Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prasad Oak च्या मोठ्या लेकाचा पार पडला साखरपुडा, होणारी सून आहे तरी कोण?

 Prasad Oak च्या मोठ्या लेकाचा पार पडला साखरपुडा, होणारी सून आहे तरी कोण?
Prasad Oak Son Engagement
मिक्स मसाला

Prasad Oak च्या मोठ्या लेकाचा पार पडला साखरपुडा, होणारी सून आहे तरी कोण?

by Team KalakrutiMedia 20/01/2026

सध्या सर्वत्र विवाहसोहळ्यांची धामधूम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये लग्नाची तयारी, खरेदी आणि विविध समारंभांची लगबग सुरु आहे. लग्नापूर्वी साखरपुडा हा महत्त्वाचा सोहळा असल्याने अनेक ठिकाणी हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक Prasad Oak  यांच्या घरीही आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कुटुंबात लवकरच विवाहसोहळा पार पडणार आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक (Manjiri Oak)  यांचा मोठा मुलगा सार्थक ओक (Sarthak Oak) लवकरच वैवाहिक जीवनात पदार्पण करणार आहे. 19 जानेवारी रोजी सार्थकचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला. या खास सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(Prasad Oak Son Engagement) 

Prasad Oak News
Prasad Oak

या साखरपुड्यात संपूर्ण ओक कुटुंब एकत्र दिसत असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतो आहे. सार्थकने या प्रसंगी फिकट पिस्ता रंगाची सफारी सूट परिधान केली होती, तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर घागरा घातला होता. दोघांची जोडी अतिशय देखणी दिसत होती. मात्र, सार्थकच्या होणाऱ्या पत्नीबाबत अधिक माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.या खास प्रसंगी प्रसाद ओक फिकट हिरव्या रंगाच्या कुर्त्यात दिसले, तर मंजिरी ओक यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती. दोघेही अतिशय सोज्वळ आणि सुंदर दिसत होते. याशिवाय प्रसाद ओक यांचा धाकटा मुलगा हिरव्या रंगाच्या शेरवानीत लक्ष वेधून घेत होता.

Prasad Oak News
Prasad Oak

सार्थकच्या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील या सोहळ्याला हजेरी लावून तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेता समीर चौगुले सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता.(Prasad Oak Son Engagement) 

============================

हे देखील वाचा: Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !

============================

दरम्यान, सार्थक ओक याचा विवाह नेमका कधी होणार, याबाबतची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ओक कुटुंबातील हा आनंदाचा क्षण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: marathi entertainment news Prasad Oak Prasad Oak family Prasad Oak latest news Prasad Oak son engagement Sarthak Oak engagement Sarthak Oak wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.