
Rakhi Sawant : महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी म्हणते, “मी गरीब आहे…”
काही दिवसांपूर्वी समय रैनाचा (Samay Raina) वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ यामध्ये रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahabadia) याने केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन वातावरण चांगलंच तापलंय. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर आणि स्टँड-अप कॉमेडीची घसरलेली पायरी युवा पिढीला चुकीच्या दिशेने नेत आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमा प्रकरणी आता महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला (Rakhi Sawant) समन्स बजावले असून २७ फेब्रुवारीला तिला जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत आली असून महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणतेय राखी जाणून घेऊयात…

दरम्यान, सोशल मिडियावर राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात ती म्हणतेय, “मला समन्स बजावण्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्ही मला व्हिडीओ कॉल करा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. मी एक कलाकार आहे. मला पैसे देऊन बोलावलं होतं. मी माझं काम केलं. मी कोणाला शिव्या पण दिल्या नाहीत. त्यामुळे मला समन्स बजावण्यात काही अर्थ नाही.” (Entertainment mix masala)
पुढे राखी सावंत (Rakhi Sawant) असं देखील म्हणाली की, ”प्रलंबित बलात्कार प्रकरणारकडे लक्ष द्या, त्याचा सोक्षमोक्ष लावा. मी गरीब आहे. माझ्याकडे एकही रुपया नाही, जे तुम्हाला देऊ शकेन. खरं सांगते. मी दुबईत राहतेय. माझ्याकडे काहीही कामं नाहीत. मी पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे मला बोलावून तुम्ही काय करणार आहात? काहीच फायदा नाही. रोज मुलींवर बलात्कार होतायत. त्याकडे लक्ष द्या. त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्या, ही माझी विनंती आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी व्हाइट कॉलर आहे. (Sammy Raina)
============
हे देखील वाचा : Rakhi Sawant ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, आदिल दुर्राणी व्हिडिओ लीक प्रकरणी तुरुंगात जावे लागणार!
============
सत्य परिस्थिती पाहता देशात रोज बलात्काराच्या घटना घडत असतात. एकीकडे अशा दुर्दैवी घटना घडत असताना दुसरीकडे मात्र सो कॉल्ड स्टॅंन्डअप कॉमेडियन (Standup Comedian) महिलांवर अश्लील भाषेत विनोद करत असतात. बरं त्यांचे विनोद आता त्या पलिकडे जात थेट आई-वडिलांच्या सेक्सपर्यंत पोहोले आहेत ही अत्यंत शर्मेची बाब. हे वक्तव्य ज्या समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाचे सर्व भाग युट्यूबवरून डिलीट केले आहेत खरे पण यावर सरकारने आणि प्रेक्षकांनाही ठोस पावले उचलत समय रैना, रणवीर अलाहाबादिया सारख्या विचित्र मानसिकता असणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सना बॅन केल्यास विनोदाची, कलेची एक पातळी नक्कीच राखली जाऊ शकेल.