
Panchayat 5 ची स्क्रिप्ट झाली लीक?; नीना गुप्ता म्हणाल्या, “तयार राहा…”
‘पंचायत ४’ (Panchayat 4) ही बहुचर्चित वेब सीरीज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली… फुलेरा गावात झालेल्या पंचायत निवडणूकीत अटीतटीचा सामना करत मतांच्या अगदी फार कमी मतांनी मंजू देवीचा पराभव करुन क्रांतीदेव जिंकल्या… ‘पंचायत’ वेब सीरीजच्या चौथ्या भागाने प्रेक्षकांचं मन तर जिंकलं आहेच; शिवाय, मंजू देवी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या विशेष चर्चेत आहेत… नुकत्याच एका कार्यक्रमात नीना गुप्ता यांनी ‘पंचायत ५’ ची स्क्रिप्ट लीक झाल्याचं म्हटलं आहे… जाणून घेऊयात नीना गुप्ता नेमकं काय म्हणाल्या…(Entertainment News)

आयएनएस यांनी एका मुलाखतीत नीना गुप्ता यांना पंचायतच्या पुढच्या सीझनबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या की, “पंचायत ५ ची स्क्रिप्ट लीक झाली आहे, पुढच्या सीझनसाठी तयार राहा”. आता नीना यांच्या या वक्तव्यामुळे ‘पंचायत’च्या ५ व्या भागाची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे… खरं तर, पंचायत ४ च्या शेवटी फुलेरा गावाला नवा प्रधानजी भेटला खरा पण काही प्रश्न अनुत्तरीतच राहिली…(Panchayat season 5)

क्रांतीदेवी प्रधानजी झाल्यानंतर फुलेरा गावात काय बदल होणार? सचिवजी नोकरी सोडून जाणार की नाही? आणि त्यांच्या आणि रिंकीच्या नात्याचं पुढे काय होणार? प्रल्हाद आमदारकीची निवडणूक लढणार का? मंजु देवी यांचं पुढचं पाऊल काय असणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रधानजींवर कोणी गोळीबार केला?. आता नीना गुप्ता यांनी रिव्हील केल्यानुसार लवकरच पंचायत ५ मध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अशी अपेक्षा आहे…
================================
=================================
दरम्यान, पंचायत ४ मध्ये नीना गुप्ता, जितेंद्र कुमार,रघुबीर यादव, फैसल मलिक,सानविका, प्रकाश झा, चंदन रॉय, सुनीता राजवार,दुर्गेश कुमार असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत… पंचायत या वेब सीरीजचे चारही भाग यशस्वी झाल्यानंतर आता ५वा भाग किती रंजक असेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे…(Panchayat Web series News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi