Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं

Ramayana : ए.आर. रेहमान यांच्यासोबत झळकणारे हॉलिवूड संगीतकार हॅन्स झिमर आहेत तरी कोण?
बॉलिवूडमधला पहिला ८३५ कोटींचा भव्य बिग चित्रपट ‘रामायण’ (Ramayana Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे… या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची टॅक्निकल टीम काम करणार असून भारताचे ग्रेट संगीतकार ए.आर.रेहमान (A R Rehman) हॉलिवूड संगीतकार हॅन्स झिमर (Hans Zimmer) यांच्या सोबत रामायण चित्रपटाला संगीत देणार आहेत… जगातील बेस्ट संगीतकार ‘रामायण’ चित्रपटाला संगीत देणार हे समोर आलंच आहे तर आता ऑस्कर विजेते हॅन्स झिमर यांच्याबद्दल जरा माहिती जाणून घेऊयात…(Bollywood News)

आजवर, ‘रामायणा’वर आधारित बऱ्याच कलाकृती केवळ हिंदीच नाही तर इतर भारतीय भाषांमध्ये आल्या… इतकंच नाही तर जगातील बेस्ट अॅनिमेटेड रामायण सीरीज भारत आणि जपान या दोन देशांची एकत्र मिळून तयार केली होती… मात्र, ६०० कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेला आदिपुरूष प्रेक्षकांना निराश करु गेला… त्यामुळे आता नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्या रामायण चित्रपटाकडून कथा मांडणीसोबत व्हिएफएक्स, ग्राफिक्स यांचा वापर आणि संगीत याकडून फारच अपेक्षा आहेत…(Entertainment)

दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटाला संगीत देणाऱ्या हॅन्स झिमर यांनी १९८२च्या ‘मूनलाईटनिंग’ या चित्रपटाद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. जवळपास ४३ वर्ष म्युझिक इंडस्ट्रीत काम करणाऱ्या हॅन्स यांनी ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘ग्लॅडिएटर’, ‘द लायन किंग’, ‘इन्सेप्शन’, ‘ड्यून’, ‘द लास्ट समुराई’, ‘किंग आर्थर’, ‘शेरलॉक होम्स’, ‘कुंग फू पांडा’, ‘इंटरस्टेलर’ आणि ‘इन्फर्नो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरले होते… कोणत्याही चित्रपटासाठी जितकी कथा महत्वाची असते तितकंच पार्श्वसंगीतही फार महत्वाची कामगिरी बजावत असतं… त्यामुळे आता रेहमान आणि झिमर यांची जोडी रामायण चित्रपटात त्यांच्या संगीताने काय जादू दाखवणार आहेत हे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत…(Ramayana Movie News)
हान्स झिमर यांना मिळालेले पुरस्कार :
ऑस्कर पुरस्कार- द लायन किंग
ऑस्कर पुरस्कार- ड्यून
गोल्डन ग्लोब पुरस्कार- द लायन किंग
गोल्डन ग्लोब पुरस्कार- ग्लॅडिएटर
ग्रॅमी पुरस्कार- द डार्क नाइट
ग्रॅमी पुरस्कार- ड्यून २
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
दरम्यान, नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी, रावणाची भूमिका यश, लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे आणि हनुमानाच्या भू्मिकेतसनी देओल दिसणार आहे…(Ramayana movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi