ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
रवींद्र जैन यांचे पहिले सुपरहिट गाणे!
थोर प्रतिभावान संगीतकार रवींद्र जैन (Ravindra jain) यांना जन्मतःच अंधत्व असून देखील डोळस व्यक्तीला लाजवेल इतकी सुंदर गाणी त्यांनी लिहिली (आठवा, खुला खुला गगन ये हरीभरी धरती जितना भी देखू तबियत नही भरती…) आणि त्याला संगीत पण दिले. राजश्री प्रोडक्शनच्या ‘सौदागर’ या चित्रपटापासून त्यांना खरी ओळख मिळाली पण लोकप्रिय चित्रपटातील त्यांचा पहिला सिनेमा होता ‘चोर मचाये शोर’. हे दोन्ही सिनेमे त्यावेळेस फ्लोअर वर होते. ‘चोर मचाये शोर’ या चित्रपटातील पहिल्याच गाण्याने रवींद्र जैन (Ravindra jain) यांना खूप दमवले होते. त्यामागे नेमकं कारण काय होतं ?
तर त्यांनी तयार केलेली धून एक तर निर्मात्याला आवडत नव्हती किंवा अभिनेता शशी कपूरला आवडत नव्हती. त्यामुळे ते खूप वैतागले होते शेवटी ते निर्मात्याला म्हणाले, “मी हा चित्रपटाचा सोडून जातो मला काही या गाण्याला काही चाल लावता येत नाही.” पण निर्माते सिप्पी म्हणाले ,”तसं काही नाही. तुम्ही आणखी प्रयत्न करा.” नंतर मात्र चमत्कार घडला. त्यांनी लावलेली ती चाल इतकी सुपरहिट झाली की तो सिनेमा त्या गाण्यामुळे सुपर डुपर हिट ठरला. एवढच नाही तर या गाण्यातील शब्द घेऊन पुढे तीस वर्षांनी आदित्य चोप्रा यांनी एक चित्रपट बनवला आणि तो सिनेमा गेली २८ वर्ष एकाच थिएटरमध्ये मुंबईला चालू आहे! (Ravindra jain)
आता तुमच्या सर्व प्रकार लक्षात आला असेल. रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी स्वरबध्द केलेला हा चित्रपट होता १९७४ साली प्रदर्शित झालेला ‘चोर मचाये शोर’ आणि ते गाणं होतं ‘ले जायेंगे ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ मग रवींद्र जैन (Ravindra jain) एवढे का वैतागले होते? हा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. रवींद्र जैन यांनी संगीत प्रभाकर ही पदवी प्राप्त केल्यानंतर नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईला आले. अंधत्व असूनदेखील त्यांना आपल्या कर्तृत्वावर मोठा विश्वास होता. सुरुवातीला त्यांना नौशाद यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करायची संधी मिळाली पण लवकरच त्यांनी स्वतंत्र संगीत द्यायला सुरुवात केली.
त्यांना पहिला चित्रपट मिळाला एन.एन.सिप्पी यांचा ‘सिलसिला है प्यार का’ पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झालाच नाही. परंतु या सिनेमाच्या सीटिंगच्या वेळी रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी एन.एन.सिप्पी यांना भरपूर चाली ऐकवून दाखवत होते. आणि सिप्पी त्यांना आवडलेली चाल दहा रुपयात बुक करत होते ते नोटेशन्स त्यांच्याकडून लिहून घेत. याच काळात रवींद्र जैन यांना पहिला चित्रपट मिळाला ‘काच और हिरा’ पण हा चित्रपट काहीच चालला नाही. त्यामुळे त्यांचा स्ट्रगल चालूच होता.
राजश्री प्रोडक्शनचा ‘सौदागर’ याच वेळेला मिळाला आणि त्याच वेळी त्यांना मिळाला ‘चोर मचाये शोर’ हा चित्रपट. ‘चोर मचाये शोर’ चे निर्माते होते एन.एन. सिप्पी. या चित्रपटाची गाणी इंद्रजितसिंग तुलसी आणि जैन यांनी लिहिली होती. त्यातील पहिलंच गाणं स्वरबद्ध करताना रवींद्र जैन (Ravindra jain) मात्र खूपच वैतागले. हे गाणं इंद्रजितसिंग तुलसी यांनी लिहिलं होतं. कारण या गाण्याला बनवलेली चाल कधी सिप्पी यांना आवडत नव्हती, तर कधी दिग्दर्शक अशोक रॉय यांना आवडत नव्हती तर कधी चित्रपटाचा नायक शशी कपूर यांना ! (Ravindra jain)
तब्बल आठ दिवस रवींद्र जैन (Ravindra jain) झगडत होते. शेवटी ते वैतागले आणि सिप्पी यांना म्हणाले, “ही माझी शेवटची चाल. ही जर चाल तुम्हाला आवडली नाही तर मी हा चित्रपटच सोडून देतो. मला काही या गाण्याला चाल देणं शक्य नाही!” असं म्हणून त्यांनी आपली शेवटची चाल ऐकवली आणि चमत्कारच झाला. ती सिप्पींना प्रचंड आवडली आणि ते म्हणाले “हीच तर पाहिजे होती!” सिप्पी म्हणाले, “लगेच हे गाणं रेकॉर्ड करून टाका.”अशा पद्धतीने किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं. या चित्रपटातील इतर गाणी देखील प्रचंड गाजली. (Ravindra jain)
================
हे देखील वाचा : ‘तेरा मेरा साथ रहे…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा !
================
१८ मार्च १९७४ या ऐन लग्नाच्या दिवसात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रवींद्र जैन (Ravindra jain) यांच्यासाठी पॉप्युलर सिनेमाची दारंसुद्धा उघडी झाली. त्या गाण्याने रवींद्र जैन यांना आठ दिवस चांगलेच सतावले. ‘ले जायेंगे ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ हे गाणं आजदेखील लोकप्रिय आहे आणि याच गाण्याच्या पहिल्या ओळीतील काही शब्द घेऊन आदित्य चोप्रा यांनी १९९६ साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट बनवला.जो आजदेखील मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये गेली अठ्ठावीस वर्ष अखंड चालू आहे! (Ravindra jain)