
Aamir Khanला दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकची स्क्रिप्ट आवडली नाही?
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Biopic) यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक हिंदीत येणार आहे… विशेष म्हणजे ‘३ इडियट्स’ (3 Idiots movie) चित्रपटानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान या भव्य बायोपिकसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत… या चित्रपटात दादासाहेब फाळकेंची भूमिका स्वत: आमिर खान साकारणार असून सध्या तो या भूमिकेसाठी तयार करत असल्याची व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते… आता चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली असून या बायोपिकची स्क्रिप्ट आमिर खानला आवडली नसल्यामुळे चित्रपट होल्ड केला गेला आहे…(Bollywood news)

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि अभिजात यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट आमिर खानला दाखवली… परतुं, अजूनही लिहिल्या गेलेल्या स्क्रिप्टमध्ये लोकांनी थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पाहावा असा एलिमेंट नसल्याचं मत आमिरने (Aamir Khan) व्यक्त करत पुन्हा कथा लिहिण्यास सांगितली… आमिरला या स्क्रिप्टमध्ये इमोशन्स, ड्रामा आणि कॉमेडी यांचं मिश्रण अपेक्षित होतं… मात्र, तसं न झाल्यामुळे पुन्हा एकदा त्याने हिरानींना स्क्रिप्ट रिराईट करायला सांगितलं आहे.
================================
=================================
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये या चित्रपटाचं शुटींग सुरु होणं अपेक्षित होतं… परंतु, स्क्रिप्टच पुन्हा लिहिली जावी असं प्रमुख अभिनेत्याने सांगितल्यामुळे आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘३ इ़़डियट्स’, ‘पीके’, ‘संजू’ असे सुपरहिट चित्रपट देणारी दिग्दर्शक-लेखकाची जोडी हिरानी आणि अभिजात जोशी दादासाहेब फाळकेंच्या या बायोपिकचं पुढे काय करणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे… तसेच, दुसरीकडे राष्ट्रीय पुरस्कार विजेते एस.एस.राजामौली (SS Rajamouli) देखील फाळकेंवर बायोपिक करणार असून त्यांच्या चित्रपटाचं नाव हे Made In India… आता हे दोन्ही बायोपिक्स आमने-सामने येणार का? आणि कुणाचा चित्रपट वरचढ ठरणार ये येणारा काळच सांगेल… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi