
Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का सुरू केली?
गीतकार शैलेंद्र यांनी फनीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मार गये गुलफाम’ या कलाकृतीवर चित्रपट काढायचे ठरवले. या कलाकृतीवर पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये रसिकांनी प्रचंड प्रेम केले होते. शैलेंद्र सारख्या संवेदनशील कवीने खरंतर चित्रपट बनवण्याच्या धंद्यात पडू नये असे राजकपूर यांना वाटत होतं. तसं त्यांनी त्यांना सुचवलं देखील होतं पण शैलेंद्र यांना हा चित्रपट बनवायचाच होता. या सिनेमात राज कपूर वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. तर संगीत शंकर जय किशन यांचे होते.

या सिनेमाचे दिग्दर्शन बासू भट्टाचार्य यांनी केले होते. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिला प्रयोग होता. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले. सिनेमा निर्मितीचा शून्य अनुभव असल्याने शैलेन्द्राचे आर्थिक गणित फसत चालले होते. दिग्दर्शक हि नवीन होता. बजेटचा प्रश्न असल्यामुळे हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवायचे ठरवले. चित्रपटाचे शूटिंग संथ गतीने चालू होते. मध्य प्रदेशात या सिनेमाचे शूट होते. पाच-सहा वर्ष लागली सिनेमा बनायला. सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
‘आ आ आ भी जा’, ‘चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडे वाली मुनिया’, ‘दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को दुनिया बनायी’, ‘सजनरे झुट मत बोलो’, ‘पान खाये सैया हमार’, ‘मार गये गुलफाम’, ‘सजनवा बैरी हो गये हमारे’, ‘प्रीत बना के तूने’, ‘लाली लाली डोलिया में तेरी बिना…..’ हि मुकेश,लता, आशा, सुमन आणि मन्नाडे यांनी गायलेली गाणी आजही फ्रेश वाटतात. दुर्दैवाने या सिनेमाला पहिल्या फेरीत यश नाही मिळाले. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार पात्र झाला. नंतर काही वर्षांनी हा सिनेमा पुन्हा रिलीज झाल्यानंतर मात्र रसिकांनी या सिनेमाला गर्दी केली. आज हा सिनेमा भारतीय सिनेमातील कल्ट क्लासिक ट्रॅजेडी मूवी म्हणून ओळखला जातो. पण हे यश पाहायला निर्माता शैलेंद्र राहिला नाही या सिनेमाच्या अपयशाने तो अकाली वयाच्या 43 व्या वर्षीच निधन पावला!
================================
हे देखील वाचा : राज कपूरच्या चित्रपटांची ऑफर नाकारणारी नायिका कोण?
=================================
या चित्रपटाची शूटिंग मध्यप्रदेशात झाले. शूटिंग संपल्यानंतर जेव्हा संपूर्ण युनिट ट्रेन ने मुंबईला यायला निघाले. त्या वेळचा एक प्रसंग वहिदा रहमान ने आपल्या आत्मचरित्रात सांगितला आहे. परतीच्या प्रवासात ‘बिना’ या रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबवली गेली. ट्रेनमधील एका कंपार्टमेंट मध्ये राजकपूर आणि त्यांचे सहकारी मित्राने दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये वहिदा रहमान, तिची बहीण आणि हेअर ड्रेसर होती. सर्वांना कळेना अचानक ट्रेन का थांबली. बाहेर जोरजोरात आवाज येत होते. वहिदाने आपल्या खिडकीचा पडदा उघडून पाहिला तेव्हा तिला बाहेर खूप मोठा लोकांचा जमाव दिसला. सर्वजण राजकपूरला भेटण्याचे मागणी करत होते. राज कपूर ने खिडकीतून त्यांना विचारले “काय पाहिजे?” त्यावेळेला त्यांनी सांगितले की,” तुमच्या लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. तुमचे शूटिंग आम्हाला पाहायचे होते. आम्ही तुमचे फॅन आहोत. पण तुमचं युनिट आम्हाला तुमच्याशी भेटू देत नाही. प्रत्येक वेळी एका ठिकाणी गेले की सांगायचे शूटिंग दुसऱ्या ठिकाणी चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर सांगायची शूटिंग दुसऱ्या गावात चालू आहे. आम्ही खूप त्रस्त झालो आहोत. आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे!” राज कपूर यांनी त्यांच्या भावना ओळखल्या आणि सर्वांची भेट घेतली. अभिवादन केले. शेक हँड केला. या गर्दी मध्ये बव्हंशी कॉलेज स्टुडंट होते.

