‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
मराठी रंगभूमीने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. सध्या गाजत असलेलं ‘असेन मी नसेन मी’ (Asen Mi Nasen Mi) हे नाटक केवळ प्रेक्षकांचंच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचंही लक्ष वेधून घेत आहे. प्रयोगानंतर रंगलेल्या चर्चांमधून आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून या नाटकाची छाप किती खोलवर उमटते आहे, हे स्पष्ट होत आहे.नुकतंच ज्येष्ठ अभिनेते Paresh Rawal यांनी हे नाटक पाहिलं. प्रयोगानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.(Asen Mi Nasen Mi Marathi Drama)

त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, ‘असेन मी नसेन मी’ पाहून मी खरंच निशब्द झालो. हे केवळ नाटक नाही, तर म्हातारपणातील नात्यांचा आणि संघर्षाचा एक आरसा आहे. जेव्हा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते, तेव्हा केवळ तीच नाही तर अख्खं कुटुंब कसं होरपळून निघतं, हे यात इतक्या प्रभावीपणे मांडलंय की डोळ्यांत पाणी येतं. नाटक संपल्यावर पडदा पडतो, पण खरी अस्वस्थता तिथून सुरू होते. हे नाटक तुमच्या मेंदूत आणि मनात घर करून राहतं.”त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे नाटकाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. अभिनेत्री Amruta Subhash हिने परेश रावल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या नाटकाने हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एका गुणी अभिनेत्रीला रंगमंचाकडे खेचून आणलं. अभिनेत्री Vidya Balan आपल्या कुटुंबासह हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित होती. मराठी नाटकांच्या आशयघन लेखनशैली आणि प्रभावी अभिनयाची मोहिनी बॉलिवूड कलाकारांवर कायम राहिल्याचं यावरून दिसून येतं.‘असेन मी नसेन मी’ या नाटकात अमृता सुभाष (Amruta Subhash), नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) आणि शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) या अनुभवी अभिनेत्रींची प्रभावी भूमिका आहे. त्यांच्या अभिनयामुळे नाटकाला वेगळी उंची लाभली आहे. आशय, सादरीकरण आणि भावनिक ताकद यामुळे या कलाकृतीने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, नाट्य परिषदेचे सन्मान तसेच दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी या नाटकाचा गौरव करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल २४ पुरस्कारांची कमाई करत या नाटकाने यशाचा भक्कम ठसा उमटवला आहे.(Asen Mi Nasen Mi Marathi Drama)
=======================================
=======================================
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगातही आशयप्रधान मराठी नाटकं प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘असेन मी नसेन मी’. रंगमंचावरून मांडलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळते, हेच तिचं खरं यश म्हणावं लागेल.