Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!
बॉलिवूडमधून आणखी एका कपलने त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे… अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chaddha) यांनी सोशल मिडियावर लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहूणा येणार असल्याचं जाहिर केलं आहे… परिणीती आणि राघव यांच्या या मोठ्या अपडेटनंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे…

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी सोशल मिडियावर एका केकचा फोटो टाकला आहे.. त्या केकवर एक अधिक एक ३ असं लिहिलं असून त्यावर लहान बाळाच्या पावलांचं चित्रही काढण्यात आलं आहे. परिणितीने या पोस्टमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात ते दोघे हातात हात घेऊन चालताना दिसतायंत. ही पोस्ट शेअर करताना तिने असं लिहिलं आहे की, ‘आमचे चिमुकले विश्व… लवकरच (बाळाचे) आगमन होणार आहे. आम्हाला खूपच भाग्यवान आहोत.'(Bollywood trending news)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या जोडीने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) मध्ये हजेरी लावली होती… त्यावेळी दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या होत्या… यावेळी कपिल शर्माने दोघांना प्रश्न विचारला होता की, बेबी प्लॅनिंग करणार आहात का? त्यावर राघवच्या उत्तरानं सर्व जण अवाक झाले होते. राघव म्हणाला होता की, “देऊ… तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ” हे उत्तर ऐकताच परिणीती थोडीशी शॉक झाली होती.( Parineeti Chopra pregnancy news)
================================
हे देखील वाचा : Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”
=================================
परिणीती चोप्रा हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर २०११ मध्ये ‘लेडिज वर्सेस रिकी बेहल’ या चित्रपटातून तिनं अभिनयाची सुरुवात केली… पुढे ‘इश्कजादे’, ‘दावत-ए-इश्क’, ‘हसी तो फसी’, ‘ढिशुम’, ‘गोलमाल अगेन’, ‘नमस्ते इंग्लंड’, ‘सायना’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘मिशन रानीगंज’, ‘चमकीला’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिनं विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi