
Raj Kapoor : ‘वो सुबह कभी तो आयेगी..’ या गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
गोल्डन इरा मधील गाण्याच्या मेकिंगचे किस्से भन्नाट असतात. त्या काळात प्रत्येक कलावंत हा आपली कलाकृती दर्जेदार कशी होईल यासाठी प्रयत्न करत असायचा. एक उत्कृष्ट टीमवर्क असायचे. सर्वांचे परस्परांशी व्यवस्थित ट्यूनिंग असायचे. अर्थात ती कलाकृती बनताना वाद व्हायचे, भांडण व्हायची, मतभेद असायचे. पण याचा शेवट मात्र उत्तमच व्हायचा. गाण्याच्या मेकिंग च्या गोष्टी देखील तितक्याच भन्नाट असतात. 1958 साली एक चित्रपट आला होता ‘फिर सुबह होगी’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन रमेश सैगल यांनी केले होते. रशियातील ज्येष्ठ साहित्यिक Fyodor Dostoevsky’ यांच्या क्राईम अँड पनिशमेंट या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. राजकपूर, माला सिन्हा आणि रहमान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत खय्याम यांचे होते.
साहिर सुरुवातीपासूनच डाव्या विचारसरणीचा. त्यामुळे त्याच्या काव्यातून ही विचारधारा कायम झिरपत असायची. हा चित्रपट तर त्याच विचार धारेला पुढे नेणारा असल्यामुळे यात सा हीरच काव्य अतिशय दर्जेदार आणि अप्रतिम होते. या चित्रपटात एका गाण्याच्या वेळी मात्र संगीतकार खय्याम आणि गीतकार साहिर यांच्यात वाद झाला होता. हे गाणं या चित्रपटाचं थीम सॉंग होतं. गाण्याचे बोल होते ‘वो सुबह कभी तो आयेगी’ गीतकार साहिर यांना हे गाणे क्रांती गीता सारखे जयमध्ये व्यवस्थेविरुध्द राग,त्वेष आणि संताप असायला हवा आणि त्या प्रकारे स्वरबद्ध करून हवे होते. तर संगीतकार खय्याम यांना मात्र हे गाणे आशावादी शांत सरूपात हवे होते. या मतभिन्नतेमुळे दोघांमध्ये भरपूर वाद झाला. दोघेजण आपापल्या भूमिकेवर ठाम होते आणि कायम होते.

एक संध्याकाळी संगीतकार खय्याम यांनी साहीर यांना पटवून देताना सांगितलं,” साहिर साब ठीक आहे हे क्रांतीचे गीत आहे पण या क्रांतीमध्ये मला एक आशेचा किरण देखील दिसतो. तो संगीताच्या माध्यमातून दाखवायला पाहिजे. आणि आशा/विश्वास गंभीर पद्धतीने गायल्या नंतरच लोकांच्या मनाला जाऊन भिडतो. या गाण्यातून आपण समाजाला एक संदेश देणार आहोत. ठीक आहे; आज नकारात्मक परिस्थिती जरी असली तरी ही परिस्थिती ही परिस्थिती काही कायम राहणार नाही. या काळ रात्री नंतर सकाळ निश्चितच येणार आहे. हा आशावाद आपल्याला या गाण्यातून जागवायचा आहे. त्यामुळे मी या गाण्याला यमन रागामध्ये बांधले आहे. बघा तुमच्या काव्यातील भावना कशा अपील होतात!” संगीतकार खय्याम यांनी व्यवस्थित पटवून दिल्यानंतर साहीर यांचा राग यांचा शांत झाला. त्यानंतर मुकेश आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं हे गाणं ऐकल्यानंतर साहिर देखील खूष झाले त्यांनी खय्याम यांची पाठ थोपटली. साहीर म्हणाले ,” खय्याम तुम मेरी शायरी की आवाज हो.” त्यावर खय्याम यांचे म्हणणे होते ,”मुझे इज क्रांती गीत मे ‘उम्मीद की किरण नजर आ रही थी.“
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
आज हा चित्रपट आणि हे गाणे येऊन जवळपास 70 वर्ष होत आली तरी या गाण्यातील आशावाद जबरदस्त आहे. हे गाणे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना खूप आवडायचे. अडवाणी यांनी तर खूपदा या गाण्याचा उल्लेख देखील केला होता. ते सांगतात,”1958 साली आम्ही दिल्लीच्या पालिकेच्या निवडणुका हरलो होतो. आमचा दारुण पराभव झाला होता. या हताश/ दु:खी वातावरणात आम्ही दोघांनी दिल्लीला ‘फिर सुबह होगी ‘ हा चित्रपट पाहिला आणि या गाण्याने अक्षरश: भारावून गेलो. ही काळरात्र संपून उद्याची पहाट नक्कीच उगवणार यावर आमचा विश्वास बसला. मी आमच्या कार्यकर्त्यांना नेहमी हा चित्रपट आणि या गाण्याबाबत सांगत असतो.” 2017 साली विद्या बालन यांचा ‘बेगमजान ‘हा चित्रपट आला होता. या चित्रपटात देखील या गाण्याचा समावेश केला होता. या चित्रपटात हे गाणे अर्जित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले होते.