Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Ashok Saraf : “ ‘त्या’ सीनसाठी मी शाहरुखला सल्ला दिला आणि….”
इंडस्ट्रीतले काही कलाकार असे असतात ज्यांची खरं तर वेगळी ओळख करुन द्यायची गरजच नसते… असे दोन कलाकार म्हणजे पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan)… या दोन्ही कलाकारांनी जवळपास ५-६ चित्रपटांमध्ये एकत्र काम आजवर केलं आहे… त्यामुळे त्याच्या प्रत्येक सहकलाकारांनी त्याच्या स्वभावाचं कौतुक वारंवार केलेलं आपण वाचलं, ऐकलं आहे… पण आता फिल्मी इंडस्ट्रीच्या एका उस्तादाने दुसऱ्या उत्सादाच्या अभिनयाचं केलेलं कौतुक सध्या चर्चेत आहे… अशोक सराफ यांनी शाहरुखच्या कामाबद्दल बोलताना त्याच्या इतका मेहनती कलाकार आजवर पाहिला नसल्याचं म्हणत आज तो ज्या ठिकाणी आहे हे त्याने स्वबळावर कमावलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे… नेमकं अशोक मामांमी शाहरुख खानबद्दल काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… (Bollywood News)

तर, अशोक सराफ आणि शाहरुख खान यांनी आजवर ‘येस बॉस’, ‘आर्मी’, ‘करण-अर्जून’, ‘कोयला’, ‘गुड्डू’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहे… त्याच्या अभिनयाबद्दल नुकतंच रेडिओ नशासोबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की, “इंडस्ट्रीमध्ये त्याच्याइतका मेहनती कोणीही नाही. तो त्याच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो. एखादी भूमिका उत्तम कशी साकारता येईल, यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो. तो मेहनत न करता इतका मोठा अभिनेता झाला नाही. एखादी भूमिका साकारताना तो छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने विचार करतो. आणि त्यामध्ये काही कमी राहू नये, यासाठी प्रयत्नशील असतो.” (Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: ‘कजरा रे’ गाण्याबद्दल Amitabh Bachchan यांना होती शंका, शुट करायला दिलेला नकार
=================================
पुढे अशोक सराफ असं देखील म्हणाले की, “ एकदा मी शाहरुखला एक सीन करण्यासाठी सल्ला दिला होता. विशेष म्हणजे शाहरुख ते काळजीपूर्वक ऐकत होता आणि ते अवलंबण्याचा प्रयत्न देखील करत होता. काही कलाकारांना इतरांनी सल्ले दिलेले अजिबात आवडत नाहीत. ते पुन्हा एखादा सीन करण्यासाठी थेट नकार देतात. पण शाहरुख एखादा सीन व्यवस्थित होण्यासाठी सराव करत असतो. तो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा योग्य परिणाम होतोय की नाही, हे देखील तो चाचपडत असतो. तो फक्त चांगला अभिनेता नाही, तर तो उत्तम माणूसही आहे.” (Bollywood)

“मला जर कोणी विचारले की सगळ्यात जास्त ऊर्जा कोणत्या कलाकारामध्ये आहे? तर मी शाहरुखकडे बोट दाखवेन. त्याच्याकडे इतकी ऊर्जा आहे की ज्यामुळे तो कधीच थांबत नाही. तो कधीच थकत नाही. जे आजच्या काळात फार दुर्मिळ आहे. इतरांनी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्या चांगल्या सवयींमुळेच तो आज जिथे आहे त्या स्थानावर पोहचू शकला आहे”,अशा शब्दांत अशोक सराफ यांनी शाहरुखच्या कामाचं कौतुक केलं आहे…
================================
=================================
खरं तर, मराठी हिंदीतल्या या दोन्ही लेजेंड अभिनेत्यांनी प्रेक्षकांना आजही होल्ड करुन ठेवलं आहे… कितीही विनोदी चित्रपट किंवा विनोदी कलाकार आले तरी अशोक सराफ यांचं स्थान कायमच वरच्या स्थानावर असेल यात शंकाच नाही…. आणि कितीही रोमॅंटिंक चित्रपट किंवा अभिनेते आले तरी SRK ची स्टाईल आणि त्याची टिपीकल पोझ काही कुणाला जमणार नाही… खरं तर ९०च्या दशकात मराठी-हिंदी कलाकारांचे आलेले चित्रपट गाजले आणि आजही ते लक्षात आहेत… असेच काही जुन्या कलाकारांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करावी अशी प्रत्येक प्रेक्षकांची मनोमन इच्छा असेलच… आता ते शक्य होईन न होईल माहित नाही… मात्र, हिंदी इंडस्ट्रीतील शाहरुख खान आणि अशोक सराफ ही जोडी कायमस्वरुपी प्रेक्षकांना लक्षात नक्कीच राहिल…(Bollywood Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi