
Ramayana : ८३५ नाही तर ४००० कोटींचं बजेट; हॉलिवूडलाही मागे टाकणार का चित्रपट?
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची… रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणारा रामायण हा बॉलिवूडमधला पहिला बिग बजेट चित्रपट असणार आहे… गेल्या काही काळात रामायण चित्रपटाच्या बजेटबद्दल चर्चा सुरु असताना आधी बजेट ८३५ कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं… मात्र, आता निर्माते नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीमध्ये रामायण चित्रपटाचं बजेट हॉलिवूडलाही मागे टाकेल असं म्हणाले आहेत… जाणून घेऊयात बॉलिवूडच्या ‘रामायण’ चित्रपटाचं बजेट नेमकं आहे तरी किती?

रामायण चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी नुकतीच प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत बजेटबद्दल माहिती दिली आहे… ते म्हणाले की, “आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाही. ६-७ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही चित्रपट बनवायाचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपटाच्या बजेटची जबाबदारी माझ्याकडेच होती. कारण कोणताही भारतीय चित्रपट आत्तापर्यंत इतक्या मोठ्या बजेटमद्ये तयार केला गेला नव्हता… दोन्ही भाग जेव्हा आमचे बनवून होतील तोपर्यंत चित्रपटाचं बजेट ५०० मिलियन डॉलर होईल; जे भारतीय रुपयांमध्ये ४००० कोटी इतकं असेल…. आम्ही जगातला सर्वात मोठा चित्रपट बनवत आहोत असं कितीही म्हटलं तरी हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांच्या तुलनेत हा स्वस्तात होणारा चित्रपट आहे.”
================================
हे देखील वाचा :Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
नमित पुढे म्हणाले की, “रामायण ही आपली संस्कृती आहे ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. यासाठी किती खर्च येतो ही दुय्यम गोष्ट आहे. मला फक्त या महाकाव्यावर चित्रपट बनवून त्याला न्याय द्यायचा आहे. प्रत्येकाला गर्व वाटेल असा हा चित्रपट बनवायचा आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने ‘रामायण’मधील मूल्य आत्मसात करण्याची गरज आहे. आज देश विदेश पातळीवर काय काय घडतंय,युद्धपरिस्थिती पाहता मुलांना फॉरेनमध्ये पाठवण्याचीही भीती वाटत आहे. अशा काळात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी आपली भारतीय संस्कृती खूप काही शिकवून जाते.”
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे दिसणार आहेत… या कलाकारांव्यतिरिक्त ‘रामायण’ चित्रपटात लारा दत्ता, रकूल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, विक्रांत मेस्सी असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत… रामायण चित्रपट हा दोन भागांमध्ये रिलीज होणार असून २०२६ आणि २०२७ मध्ये रिलीज होणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi