“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Rashmika Mandanna- Vijay Deverakonda यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण झालं पक्कं!
२०२५ मध्ये मराठीसह बॉलिवूड, टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांची लग्न झाली… तर काहींनी आपल्या नात्याची कबूली दिली… अशातच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतल्याचं सांगितलं जात होतं… अद्याप त्यांनी सोशल मिडियावर अधिकृतपणे कुठलेही फोटो शेअर केले नाहीत… परंतु, काही पब्लिक इव्हेंट्समध्ये दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी आता त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब केला आहे… अशातच आता २०२६ मध्ये रश्मिका आणि विजय लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर येत असून तारीख आणि ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात… (South Indian Film Industry)
दरम्यान, रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो कुठल्याही सोशल मिडियावर शेअर जरी केले नसले तरी दोघांच्या हातातील अंगठ्या पाहून साखरपुडा झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. आणि आता जवळच्या एका सूत्रानं त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणही सांगितलं आहे… हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, “विजय आणि रश्मिकाचं लग्न २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमधील राजवाड्यात होणार आहे. त्यांनी लग्नासाठी तिथल्या एका ऐतिहासिक (हेरिटेज) प्रॉपर्टीची निवड केली असून साखरपुड्याप्रमाणेच लग्नही अत्यंत खासगी पद्धतीनं करण्याचा त्यांचा विचार आहे. या सोहळ्याला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रच उपस्थित असतील. (Entertainment News)

आता वळूयात दोघांच्या कामाकडे… रश्मिका मंदाना हिचा ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला… या चित्रपटानंतर रश्मिका ‘Animal Park’, ‘कॉकटेल २’ (Cocktail 2) अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे… तर, विजय देवरकोंडा याचाकिंगडम हा चित्रपट या वर्षी रिलीज झाला होता… आणि २०२६ मध्ये त्याचा ‘राऊडी जनार्दन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… आत्तापर्यंत रश्मिका आणि विजयने ‘डिअर कॉमरेड’, ‘गीथा गोविंदम’, ‘किंगडम’ अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते…
================================
================================
काही महिन्यांपूर्वी रश्मिकानं तिच्या ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काहीअंशी त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांना दुजोरा दिला होता… आणि आता विजयनं रश्मिकाच्या हातावर किस केल्याच्या व्हिडिओमुळे हे आता फिक्स झालं आहे… त्यामुळे आता विजय आणि रश्मिकाचे चाहते आतुरतेने दोघांच्या लग्नाचे तरी फोटो लवकरात लवकर समोर येतील याची आतुरतेने वाट पाहात आहेत….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi