Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!
मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटात मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) म्हणजे आपलं दैवत. आजवर छत्रपतींचा गौरवशाली इतिहास बऱ्याच जणांनी मांडला खरा पण देशभरासह जगभरातही आपल्या महाराजांचा देदीप्यमान इतिहास पोहोचवण्याचा विडा रितेश यांनी उचलला असून राजा शिवाजी चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. (Marathi big budget movie 2025-2026)

स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या ‘जाणता राजा’चं जीवन महाराष्ट्र दिनी मराठीसह पाच अन्य भाषांमध्ये प्रेक्षकांसमोर आणलं जाणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment)
‘राजा शिवाजी’बद्दल आपलं मत मांडताना रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) म्हणाला की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते महाराष्ट्राच्याच नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे. या अलौकिक व्यक्तिमत्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. मला खात्री आहे की, ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनावर तितकीच खोलवर जोडली जाईल, जितके आम्ही जोडले गेलो आहोत.” (Bollywood trending news)
================================
हे देखील वाचा: Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!
=================================
विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’ चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), फरदीन खान, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh), अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी, भाग्यश्री असे दिग्गज कलाकार भव्य ऐतिहासिक चित्रपटाचा भाग होणार आहेत. तर, चित्रपटाचं संगीत अजय-अतुल ही संगीतकार जोडी करणार आहे. देशभरात ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Raja Shivaji movie cast)