
Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेड मारण्यास यशस्वी झाला आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून प्रेक्षकांनी पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Entertainment news)
सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ९०.५ कोटी कमावले आहेत.

‘रेड २’ चित्रपटाचं एकूण बजेट ४८ कोटी आहे. पहिला भाग गाजवल्यानंतर दुसऱ्या भागातही अजय देवगण धमाकेदार परफॉर्मन्स देणार यात वादच नाही. दरम्यान, Ajay Devgan याने ‘रेड २’ (Raid 2) साठी २० कोटी मानधन दिलं असून चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या रितेश देशमुखला (Ritesh Deshmukh) ४ कोटी आणि अभिनेत्री वाणी कपूर (Vanni Kapoor) हिला केवळ १ कोटीचं मानधन दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, तमन्ना भाटिया हिने ‘नशा’ या गाण्यासाठी १ कोटी घेतल्याचं सांगितलं जात आहे.(Bollywood news)
===========
हे देखील वाचा – खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण
===========
लवकरच अजय देवगणचे ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ हे चित्रपट भेटीला येणार आहेत. तर रितेश देशमुख ‘हाऊसफुल्ल ५’, ‘राजा शिवाजी’, ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. (Bollywood upcoming movies)