Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Padosan : ‘एक चतुर नार करके सिंगार..’ या गाण्यात आणखी कोणत्या दोन  लोकप्रिय गाण्यांच्या ट्यूनचा समावेश होता?

 Padosan : ‘एक चतुर नार करके सिंगार..’ या गाण्यात आणखी कोणत्या दोन  लोकप्रिय गाण्यांच्या ट्यूनचा समावेश होता?
बात पुरानी बडी सुहानी

Padosan : ‘एक चतुर नार करके सिंगार..’ या गाण्यात आणखी कोणत्या दोन  लोकप्रिय गाण्यांच्या ट्यूनचा समावेश होता?

by धनंजय कुलकर्णी 09/02/2026

29 नोव्हेंबर 1968 रोजी हास्य अभिनेता मेहमूद यांचा आयकॉनिक सिनेमा प्रदर्शित झाला होता ‘पडोसन’. हा सिनेमा भारतीय सिनेमातील कॉमेडी मुव्हीज चा बाप होता.  किशोर कुमार मेहमूद  यांच्या जुगलबंदीने सिनेमाला अफाट यश मिळवले.  या चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते.  या सिनेमात एक मुकाबला गीत होते . सुनील दत्त आणि मेहमूद परस्परांच्या समोर खिडकीत बसून गाणे गातात अशी ही एक जुगलबंदी होती.  जी मन्नाडे आणि किशोर कुमार यांनी गायली होती.  मन्ना डे मेहमूद साठी प्लेबॅक देत होते तर किशोर कुमार सुनील दत्त यांच्यासाठी!  हे गाणे म्हणजे विनोदाचा कहर होते.

पूर्वी रेडिओ सिलोन वर हास्य गीत नावाचा एक कार्यक्रम असायचा. त्याचे टायटल म्युझिक याच गाण्याच्या पीसेस मधून बनले होते. वस्तुत: हे गाणे 1941 साल च्या बॉम्बे टॉकीज च्या ‘झुला’ या चित्रपटातील गाण्या वरुन घेतले होते. ‘झुला’ चित्रपटातील हे गाणे अशोक कुमार यांनी गायले होते तर त्याला संगीत सरस्वती देवी यांनी दिले होते.  गाण्याचे बोल होते. ‘एक चतुर नार कर करत शिंगार थारे आपणे ही जाल मे ..’ गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी याच ओळी घेऊन ‘पडोसन’ या चित्रपटासाठी गाणे तयार केले.  ही गोष्ट तुमच्या पैकी अनेक लोकांना ठाऊक असेल पण याच गाण्यातील अंतऱ्यातील दोन  ओळी आणखी दोन वेगळ्या गाण्यांवरून घेतल्या होत्या हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आपल्याला आठवत असेल ‘एक चतुर नार’  या गाण्यांमध्ये जुगलबंदी च्या वेळी दोन अंतऱ्यांमध्ये किशोर कुमार आपल्या गाण्याची मूळ लाइन आणि स्टाईल डायव्हर्ट करून दुसरेच गाणे सुरू करतो!  मेहमूद ओरडतो ‘ये सूर बदल दिया.. ये सूर भटकाया..ये गडबड किया ’ तो असे का ओरडतो? कारण ही गाणी टोटली वेगळी आहेत. ही जी दोन गाणी होती ती देखील दोन  वेगवेगळ्या  जुन्या गाण्यांवर प्रेरित होती.  ही दोन जुनी गाणी कोणती होती?  पहिल्या कडव्यात किशोर कुमार गातो ‘काला रे जा रे जारे अरे नाले मे जा के तू मुंह धोके आ रे काला रे जा रे जारे..’ या ओळी कोणत्या गाण्यावरून घेतले होत्या ? आठवतं?  लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘जिद्दी’(1948) या चित्रपटातील ‘चंदा रे जा रे जा रे पिया से संदेसा मोरा कही यो जा..’  या गाण्यावरून घेतल्या होत्या!

तर दुसऱ्या कडव्यात जेव्हा किशोर कुमार पुन्हा आपल्या गाण्याची मूळ पट्टी / सुर डायव्हर्ट करून वेगळच गाणे सुरू करतो ते गाणं होतं ‘ अरे देखी तेरी चतुराई तुझे सूर की समझ नही आयी तुने कोरी घास ही खाई अरे देखी तेरी चतुराई..’ या ओळी प्रेरीत होत्या  1939  सालच्या ‘संत तुलसीदास ’ या चित्रपटातील ‘बन चले राम रघुराई और संग चले जानकी माई ..’ गाण्यावरून ! आर डी बर्मन यानी मोठ्या खुबीने या दोन गाण्यावरून प्रेरीत होवून या गाण्यात टाकल्या होत्या! आर डी बर्मन  बाप संगीतकार होता. पडोसन सिनेमाच्या संगीताने त्याचा भाव वधारला. भूत बंगला (1965) तिसरी मंजिल (1967) च्या पाठोपाठ हा त्यांचा सुपर हिट सिनेमा होता. खरं तर या सिनेमात सुनील दत्त ने जी भूमिका केली होती ती आधी आर डी ला ऑफर झाली होती. कारण ‘भूत बंगला ‘ या सिनेमात आर डी ने एक भूमिका केली होती आणि ती मेहमूद ला प्रचंड आवडली होती. पण आर डी यांच्या वडीलांनी म्हणजे सचिन दा यांनी आर डी ला फक्त म्युझिकवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आणि मग आर डीच्या जागी सुनील दत्तची वर्णी लागली!

================================

हे देखील वाचा : Rajesh Khanna आणि सायरा बानो हे दोन समकालीन कलाकार का एकत्र येऊ शकले नाही?

================================

अभिनेता कमल हासन यांचा हा अत्यंत आवडता सिनेमा आहे. या सिनेमाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले होते की,” हिंदी लादण्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनामुळे अनेक वर्षे चेन्नई मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते!” ‘पडोसन’ चित्रपटाबद्दलच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “जेव्हा मी ‘पडोसन’ पाहण्यासाठी गेलो, तेव्हा मी त्याचा निषेध करण्यासाठीच  गेलो होतो – आम्हाला सांगण्यात आले होते की हा असा चित्रपट आहे ज्यात दक्षिण भारतीयांची खिल्ली उडवली गेली आहे. आम्ही आंदोलन करण्यासाठी आत गेलो, पण मेहमूद साहेबांचे चाहते बनून, त्यांची नक्कल करत, हसत-हसत बाहेर आलो. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी मेहमूद साहेबांना भेटलो, तेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली होती!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment News indian classic movie kamal hasan Kishore Kumar padosan 1968 movie padosan movie Saira Banu Sunil Dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.