Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Hera Pheri 3 : कोण असेल खरा राजू? परेश रावल म्हणाले…
“पैसा ही पैसा होगा”, किंवा “चाय से ज्यादा किल्ली गरम है”… असे प्रत्येकाला आजच्या काळात रिलेट होणारे संवाद देणारा सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजके चित्रपट आहेत जे आजही अगदी डायलॉग्ससह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघडीने अक्षरश: लोकांना वेड लावलं होतं आणि आजही या चित्रपटाचे आणि तिन्ही पात्रांचे असंख्य चाहते आहेत. २००० साली प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी’ या चित्रपटाने कॉमेडी चित्रपटांचा एक वेगळाच दर्जा सेट केला होता. प्रत्येक संवाद, विनोद हा सामान्य माणसांना अगदी अरे हे तर माझ्याच आयुष्यात सुरु आहे असं भासवणारा होता. पहिल्या भागाच्या सुपर डुपर यशानंतर ‘फिर हेरा फेरी’ आला होता आणि आता ‘हेरा फेरी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहिर करण्यात आलं. बरं, पुन्हा एकदा प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी’ चित्रपटाची दिग्दर्शकिय सुत्र हाती घेतल्यामुळे लोकांची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे. ‘हेरा फेरी’तील बाबूराव अर्थात परेश रावल यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यनच्या एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले परेश रावल जाणून घेऊयात…. (Hera Pheri 3)
“चित्रपटाचा सीक्वेल हवा आहे म्हणून मी…”
परेश रावल यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मध्ये असणार होता असं भाष्य केलं. तसेच, परेश रावल (Paresh Rawal) म्हणाले की, “मी अजून चित्रपटाची पुर्ण स्क्रीप्ट ऐकली नाहीये. पण नक्कीच धमाल असेल आणि असलीच पाहिजे. कारण लोकांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. लोकांना त्यांच्या या आवडीच्या चित्रपटाचा सीक्वेल हवा आहे म्हणून मी तो साईन केला आहे. कदाचित काहीतरी चांगलं निघेल.” (Entertainment news)
============================
हे देखील वाचा: अक्षय कुमार प्रियदर्शन सोबत घेऊन येत आहे ‘भूत बंगला’; 14 वर्षांनंतर दिग्दर्शकासोबत करणार काम
============================
‘हेरा फेरी ३’ मध्ये कार्तिक विशेष भूमिकेत…
दरम्यान, गेल्या काही काळापासून ज्या ज्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका अक्षय कुमारने केली होती किंवा करणार होता तिथे अक्षयला कार्तिक आर्यन रिप्लेस केले आहे. तसंच, काहीसं ‘हेरा फेरी ३’ बद्दलही झालं होतं. मनोरंजनसृष्टीत कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मध्ये असेल अशा चर्चा होत्या आणि त्यावर बोलताना परेश रावल म्हणाले, “कार्तिक आर्यन सिनेमासाठी साईन झाला होता. तेव्हा सिनेमाची गोष्ट वेगळी होती. त्यात कार्तिकची भूमिका म्हणजे त्याला राजू समजून पकडून आणतात अशी होती. मी पूर्ण स्क्रीप्ट ऐकली नव्हती पण हे त्यात होतं. आता चित्रपटात कार्तिक नाही आहे त्याचं कारण असं की गोष्टच बदलली आहे. आणि ऑगस्ट-सप्टेंबरपासून आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत”.

तुमच्याकडे जर बाबूराव सारखं पात्र असेल तर…
पुढे रावल म्हणाले की, “कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ‘हेरा फेरी ३’ साठी फिक्स झाला होता. तेव्हा चित्रपटाची गोष्ट वेगळी होती. त्यात कार्तिकची भूमिका म्हणजे त्याला राजू समजून पकडून आणतात अशी होती. मी पूर्ण स्क्रीप्ट ऐकली नव्हती पण हे त्यात होतं. आता मात्र, गोष्टच बदलल्यामुळे चित्रपटात पुन्हा प्रेक्षकांना अक्षय, सुनील आणि मी दिसणार आहोत.” या मुलाखतीत सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक चित्रपटांचे सीक्वेल्स येत आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं असता परेश रावल म्हणाले की, “सीक्वेल कसा हवा? मुन्नाभाई एमबीबीएस नंतर जो लगे रहो मुन्नाभाई झाला हा खरा सीक्वेल. जरा असा बनवणार असाल तर सलाम आहे. पण जर फ्रँचायझीमधून फायदा घेण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी करत असाल तर त्यात खरंच मजा नाही. तुमच्याकडे जर बाबूराव सारखं पात्र आहे ज्याची ५०० कोटींची गुडविल आहे तर त्याला कुठेतरी दुसऱ्या बॅकड्रॉपला टाका ना”. (Entertainment Tadaka)
पुढे ते म्हणाले की, “प्रेक्षक नक्कीच बाबूरावला पाहायला तिथे येतील. पण जर तेच तेच केलं, नुसते जोक्स बदलले तर काही अर्थ नाही. प्रेक्षक तयार आहेत तर त्यांना चांगल्या नव्या प्रवासाला घेऊन जा. तेच तेच करत बसाल तर काय फायदा?”. त्यामुळे पुन्हा एकदा बाबूराव, राजू आणि श्याम नवी हेरा फेरी करण्यासाठी सज्ज झाले असून प्रेक्षक आतुरतेने ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) चित्रपटाची वाट पाहात आहेत.