यानंतर या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आम्हाला वहिदा भेटण्याची केली. बिना येथे त्या काळात भरपूर कॉलेजेस होते. त्यामुळे अनेक कॉलेज स्टुडंट्स वहिदा आणि राजकपूरला भेटण्यासाठी स्टेशनवर आले होते. संपूर्ण प्लॅटफॉर्म तुडुंब लोकांनी भरून गेला होता. जेव्हा त्यांनी राजकपूरकडे वहिदा रहमान ला भेटण्याची मागणी केली तेव्हा मात्र राजकपूर त्याला विरोध केला. राज कपूर म्हणाले,” त्या लेडीज आहेत आणि मी कुठल्याही परिस्थितीत त्यांना भेटण्याची परवानगी देणार नाही. हा काही कार्यक्रम नाही की थिएटर नाही. अशा गर्दीच्या ठिकाणी शक्य नाही.” असे म्हणून राज ने ट्रेनचा दरवाजा धाडकन बंद केला. त्यामुळे जमाव आणखीन चिडला. झाला आणि त्यांनी गाडीवर दगडफेक सुरु केली. त्यांच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी खिडकीच्या काचा फोडायला सुरुवात केली. मामला खूप गंभीर होत चालला.
================================
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे वहिदा रेहमान आणि राज खोसला पुन्हा कधीही एकत्र आले नाहीत
=================================
वहिदा राज कपूरकडे गेली आणि म्हणाली,” मी त्यांना भेटून येते ना. काही होत नाही.” त्यावेळेला राज कपूर म्हणाले ओरडून म्हणाले ,” मी अजिबात परवानगी देणार नाही. त्यांनी तुला खेचून पळून नेले तर? हा सर्व अनोळखी एरिया आहे. मी कुठल्याही प्रकारचे रिस्क घेऊ शकत नाही. तू कुठेही जाणार नाहीस!” बाहेर पब्लिकचा विरोध प्रचंड वाढत होता. राजकपूर भयंकर अस्वस्थ झाले होते. त्यांना वाटत होता आपण बाहेर जावे आणि लोकांना हुसकावून लावावे. परंतु त्यांचे मित्र आणि वहिदा रहमान त्यांना जाऊ देत नव्हते. राजकपूर त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ते बाहेर जाण्यासाठी धडपडत होते. त्यांना लोकांचा प्रचंड राग येत होता. पण वहिदा आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना अक्षरशः हात पाय दाबून बेड वरच दाबून ठेवले. राज यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं. ते भयंकर चिडलेले होते. आता वहिदा आणि त्यांच्या युनिटला काळजी वाटू लागली राज कपूरला काही आणखी त्रास व्हायला नको. राजकपूरच्या मित्राकडे सर्व्हिस रिवाल्वर होते. तो दारात गेला आणि हवेत गोळीबार सुरू केला. जेव्हा हवेत गोळ्या झाडल्यानंतर लोक शांत झाले आणि पटकन इथून बाहेर पडले. स्टेशन मास्तर ने ग्रीन सिग्नल दिला आणि ट्रेन मुंबईकडे रवान झाली. राज कपूर देखील शांत झाले. मुंबईला ट्रेन आल्यानंतर सर्वांना खूप आश्चर्य वाटले कारण ट्रेनची अवस्था खूपच वाईट झाली होती. राजकपूरने वहिदाला सही सलामत घरी पोहोचवले आणि मगच ते आपल्या घरी गेले!