Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Raj And Uddhav Thackeray : “मराठी भाषेचा विजय झालाय”; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
आज संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष एका ऐतिहासिक घटनेकडे लागलं आहे… २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे (Raj Thakeray and Uddhav Thackeray) एकाच मंचावर येणार आहेत… ठाकरे बंधुंच्या या विजयी मेळाव्याला महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.. कार्यकर्त्यांसह या मेळाव्यात मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे… चिन्मयी सुमित, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांनी उपस्थिती लावली होती… जाणून घेऊयात कलाकारांनी काय म्हटलं आहे…

अभिनेते भरत जाधव म्हणाले की,”चुकीची गोष्ट आहे. आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होतोय ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतोय. मराठी माणसाने जगायला हवं. मराठीपणा जपायला हवं. असं नाही की हिंदीच्या विरोधात आहे. पण हिंदी सक्तीची नसावी याच विरोधात आपण होतो.”
तर सिद्धार्थ जाधव म्हणाला की, “या दोन्ही नेत्यांना एकत्र बघणं ही गोष्ट आपल्याला खूप उत्सुक करणार आहे. हा अनुभव आणि ती एनर्जी छान आहे तीच अनुभवण्यासाठी आलोय. याच गोष्टीची वाट बघतोय मराठी माणूस. आज फक्त ऐकायचंय साहेबांना!”

तसेच, अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली की,”मराठीसाठीच आलेलो आहोत आम्ही. मराठी भाषेचा जो विजय झालाय जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलीय त्यासाठी आलो आहोत. जी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे त्यासाठीच आलेलो आहोत. अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसाने एकत्र येणं बाकी. आहे. मराठी मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत.”
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
दरम्यान, सध्या तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव यांचा ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर, भरत जाधव यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटही लवकरच भेटीला येणार आहे…एकीकडे मराठी भाषा जपावी म्हणून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात असताना मराठी चित्रपटसृष्टीही पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करत आहे…(Marathi Entertainment News)