Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘Sholay सिनेमाचे शूटिंग चालू असताना कुणी खंडणी मागितली होती?

 ‘Sholay सिनेमाचे शूटिंग चालू असताना कुणी खंडणी मागितली होती?
बात पुरानी बडी सुहानी

‘Sholay सिनेमाचे शूटिंग चालू असताना कुणी खंडणी मागितली होती?

by धनंजय कुलकर्णी 24/06/2025

भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चित सिनेमा ‘शोले’ प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शोले ’ला अभूतपूर्व असे यश मिळाले. या चित्रपटाबाबत आजवर इतकं लिहून आलं आहे, इतकी पुस्तक आले आहेत, इतक्या मुलाखती उपलब्ध आहेत की वाटतं ‘शोले’ हा सिनेमा आज देखील जनमानसात चालूच आहे असे वाटते! या सिनेमा इतकी क्रेझ दुसऱ्या कुठल्या सिनेमाची वाटत नाही. शोले बाबत च्या निरनिराळ्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन बातम्या,किस्से ऐकायला सर्व आतुर असतात. त्यातलाच हा एक किस्सा.

या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे काही खंडणी बहाद्दर पोहचले होते आणि त्यांनी चक्क पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. रमेश सिप्पी यांनी खंडणी बहाद्दरांना पैसे दिले का? का मागितली होती खंडणी? मोठा रोचक किस्सा आहे. हा किस्सा अनुपमा चोप्रा यांच्या ‘मेकिंग ऑफ क्लासिक मूवी शोले’ या पुस्तकात तपशीलवार दिलेला आहे! ‘शोले’ या चित्रपटाचे शूटिंग बेंगलोर जवळच्या रामनगर या गावात झाले होते. तो पर्यंत बॉलीवूड मध्ये जेवढे काही डाकू पट बनले होते; त्या सर्वांचे चित्रीकरण एक तर चंबळच्या खोऱ्यात किंवा राजस्थानमध्ये होत असे. पण सिप्पी यांचे आर्ट डायरेक्टर यांनी कर्नाटक मधील रामनगरची निवड केली.

रामनगरला जाण्यासाठी तेव्हा मुख्य रस्त्यापासून अप्रोच रस्ता देखील नव्हता. सिप्पी यांनी तो करवून घेतला. तिथे एक गावच त्यांनी बसवलं. डोंगराच्या एका बाजूला गाव आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला गब्बरसिंग यांचा अड्डा. दिग्दर्शक रमेश सिप्पी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मलिनी, जया भादुरी बेंगलोरच्या अशोका हॉटेलमध्ये उतरले होते. तर संजीव कुमार, अमजद खान हे कलाकार या बेंगलोरच्या नॅशनल हॉटेलमध्ये उतरले होते. काही कलाकार आणि कृ मेंबर्स यांची राहायची व्यवस्था रामनगर आणि बेंगलोर मधल्या एका हॉटेलमध्ये केली होती. तर काही जर सेटवरच राहत होते. रोज सकाळी ट्रक, बस आणि कारमधून जवळपास २०० लोक सेटवर येत असे. कालांतराने बऱ्याच कृ मेंबर्स ची व्यवस्था सेटवरच करण्यात आली त्यामुळे वेळ वाचू लागला, प्रॉपर्टी चे रक्षण होवू लागले, शूटिंग वेळेत सुरू होऊ लागली.

================================

हे देखील वाचा: Sholay : ‘शोले’ तील सुरमा भोपालीची भूमिका करायला जगदीप का तयार नव्हते?

=================================

शूटिंगच्या ठिकाणी पंधरा-वीस घोडे आणि घोडेस्वार यांची देखील राहायची व्यवस्था केली होती. एकूणच मोठा कुटुंब कबिला रामनगर परिसरात उभा केला होता. २ ऑक्टोबर १९७३ या दिवशी या चित्रपटाची शूटिंग सुरू झाले. परंतु पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे त्या दिवशी काहीही शूटिंग होऊ शकले नाही. ३ ऑक्टोबर १९७३ या दिवशी शोलेचा पहिला शॉट चित्रीत झाला. हा शॉट होता अमिताभ बच्चन जया भादुरीच्या हातामध्ये चाव्या आणून देतो. त्यावेळी असे ठरले होते की जया भादुरी वर चित्रीत जेवढे शॉट असतील तेवढे लवकर शूट करायचे. कारण जया त्यावेळी प्रेग्नेंट होती. ‘शोले’च्या शूटिंग मुळे रामनगर परिसरातील लोकांना देखील पूरक कामे मिळू लागली. चहाची टपरी, रिक्षा, मालवाहतूक, डीझेल आणणे असे अनेक कामे स्थानिकांना मिळाली.त्यांचे व्यवसाय वाढू लागले. आता येऊन मूळ किस्स्याकडे.

एकदा दिग्दर्शक रमेश सिप्पी शूटिंगमध्ये व्यस्त असताना त्यांच्या असिस्टंट ने त्यांना येऊन सांगितले की सेट वरील ऑफिसमध्ये त्यांना भेटायला दोन तरुण आलेले आहेत. सिप्पी यांनी त्यांना थांबायला सांगितले. शूटिंग संध्याकाळपर्यंत चाललं. रमेश सिप्पी यांना वाटलं ते तरुण आता निघून गेले असतील. परंतु त्यांच्या असिस्टंटने सांगितले ते तुम्हाला अद्यापही भेटायला थांबलेले आहेत. सिप्पी यांनी असिस्टंट ला विचारले,” काय काम आहे त्यांचे?” त्यावेळी असिस्टंट म्हणाला,” काम तर माहित नाही. परंतु मराठी कानडी भांडण असं काहीतरी ते बोलत होते.” सिप्पी ताबडतोब त्या तरुणांना भेटायला गेले. त्यातील एक दाढी वाढवलेला एक तरुण गुरगुरत सिप्पी यांना म्हणाला “ तुम्हाला इथे शूटिंग करता येणार नाही. आम्ही मुंबईच्या लोकांना शूटिंगची परवानगी देणार नाही.” सिप्पी यांना खूप आश्चर्य वाटलं कारण शोलेच्या शूटिंगमुळे त्या परिसराला गर्दीच स्वरूप आलं होतं.

