’, ‘एबीसीडी’, ‘अनुमती’, ‘शर्यत’, ‘फोटो प्रेम’, ‘मिडियम स्पाईसी’, ‘गोदावरी’, ‘मोगरा फुलला’ अशा अनेक मराठी आणि ‘नायक’, ‘पहेली’, ‘गुरु’, ‘हंगामा’, ‘गुडबाय’ अशा हिंदी चित्रपटांतही झळकल्या आहेत. (Neena Kulkarni movies)