
Prajakta Koli Wedding : मोस्टली सेनने वृषांकसोबत घेतले सात फेरे
फेमस यूट्यूबर आणि अभिनेत्री मोस्टली सेन अर्थात प्राजक्ता कोळी हिने बॉयफ्रेंड वृषांक खनाल सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्न सोहळ्याची सध्या इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सूरू असून लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वृषांक नेपाळी आहे तर प्राजक्ता मराठी, त्यामुळे दोन्ही संस्कृती त्यांनी सर्व कार्यक्रमात जपलेल्या पाहायला मिळाल्या. (Prajakta Koli Wedding)

‘मिस्डमॅच’ फेम प्राजक्ता कोळी हिने १३ वर्ष डेट करत असलेल्या वृषांकला आपला साथीदार निवडला असून बॉलिवूडमधील सर्व कलाकार त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्राजक्ता कोळी (Prajakta Koli Wedding) आणि वृषांक खनाल यांनी मेहंदी, हळदी समारंभ, संगीत आणि लग्नात अनिता डोंगरेने डिझाईन केलेले आऊटफिट परिधान केले होते. (Trending entertainment News)
प्राजक्ताने तिच्या लग्न सोहळ्यातील एका फंक्शनमध्ये तिच्या आईच्या लग्नातील साडी नेसली असे सांगण्यात आले होते. तर, मेहंदीच्या लूकसाठी तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा आणि आणि भरजरी वर्क असणारा इंडो वेस्टर्न टॉप घातला होता. तर, हळदी समारंभाला तिने मोती रंगाचा सूट घातला होता. संगीत नाइटला तिने लाल रंगाची साडी नेसली होती आणि तीच तिच्या आईची असेल असा अंदाज बांधला जात आहे. तर मुख्य लग्न सोहळ्यात प्राजक्ताने (Prajakta Koli Wedding) लग्नात आयव्हरी रंगाचा पेस्टल रंगाचे वर्क असलेला लेहेंगा घातला होता. तर vrishank khanal ने पांढरी शेरवानी परिधान केली होती. (Entertainment tadaka)

वृषांक खनाल मूळचा नेपाळचा तर Prajakta Koli ठाण्याची मुलगी. वृषांक खनालसोबत १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता. कर्जतमध्ये कुटुंब आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा थाटामाटात लग्न सोहळा संपन्न झाला. (Marriage trend)
=============
हे देखील वाचा : Abhidnya Bhave : “साऊथ फिल्म कशाही असूदेत लोकं पाहतात पण, मराठी…”
=============
कशी झाली पहिली भेट?
वृषांक आणि प्राजक्ताची ओळख एका मित्रामुळे झाली होती. गणपती पूजेदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले होते आणि त्यावेळीच वृषांकने प्राजक्ताला डेटसाठीही विचारलं होतं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांनी सात जन्मासाठी एकमेकांना निवडलं आहे.
प्राजक्ता ‘जुग जुग जियो‘ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर नेटफ्लिक्सची सीरिज ‘मिसमॅच्ड’ (Mismatched)
मध्ये डिंपल आहुजा ही तिने साकारलेली भूमिका गाजली होती.
या सीरिजचे तीन सीझन आले असून यात रोहित सराफ, रणविजय सिन्हा, विद्या माळवदे, तारुक रैना हे कलाकार दिसले होते. रेडिओ जॉकी ते अभिनेत्री असा प्रवास करत आता प्राजक्ता लेखिकादेखील झाली असून तिचं ‘Too Good To Be True‘ हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालंय. (Prajakta koli marriage)