Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Shah Rukh Khan : १९ वर्षांनी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा किंग खानसोबत झळकणार!
जुन्या कलाकारांचं आता केवळ पुरस्कार सोहळ्यांमध्ये नव्हे तर चित्रपटांमध्ये रियुनियन होताना दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कॅमिओची पद्धत आहे. आता तब्बल १९ वर्षांनंतर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘किंग’ (King movie) चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या ‘किंग’ चित्रपटाची तुफान चर्चा असून सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे. शाहरुखच्या किंगमध्ये कोणती अभिनेत्री दिसणार आहे जाणून घेऊयात..(Bollywood)

तर, गेले अनेक वर्ष बहुतांशी रोमॅंटिक भूमिका साकारणारा शाहरुख खान ‘जवान’, ‘पठाण’ चित्रपटात निराळी भूमिका साकारताना दिसला होता. आता किंग चित्रपटाच्या बाबतीतही तसंच असून शाहरुख हटके भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत १९ वर्षांनी राणी मुखर्जी (Rani Mukherjee) झळकणार आहे. २००६ साली ‘कभी अलविदा ना कहना’ (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता १९ वर्षांनी पुन्हा शाहरुख राणीची जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या गाजल्या त्यातील शाहरुख आणि राणीची देखील जोडी नक्कीच होती. (entertainment news)

खरं तर, ‘किंग’ हा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपटच आहे. दीपिका पादूकोण, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी असे ग्रेट कलाकार यात दिसणार आहेत. आता याच पंगतीत राणी मुखर्जी दिसणार असून ९०च्या दशकातील प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुना काळ अनुभवला येईल असं म्हटल्यास हरकत नाही. दरम्यान, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी १९९८ मध्ये आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. ‘कभी खुशी कभी गम’, ‘चलते चलते’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘पहेली’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. (Rani Mukherjee Movies)
================================
=================================
दरम्यान, ‘किंग’ हा पहिला चित्रपट नसून यापूर्वी देखील शाहरुख आणि राणी यांनी एकत्र किंवा एकमेकांच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केले आहेत. यात ‘हे राम’ या चित्रपटात दोघांनीही कॅमिओ केला होता. याशिवाय ‘ओम शांती ओम’, ‘कल हो ना हो’ या चित्रपटांत राणी दिसली होती. तर राणी मुखर्जीच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’,’साथीया’ चित्रपटांमध्ये शाहरुखने कॅमिओ केला होता.(Bollywood masala)