‘पंड्या स्टोर’ आणि ‘कुमकुम भाग्य’ फेम सिमरन बुधरूप बरोबर लालबागचा राजाच्या दर्शनावेळी घडला भयंकर प्रकार
लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी दररोज लाखो लोक येतात. पण या मंडपात एका अभिनेत्रीसोबत असं काही घडलं, ज्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपली व्यथा सांगितली. पंड्या स्टोअर आणि कुमकुम भाग्य अभिनेत्री सिमरन बुधरुप १२ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील लालबाज राजाच्या मंडपात पोहोचली होती. मोहित परमार, अक्षय खरोडिया यांसारख्या कलाकारांसोबत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अभिनेत्री आपली आई पोहोचली होती. पण मंडपात सिमरन आणि तिच्या कुटुंबासोबत असं काही घडलं की तुम्हाला हा आश्चर्याचा धक्का बसेल.(Lalbaugcha Raja Staff Bad Behaviour with Actress Simran)
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर करत आपला राग आणि नाराजी व्यक्त केली आहे. चला तर मग जाणून घेऊया सिमरन बुधरुपसोबत मंडपात नेमकं काय घडलं.सिमरन गुरुवारी (१२ सप्टेंबर) आपल्या आईसह लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. पण तिच्यासोबत असा काही प्रकार घडला ज्यामुळे अभिनेत्रीला खुप वाईट अवस्थेचा सामना करावा लाहला आहे. सिमरनने हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्रीने लिहिले- ”लालबागचा राजाच्या दर्शनावेळी एक भयंकर प्रकार घडला ज्याने माझे हृदय खुप अस्वस्थ झाले आहे. आज मी आईसोबत लालबागचा राजाकडे दर्शनासाठी गेले होते. पण आमचा अनुभव इतका वाईट होता की मन विचार करत बसलेलं असतं. या मंडपातील एका व्यक्तीने माझ्या आईचा फोन हिसकावून घेतला जेव्हा ती तिच्या फोनवर फोटो काढत होती. तेही जेव्हा ती माझ्या मागे रांगेत उभी होती आणि जेव्हा माझ्या आईने फोन घेण्याचा प्रयत्न केला असता तिला ढकलून दिण्यात आले.”(Lalbaugcha Raja Staff Bad Behaviour with Actress Simran)
===============================
हे देखील वाचा: सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…
===============================
सिमरनने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती ओरडताना दिसत आहे की ”नको , असं करू नका, ती अभिनेत्री असल्याचे कर्मचाऱ्यांना समजताच परिस्थिती शांत झाली आणि त्यांनी माघार घेतली. असं ही तिने लिहिले आहे. ”अशा उत्सवात होणारी प्रचंड गर्दी हाताळणे अवघड असते, पण याचा अर्थ आक्रमकपणे भाविकांचा अपमान करणे असा होत नाही” असे मत त्यांनी व्यक्त केले.