Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि वैभवमध्ये पडणार वादाची ठिणगी
बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरू झालं आहे. यंदा घरात एकाहून एक तगडे सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे. अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे.(Nikki and Vaibhav Fight in big boss Marathi)

आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.’बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. आता आणखी एक नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात 25 व्या दिवशी निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ‘सत्याचा पंचनामा’ हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. दरम्यान वैभव म्हणतो,”निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर घेणार नाही”. यावर निक्की म्हणते,”मी माझ्या मतावर ठाम आहे”. त्यावर वैभव निक्कीला म्हणतो,”तू थेट तुझं मत मांडू शकत नाही”. दुसरीकडे घन:श्याम म्हणतोय,”निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो”.(Nikki and Vaibhav Fight in big boss Marathi)
=================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi च्या घरात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत पडणार फूट
=================================
वैभव निक्कीला म्हणतो,”तुला बोलण्याचा मला हक्क आहे”. सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हेदेखील लवकरच समोर येईल. ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला रोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि विनामूल्य officialjiocinema वर पाहता येईल.