‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
राजकपूरने दिला होता ऋषी ला लाख मोलाचा सल्ला!
माणसं ग्रेट उगाच बनत नाही त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम चिकाटी आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. त्याच्यासोबत काळाचे भान व पराजयाचा सकारात्मक स्वीकार खूप महत्त्वाचा आहे. ऋषी कपूर यांनी हा किस्सा एकदा एका आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. हा किस्सा आहे राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी बाल कलाकाराची भूमिका केली होती. शूटिंग चालू असताना ऋषी कपूर यांच्या कामाचे सर्व युनिट मोठे कौतुक करत असे परंतु राज कपूर प्रत्येक शॉट नंतर ,”कुछ कमी रह गयी तुम्हे और बेहतर करना पडेगा.” असं सांगत होते. ऋषी कपूर प्रत्येक शॉट गणिक आणखी बेहतर शॉट द्यायचा प्रयत्न करत होते. पण प्रत्येक शॉट नंतर राजकपूर त्यांना “कुछ कमी रह गई तुम्हे और बेहतर करना पडेगा.’ असे सांगत होते. शूटिंग पूर्ण झाले. चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला अपेक्षित असे यश काही मिळाले नाही. पण क्रिटिक्स कडून या सिनेमाचे भरपूर कौतुक झाले.एक क्लासिक मूव्ही म्हणून या सिनेमाकडे आज पाहिले जाते. विशेषतः ऋषी कपूरच्या भूमिकेचे सर्वांनी खूपच कौतुक केले. ऋषी कपूरला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.(Raj Kapoor And Rishi)
हा पुरस्कार मिळाल्यानंतर ऋषी कपूर जेव्हा राज कपूर(Raj Kapoor And Rishi) यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी विचारले,” पापा आप मुझे हमेशा ‘कुछ कमी रहे गई’,’ कुछ कमी रह गई ऐसा कहते थे’. अब तो हमे पुरस्कार भी मिल गया. अभी तो प्लीज बतायेगा क्या कमी रह गई थी ? त्यावर राज कपूर यांनी ऋषी कपूर यांना जवळ घेतले. त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि सांगितले,” मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो आणि नाटकातून आणि सिनेमातून काम करायला लागलो, त्यावेळी पृथ्वीराज कपूर कायम मला एक गोष्ट सांगायचे हीच गोष्ट मी आज तुला सांगतो.
========
हे देखील वाचा : ‘डर’ सिनेमातून आमिर खानचा पत्ता कसा काय कट झाला?
========
फार पूर्वी एका गावामध्ये एक डोंबारी राहत असे. आपल्या स्टंट ने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे. दोरीवर चालून दाखवणे, डोळ्यावाट पट्टी बांधून चाकू मारणे , एका पायाने खांबावर चढून दाखवणे. असे जीव घेणे स्टंट करत असे. त्याचा मुलगा त्याला साथ देत असे. ज्या वेळी मुलगा तो डोंबारी खेळ करू लागला. त्या वेळी ‘कुछ कमी रहे गयी और अच्छा करो’ असे सांगितले.. मुलाने काही काळ बापाचा सल्ला ऐकला. पण नंतर बाप मेल्यानंतर तो मुलगा एकटाच डोंबारी खेळ करू लागला. आता तो बापाचा सल्ला पूर्ण विसरून गेला होता. आणि एके दिवशी दोरीवर चालण्याचा स्टंट करताना त्याने दुर्लक्ष केले आणि तो खाली कोसळला आणि जायबंदी झाला.” ही गोष्ट सांगून राजकपूर ऋषी कपूरला म्हणाले(Raj Kapoor And Rishi) ,” मला तुला कधीच जायबंदी होऊ द्यायच नव्हत. म्हणून तू कधीच यशाची हवा डोक्यात घालून घेऊ नकोस. कायम आपल्याला आणखी काही चांगलं करायचं आहे याचा विचार कर. तरच आयुष्यात पुढे जाशील. ‘मेरा नाम जोकर’ च्या वेळी मी तुला मुद्दाम ‘कुछ कमी रह गयी’ हे सांगत होतो याचे कारण हेच होते, की प्रत्येक शॉट गणिक तुझ्या अभिनयात सुधारणा व्हावी . ही सुधारणा कायम होत राहिली पाहिजे आणि कलावंताने कायम विद्यार्थी असले पाहिजे. दुसऱ्याकडून शिकून घेणे स्वतःची प्रगती त्याला करून घेता आली पाहिजे.”राज कपूरचे ते अनुभवी बोल ऋषी कपूरने(Raj Kapoor And Rishi) कायम लक्षात ठेवले आणि त्या मार्गावर तो चालत राहिला.
धनंजय कुलकर्णी