लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Smita Patil : आईचा चित्रपट सुरू असताना प्रतीकने का फोडला होता टीव्ही?
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी मिळवणाऱ्या स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं. प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याला वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी-आजोबांनी लहानाचं मोठं केलं. आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न मिळालेली माया अशा कठिण परिस्थितीत मोठा झालेल्या प्रतीकने चक्क स्मिता पाटील यांचा चित्रपट सुरु असताना टी.व्ही फोडून टाकला होता. काय होता किस्सा नक्की वाचा… (Indian cinema)

तर, नुकतीच प्रतीकने झूमला मुलाखत दिली असून यात त्याने त्याच्या बालपणापासून ते लग्नापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बालपणी खूप रागीट असल्याची कबुली देखील यावेळी प्रतीकने दिली. आई-वडील नसल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल प्रतीक म्हणाला की, “मी नैराश्य खूप नंतर अनुभवले; माझ्या बालपणी मला खूप राग यायचा. मी नेहमीच रागावायचो आणि मी नेहमी रागात असायचो. मला आठवते की मी टीव्ही पाहत होतो आणि माझ्या आईचा एक चित्रपट चालू होता. ती माझ्याबरोबर नव्हती याचा मला राग आला आणि मी टीव्ही उचलला आणि तो फोडला. मी बेसबॉल बॅटने घरातील सर्व फोटो फोडले होते.” (Entertainment news)

पुढे प्रतीकने घरातील परिस्थितीमुळे कसा व्यसनांच्या आहारी गेला होता याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी दोन वेळा ड्रग्जचा ओव्हरडोस केला, रिहॅबला गेलो, पण त्याचा फायदा होत नव्हता. दुसऱ्यांदा रिहॅबमधून बाहेर आल्यावर काही आठवड्यांतच, मी पुन्हा व्यसनाधीन झालो. माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीची आणि माझ्याबरोबर आई-वडील नसल्याची मला लाज वाटत होती. मी या सर्व गोष्टींमधून गेलो. मी ड्रग्ज घेत होतो पण मी सुरक्षित होतो”. (Bollywood tadaka)

प्रतीक पुढे म्हणाला की, “ते खूप कठीण दिवस होते. तुमच्यावर बहिष्कार टाकला जातो. मी खूप नशीबवान होतो की माझे कुटुंब माझ्याबरोबर होते. ते माझ्यावर खूप नाराज होते, पण ते तिथे होते. समाजात मला खूप वेगळ्या पद्धतीने पाहिले जात असे आणि अनेकांनी त्यांच्या मुलांना माझ्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं.” (Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!
=================================
दरम्यान, प्रतीकने काही महिन्यांपूर्वीच आपल्या नावातून राज बब्बर यांचं नाव आणि आडनाव हटवलं असून प्रतीक स्मिता पाटील असं नाव त्याने लावण्यास सुरुवात केली आहे. प्रतीकच्या चित्रपट कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर त्याने आत्तापर्यंत ‘जाने तु या जाने ना’, ‘मुंबई डायरिज’, ‘दम मारो दम’, ‘आरक्षण’, ‘मुल्क’, ‘मित्रों, ‘छिछोरे’, ‘इंडिया लॉकडाऊन’,’सिकंदर’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Prateik Smita Patil Movies)