
शाहिद कपूरच्या ‘O’Romeo’ चित्रपटाचा डॅशिंग टीझर रिलीज
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा बहुप्रतिक्षित ‘ओ रोमिओ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक रिलीज झाली आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणाऱ्या शाहिदचा या चित्रपटात डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘हैदर’, ‘रंगून’ आणि ‘कमिने’ चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा ‘ओ रोमिओ’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे… (Bollywood Movie 2026)
दरम्यान, ‘ओ रोमिओ’ चित्रपटात आजवर कधीही न पाहिलेला शाहिद कपूरचा अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहिद कपूर रक्ताने माखलेल्या चेहऱ्यासह, अंगावर गोंदवलेले टॅटू अशा लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा ‘खूंखार’ रूपाने चाहत्यांची धडकी भरवणारा आहे. शिवाय, ‘पाठशाला’ (Pathshala) चित्रपटानंतर शाहिद आणि नाना पाटेकर एकत्र स्क्रिन शेअर करणार असून या चित्रपटात नाना खलनायक साकारणार असं दिसून येत आहे.

इतकंच नाही तर, दीपिका पादूकोणला रिप्लेस करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) शाहिदसोबत दिसणार आहे… तसेच, तमन्ना भाटिया, दिशा पटानी, विक्रांत मेस्सी आणि अविनाश तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशाल भारद्वाज (Vishal Bharadwaj) यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे हा चित्रपट देखील वास्तववादी आणि तितकाच प्रभावी असण्याची शक्यता आहे. ‘ओ रोमिओ’ चित्रपटाची कथा शेक्सपिअरच्या प्रसिद्ध ‘रोमियो अँड ज्युलिएट’ या नाटकावर आधारित एक ‘डार्क’ आवृत्ती असल्याचे सांगितलं जात आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
================================
================================
शाहिद कपूर याच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, २०२४ मध्ये ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’, २०२५ मध्ये ‘देवा’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. २००३ मध्ये ‘इश्क विश्क’ चित्रपटातून शाहिदने अभिनयाची सुरुवात केली होती.. त्यानंतर, ‘विवाह’, ‘कबीर सिंग’, ‘उडता पंजाब’, ‘मिलेंगे मिलेंगे’, ‘चुप चुपके’, ‘जव बी मेट’ अशा अनेक चित्रपटांतून शाहिदीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. (Shahid Kapoor Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi