‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Nitin Desai Death: सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची गळफास लावून आत्महत्या
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि 4 राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत च्या एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी पहाटे गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात ते नैराश्याशी झगडत असल्याचे समोर आले आहे. या बातमीने मराठी सिनेसृष्टी सह बॉलिवूडला ही धक्का बसला आहे.दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. नितीन यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एनडी स्टुडिओत काम करणाऱ्यांना सकाळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला अशी ही माहिती समोर आली आहे.(Nitin Desai Death)
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 4 जुलै 2023 रोजी नितीन देसाईंनी लालबागच्या राजाच्या मंडपाचं आणि सेटचं काम सुरु केलं होतं.मंडप पूजन आणि सजावटीला सुरुवात करण्याआधी केलेल्या पूजेचे फोटो ही नितीन देसाईंनी सोशल मिडिया अकाउंट पोस्ट केले होते.लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, ‘1942 अ लव्ह स्टोरी’,’माचिस’, ‘देवदास’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवला होता.
नितिन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर आमदार महेश बालदी यांनी एएनआय शी बोलताना त्यांच्याबद्द्ल माहिती दिली. ते म्हणाले ”काही आठवड्यांपूर्वी त्यांची नितिन यांच्याशी भेट झाली होती. ते मागील काही महिन्यांपासून आर्थिक तणावात होते. मागील एक महिन्यांपासून त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये लहान मालिकांचेच काम सुरु होते. मोठ्या प्रोजेक्टचे काम मिळते नव्हते, अशी खंतही त्यांनी बालदी यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती. त्यामुळे नितीन चंद्रकांत देसाई यांनी जीवन संपविण्यामागे आर्थिक संकट हेच एकमेव कारण असू शकते, असेही बालदी यांनी स्पष्ट केले आहे.(Nitin Desai Death)
=======================
=======================
नितीन देसाई या मराठमोळ्या माणसाने केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टितही आपल्या कामाने नाव कमावले होते. त्यांनी १९८९ मध्ये कला दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘परिंदा’, ‘आ गले लग जा’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘विजेता’, ‘दिलजले’, ‘माचिस’, ‘लगान’, ‘इश्क’, ‘जंग’, ‘मिशन कश्मीर’, ‘वन 2 का 4’, ‘राजू चाचा’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘दोस्ताना’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.