‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक
काश्मिरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्स उधळून लावून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) यशस्वी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानात सीमेवर खडाजंगी सुरु झाली असून त्याचा परिणाम गंभीर होत चालला आहे. अशात भारताच्या नागरिकांची कडेकोट सुरक्षा लक्षात घेता भारतीय सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. याशिवाय काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सदेखील बंद करण्याच निर्देश देण्यात आले आहेत. (Entertainment)
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आता सर्व ओटीटी आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सना निर्देश दिले आहेत की त्यांनी पाकिस्तानी कंटेंट ताबडतोब हटवण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना एक नियमावली जारी केली असून त्यात असे म्हटले आहे की तत्काल प्रभावापासून पाकिस्तानमधील सर्व प्रकारचा मनोरंजनाचा कंटेंट भारतात दाखवणे थांबवा. ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्यूब आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. (Cyber news)

पुढे नियमावलीत लिहिले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि थर्ड पार्टी अॅपना पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, जे सबस्क्रिप्शन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध आहेत, त्वरित बंद करण्याचा सल्ला दिला गेला आहे. नियमावलीत सरकारने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. यात Dawn News, Samaa TV, ARY news आणि Geo news या चॅनल्सचा समावेश आहे. (Entertainment trending news)
================================
=================================
तसेच, भारताची सायबर सुरक्षा लक्षात घेता पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. यात हानिया आमिर, माहिरा खान, फवाद खान, राहत फतेह अली खान, अली झफर,बिलाल अब्बाज, यांचे अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. (Pakistani celebrity social media accounts)