तिथल्या अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. तिथल्या छोट्या मोठ्या हॉटेल्स रिक्षा यांना भरभराटीचे दिवस आले होते. असं असताना हे दोन तरुण शूटिंग करू नका असं म्हणून आपल्या पायावर का दगड मारून घेत आहेत? त्यांना कळाले नाही. सिप्पी यांनी तरुणांना विचारलं,” तुमचा विरोध का आहे ?” त्यावेळेला ते म्हणाले ,” मराठी आणि कन्नड भाषा यांच्यातील सीमा वाद तुम्हाला माहीत नाही कां? आम्ही मराठी भाषिक प्रांतातून आलेल्या लोकांना येथे पाउल ठेवू देणार नाहीत. तुम्हाला उद्याच्या उद्या सगळा सेट सोडून जावा लागेल आणि जर उद्या तुम्ही इथन गेला नाही  तर आम्ही दोन अडीचशे लोकांनी इथे घेऊन येऊ आणि तुमच्या सर्व सेटवर आग लावून टाकू तुमची सर्व प्रॉपर्टी जाळून टाकतो. आम्हाला मराठी प्रांतातील लोक इथे नको आहेत!” आतां मात्र सिप्पी थोडे दचकले. सिप्पी काळजीत पडले कारण ‘शोले’ त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याचे व्यवस्थित शूटिंग सुरू झालं होतं दोन अडीचशे लोक तिथे काम करत होते लाखो रुपयांची प्रॉपर्टी होती. त्यावर आता ही धमकी आल्यामुळे ते काळजीत पडले. त्यातील दुसरा तरुण म्हणाला,” ठीक आहे तुम्ही आम्हाला पन्नास हजार रुपये द्या आम्ही काही करत नाही!”

आता मात्र रमेश सिप्पी त्यांचा डाव लक्षात आला. हे काही कन्नड प्रेमी नाहीत. सीमा वादाशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना आपल्याकडून पैसे काढायचे आहे. आणि ५० हजार त्या काळ फार मोठी रक्कम होती. ‘शोले’ सिनेमात एक डायलॉग आहे. गब्बर सिंग सांभाला विचारतो ,” कितना इनाम रखा है सरकारने हम पर?” त्यावर सांबा उत्तर देतो,” सरदार पुरे पचास हजार!” या रकमेला त्या काळात फार मोठी किंमत होती. सिप्पी काही न बोलता निघून गेले. रात्री उशिरापर्यंत ते तरुण तिथेच थांबले होते. नंतर त्यांनी सांगितलं जाऊ द्या पंचवीस हजार देवून प्रश्न मिटवून टाका. पण सिप्पी यांनी काहीच प्रतिसाद दिल्यामुळे न दिल्याने ते निघून गेले दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले आणि “दहा हजार रुपये तरी द्या” अशी मागणी करू लागले. आता मात्र सिप्पी यांनी ओळखलं. हे कुठले तरी भुरटे चोर आहेत आणि आपल्याकडून काही ना काही पैसे काढणार आहेत. सरळ सिप्पी बेंगलोरला जाऊन तिथल्या पोलीस कमिशनरला जाऊन भेटले. पोलीस कमिशनरने त्यांना शांत केले आणि सांगितले की,” तुम्ही त्यांना जर पैसे दिले तर उद्या शेकडो भुरटे लोक तुमच्याकडे येऊन पैसे मागू लागतील.” त्यावर सिप्पी म्हणाले ,” मग मी आता काय करू?” कमिशनर साहेब म्हणाले ,” काळजी करू नका त्यांना पैसे द्या. त्या नोटांवर काहीतरी खुणा करून ठेवा. ज्यावेळी ते खंडणी खोर पैसे घेतील आमचे साध्या वेषांतील पोलीस त्यांना पकडतील.

================================

हे देखील वाचा: minerva : मिनर्व्हा म्हटलं की शोले आणि शोले म्हटलं की मिनर्व्हा…

=================================

सिप्पीनी दुसऱ्या दिवशी त्या दोघांना पैसे घ्यायला सांगितले. त्यांना पैसे दिले पण त्या सर्व पैशांवर त्यांनी विशिष्ट सही करून ठेवली होती. त्या दोघांच्या हातात पैसे पडल्यानंतर ते जाऊ लागले पण त्याच वेळी साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना झडप मारून पकडले आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली! रमेश सिप्पी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसानंतर ग्रामीण भागातील काही स्त्रिया आणि पुरुष रडत रडत आले आणि म्हणाले,” ती आमची मुले आहेत. त्यांना सोडून द्या. त्यांनी काही पैसे मिळावे म्हणून हा गुन्हा केला आहे. पण ते गुन्हेगार नाहीत त्यांना जर तुरुंगात टाकले तर आमच्या भविष्याचे काय?” सिप्पी पुन्हा कमिशनर साहेबांना भेटले. कमिशनर साहेबांनी त्यांचे रेकॉर्ड चेक केले. कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड त्यांच्या नावावर नव्हते. सिप्पी यांनी केस मागे घेतली आणि त्या दोन खंडणी बहादूराची सुटका झाली.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan amjed khan Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News classsic movies Dharmendra Entertainment Hema Malini jaya bachchan sanjeev kapoor sholay iconic movie sholay movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.