Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar ने केली काम, नाती आणि सोशल मीडियापासून ब्रेकची घोषणा !
बॉलिवूड गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. नेहाने अचानकपणे आपल्या आयुष्यातील काम, जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं संकेत दिले. इतकंच नव्हे तर तिने पापाराझींनाही स्वतःपासून अंतर ठेवण्याची विनंती केली होती. नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे मनातील भावना व्यक्त केल्या. पहिल्या स्टोरीमध्ये तिने लिहिलं होतं की सध्या तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरू आहेत आणि त्या सगळ्यांपासून ब्रेक घेण्याची गरज तिला वाटते आहे. आपण पुन्हा परत येऊ की नाही, याबाबतही तिला खात्री नसल्याचं तिने सूचक शब्दांत सांगितलं. (Neha Kakkar)

यानंतर काही वेळातच तिने दुसरी स्टोरी शेअर करत पापाराझी आणि चाहत्यांना आवाहन केलं की त्यांनी तिचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करू नयेत. “माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा आणि मला शांततेत जगू द्या,” अशी भावनिक विनंती तिने केली होती. कॅमेऱ्यांपासून दूर राहणं हीच सध्या तिच्यासाठी खरी शांती असल्याचंही तिने नमूद केलं.मात्र या दोन्ही स्टोरीज काही मिनिटांतच डिलीट करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मते नेहाचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं असावं, तर काही जण याकडे प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न म्हणून पाहत आहेत. याबाबत नेहा कक्करकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

हे पहिल्यांदाच नाही की नेहाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधीही ती अनेकदा मानसिक तणाव, ट्रोलिंग, नकारात्मक प्रतिक्रिया आणि इंडस्ट्रीतील दबाव याबद्दल उघडपणे बोलली आहे. २०२० साली झालेल्या वादाच्या काळातही तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. तसेच काही वेळा नैराश्य आणि चाहत्यांच्या टीकेमुळे ती भावनिक झाल्याचंही दिसून आलं आहे. (Neha Kakkar)
================================
हे देखील वाचा: SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!
================================
दरम्यान काही दिवसांपूर्वीच नेहा तिच्या नव्या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत होती. त्या व्हिडिओमधील काही बोल्ड डान्स स्टेप्सवरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेहाने घेतलेला हा ब्रेक नेमका काय संकेत देतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.