Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार

Red Soil Stories च्या शिरीष गवसला नेमकं काय झाल होत?

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mukersh : दरिया दिल मुकेशचा दिलदारपणा!

 Mukersh : दरिया दिल मुकेशचा दिलदारपणा!
बात पुरानी बडी सुहानी

Mukersh : दरिया दिल मुकेशचा दिलदारपणा!

by धनंजय कुलकर्णी 29/05/2025

पूर्वीच्या काळी सिनेमाच्या दुनियेत निरोगी आणि निकोप असं कलेला पोषक असणारं वातावरण होतं. एकमेकांच्या कलेबाबत आदर होता, आस्था होती. दुसऱ्याच्या कलागुणांची कदर होती. स्पर्धा होती कां? नक्की होती पण ती आजच्या सारखी जीवघेणी नव्हती. एकमेकांवर कुरघोडी करणारी नव्हती. पाय खेचणारी नव्हती. त्यामुळे त्या काळातील कलाकृती आजही तितक्याच पवित्र आणि सुंदर वाटतात. त्या काळातील असे अनेक किस्से आज देखील आवर्जून सांगितले जातात. असाच एक किस्सा. मुकेश यांच्या दरिया दिलीचा. (Playback Singer Mukesh)

पार्श्वगायक मुकेश. जितका सुंदर आवाज तितकंच पवित्र  आणि लोभस व्यक्तिमत्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं पावित्र्य त्यांच्या स्वरात उमटत असायचं. हा किस्सा साठ च्या दशकाच्या उत्तरार्धातला आहे. मुकेश यांच्या या कृतीने एका नव्या पार्श्वगायकाच्या करीअर ची दारे उघडली गेली. आज देखील हा पार्श्वगायक आपल्या  प्रत्येक मुलाखतीमध्ये पार्श्व गायक मुकेश यांचे ऋण व्यक्त करत असतो.  कोण होता हा पार्श्वगायक आणि काय होता हा नेमका किस्सा? (Bollywood gossips)

१९६९ साली अभिनेता जितेंद्र आणि अपर्णा सेन यांचा ‘विश्वास’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट केवल कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची सर्व गाणी गुलशन बावरा यांनी लिहिली होती. तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. चित्रपटातील सर्व गाणी मुकेश गाणार होते. त्या पद्धतीने सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती फक्त एका  गाण्याचे रेकॉर्डिंग करायचे राहिले होते. नेमकं त्याच वेळेला मुकेश यांना एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जायचे होते. सिनेमाचे बजेट कमी होते. सेट लागला होता. शूटिंग डेट ठरली होती. त्यामुळे गाण्याचे रेकोर्डिंग होणे गरजेचे होते. पण ऐन वेळी मुकेश दिल्लीला होते. काय करायचे? (indian cinema)

=========

हे देखील वाचा : बॉब क्रिस्टो हा खलनायक आठवतो का?

=========

अशा आणीबाणीच्या प्रसंगी  संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी एका नव्या पार्श्वगायकाकडून ते गाणे रेकॉर्डिंग करून घ्यायचे ठरवले. आज ज्याला स्क्रॅच रेकॉर्ड व्हर्जन म्हणतात असा तो प्रकार होता. हे करणे गरजेचे होते. कारण चित्रपटाचे शूटिंग शेड्युल ठरलेले होते. त्यामुळे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी नवीन पार्श्वगायक मनहर उदास आणि सुमन कल्याणपुर यांच्या स्वरात हे युगलगीत रेकॉर्ड केले. गाण्याचे बोल होते ‘आपसे हमको बिछडे हुए एक जमाना बीत गया….’  गाणे व्यवस्थित रेकॉर्ड झाले. शूटिंग देखील झाले.(Bollywood masala)

मुकेश दिल्लीहून परत आल्यानंतर त्या गाण्याचे डबिंग करण्यासाठी स्टुडिओमध्ये पोहोचले. तिथे संगीतकाराने मूळ गाणे त्यांना ऐकवले. हे गाणे ऐकल्यानंतर मुकेश म्हणाले ,” काय सुंदर गाणे गायले आहे!  आता माझ्या आवाजाची काय गरज आहे?  गाणं अतिशय अप्रतिम झालं आहे. हेच गाणे असू द्या.”  त्यावर दिग्दर्शक म्हणाले,” ते ठीक आहे. पण पार्श्वगायक नवीन आहे. तुमच्या आवाजात जर गाणं रेकॉर्ड झालं तर वेगळीच मजा येईल.” त्यावर मुकेश म्हणाले,” काही गरज नाही. या चित्रपटातील बाकी गाणी माझ्याच आवाजात आहेत.  हे एकच गाणं मनहर उदास यांच्या स्वरात आहे. ते तसेच राहू द्या. त्याने  खूप चांगलं त्याने गायलं आहे!”  (Bollywood trends)

जेव्हा मुकेश सारखा पार्श्वगायक असे मत देतो त्यावेळेला ते मान्य करणे गरजेचे असते. मनहर उदास यांचे ते गाणं चित्रपटात तसेच राहू दिल ते त्यांचं पहिलं हिंदी सिनेमातलं गाणं बनलं!  या गाण्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटाची दारे उघडी झाली. ‘विश्वास’ हा चित्रपट फारसा चालला नाही; पण त्यातील गाणी मात्र खूप गाजली. यात मुकेश यांनी गायलेले ‘चांद की दिवार  ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया’ हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले होते. मनहर उदास आणि सुमन कल्याणपुर यांनी गायलेले ‘आपसे हमको बिछडे हुए…’ हे गाणं देखील खूप लोकप्रिय ठरले. मुकेश यांच्या मनाचा हा फार मोठेपणा होता खरंतर त्यांच्या सारखाच आवाज असणाऱ्या मनहरला मदत करणे म्हणजे स्वतःसाठी एक नवा स्पर्धक निर्माण करण्यासारखं होतं. पण मुकेश असला विचार करणारे नव्हते.  त्यांनी मनहरला आपलं करिअर घडवण्याची संधी दिली!(Entertainment news)

=========

हे देखील वाचा : जेव्हा ऋषी कपूरच्या सांगण्यावरून अमिताभला सिनेमातून काढून टाकले!

=========

जाता जाता थोडंसं या चित्रपटातील नायिका अपर्णा सेन यांच्या बद्दल. खरंतर अपर्णा सेन या बंगाली चित्रपट क्षेत्रातील एक मान्यवर दिग्दर्शिका. तब्बल नऊ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि तेरा  बंगाली फिल्म जर्नलिस्ट असोसियेशन अवार्ड्स अशी भरगच्च कामगिरी त्यांच्या नावावर आहे. ‘विश्वास’ हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा होता. यानंतर त्यांनी ‘इमान धरम’(१९७६) या कमर्शियल सिनेमात देखील काम केले होते. अपर्णा सेम ला पद्मश्री हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. (Mukesh songs)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood masala Entertainment News Indian Music indian playback singer jitendra latest news singer mukesh suman kalyanpurkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.