Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

 Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”
मिक्स मसाला

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

by रसिका शिंदे-पॉल 12/05/2025

बॉलिवूडमधील सौंदर्य आणि अभिनयाची खाण असणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा प्रतीक (Prateik Patil) याने काही महिन्यापूर्वीच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. पण प्रतीकने लग्नाला वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना बोलावलं नव्हतं. सिनेइंडस्ट्रीत या विषयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: प्रतीकनेच वडलांना लग्नाला का बोलावलं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Bollywood gossips)

प्रतीकने झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “वडील राज बब्बर आणि भावंडांना लग्नाला न बोलावण्यामागे कोणतेही वैयक्तिक मतभेद किंवा भांडणं नव्हती”. प्रतीकने आई स्मिता पाटील यांच्या घरी लग्न केलं होतं. प्रतीकची आई (स्मिता पाटील) आणि त्याची सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यातील संबंध फार बरे नव्हते. त्यामुळेच स्मिता पाटील यांच्या घरी वडील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्नासाठी बोलावणं योग्य वाटत नसल्याचं प्रतीक म्हणाला. (Entertainment update)

प्रतीक म्हणाला की, “माझी आई आणि माझ्या वडिलांची पत्नी यांच्यात खूप वाद आणि समस्या होत्या. त्यावेळी बातम्यांमध्येही त्यांच्याबद्दल फार काही बोललं गेलं होतं. वडील आणि त्यांच्या कुटुंबासोबत मला एक वेगळा कौटुंबिक सोहळा करायचा होता. माझ्या आईचे वडिलांच्या कुटुंबासोबतचे संबंध तुटल्यावर आईच्या घरी त्यांना बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं.”  (Bollywood news)

पुढे प्रतीक म्हणाला की, “मी त्यांचा द्वेष करतो असं नाही. माझी आई आणि तिच्या इच्छांचा सन्मान करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि आहे. माझे वडील आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर लग्नाच्या वेळी तिथे नव्हते, ते घरी येऊ शकले नाहीत याचं मला वाईट वाटलं. हे घर माझ्या आईने खरेदी केलं होतं. सिंगल पॅरेंट म्हणून तिला या घरात मला मोठं करायचं होतं. मी माफी मागतो, पण हा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने मिळून घेतला होता.” (Bollywood tadaka)

================================

हे देखील वाचा: Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!

=================================

दरम्यान, प्रतीकने काही दिवसांपूर्वीच आपल्या नावातून राज बब्बर यांचं नाव आणि आडनाव हटवलं असून प्रतीक स्मिता पाटील असं नाव त्याने लावण्यास सुरुवात केली आहे. प्रतीकच्या चित्रपट कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर त्याने आत्तापर्यंत ‘जाने तु या जाने ना’, ‘मुंबई डायरिज’, ‘दम मारो दम’, ‘आरक्षण’, ‘मुल्क’, ‘मित्रों, ‘छिछोरे’, ‘इंडिया लॉकडाऊन’,’सिकंदर’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Prateik Smita Patil Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured mix masala Prateik Smita Patil raj babbar Smita Patil
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.