Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Dilip Prabhavalkar : गुढ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर

Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा

Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता… 

 जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता… 
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता… 

by धनंजय कुलकर्णी 29/04/2022

अभिनेत्री रेखाचे (Rekha) बॉलिवूडमधील आगमन खूप वादळी ठरले. बालकलाकार म्हणून ती १९६६ साली (बेबी भानुरेखा या नावाने) ‘रंगुला रतनाम’ या तेलुगू चित्रपटात चमकली. त्यावेळी ती १२ वर्षांची होती. (जन्म १० ऑक्टोबर १९५४). तिचे वडील जेमिनी गणेशन आणि आई पुष्पावल्ली हे दोघेही तमिळ सिनेसृष्टीत कार्यरत होतेच. त्यामुळे ती सिनेमात येणं क्रमप्राप्तच होतं.

१९६९ साली कन्नड सुपरस्टार राजकुमार सोबत ती नायिका म्हणून ‘ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सी आय डी ९९९’ या सिनेमातून प्रेक्षकांपुढे आली. याच वर्षी तिला एका हिंदी सिनेमा मिळाला. कुलजित पाल दिग्दर्शित ’अंजाना सफर’ या तिच्या पहिल्या सिनेमाचा नायक होता विश्वजित. 

=====

कलाकृती मिडियाचे युट्यूब चॅनेल फॉलो करा: कलाकृती मीडिया युट्यूब

=====

या चित्रपटात या दोघांचे एक प्रदिर्घ चुंबन दृष्य होते. रेखाचा (Rekha) पहिलाच सिनेमा होता. तिला काहीच कळाले नाही. दिग्दर्शक काही ‘कट’ म्हणत नव्हता. संपूर्ण पाच मिनिटांचा तो ‘लीपलॉक’ कीस ठरला. रेखा खूप नर्व्हस झाली. तिच्या अलीकडे आलेल्या एका पुस्तकात तिने या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. “त्या माझ्यासाठी खूप ‘पेनफुल मेमरीज’ आहेत”, असं तिनं म्हटलं. रेखाचा हा पहिलाच सिनेमा असल्याने ही मोठी ब्रेकींग न्यूज ठरली.

 

त्यांचं हे छायाचित्र आजच्या भाषेत सांगायचे, तर इतके व्हायलंट झाले की, ते जगप्रसिध्द ’लाईफ’ मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकलं. यावर वर ताण करत या मासिकाने त्याकाळी आलेल्या खोसला कमिटीच्या रिपोर्टचा आधार घेत, “kissing or nudity can’t be banned unless a court of law judges it obscene.”अशी मल्ल्लीनाथी केली. 

जाहिरातीच्या दुनियेत ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’, असं म्हणतात. पण हा स्टंट करण्यात रेखाचा (Rekha) खरोखरच काहीही सहभाग नसताना, तिचा एकही सिनेमा झळकलेला नसताना तिच्या मागे निर्मात्यांच्या रांगा लागल्या. रेखाची त्या काळची देहयष्टी आणि मिडीयात तयार झालेली इमेज बघून तिच्याकडे अभिनेत्री म्हणून न पाहता एक ‘सेलेबल आयटम’ म्हणूनच पाहिलं जाऊ लागलं. 

तिचा हा पहिला सिनेमा पुढे यातील गरमा गरम दृष्यांमुळे सेन्सारच्या कात्रीत अडकला. तोवर तिच्या इतर सिनेमांचे शूट सुरू झाले होते. मोहन सैगल यांनी तिला ‘सावन भादो’ या सिनेमात घेतले. यात तिचा नायक नवीन निश्चल होता. त्याचाही हा पहिलाच सिनेमा होता. यात तिने साकारलेली ‘व्हीलेज गर्ल’ आणि तिच्या टंच अदेने खळबळ उडवून गेली. सोनिक ओमी यांनी स्वरबध्द केलेली ‘कानोंमे झुमका, चाल में ठुमका कमर पे चोटी लटके’ ’सुन सुन ओ गुलाबी कली’ अशी वर्मा मालिक यांची गाणी खूप गाजली.

सावन भादो

१९७० साली आलेल्या या सिनेमातून रेखाचे (Rekha) अधिकृत पदार्पण झाले. पण तिच्या या इमेजने तिला सिरीयसली कधी कुणी घेतलंच नाही. ऐलान, डबल क्रॉस, एक बेचारा, गोरा और काला या सिनेमात तिला अभिनयाला वावच नव्हता. ऋशिदांच्या ‘नमक हराम’ मध्ये ती होती. पण सर्व फोकस राजेश – अमिताभ वर होता. सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिचे सिनेमे येत होते, पण तिची स्वत:ची अशी ओळख निर्माण होईल असा सिनेमा यायचा होता.

१९७८ साली गुलजार यांचा ’घर’ हा सिनेमा आला आणि तिच्यातील अभिनेत्रीला पहिल्यांदा रसिकांपुढे आणले गेले. तिच्यातील अभिनेत्रीचा खरा शोध आणि कस पुढे ऋशिकेश मुखर्जीं यांचा १९८० सालच्या ’खूबसूरत’ सिनेमामध्ये लागला. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या ’उमराव जान’ या सिनेमाकरीता रेखाला (Rekha) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सावन भादो ते उमराव जान हा तिचा दशकभराचा आलेख जबरदस्त होता. 
=======

हे देखील वाचा – शशी कपूरने अमिताभ बच्चन यांची त्याच्या सिनेमातील भूमिका का ‘डिलीट’ केली?

=======

या सार्‍या गदारोळात तिचा विश्वजित सोबतचा पहिला सिनेमा ‘अंजाना सफर’ १९७९ साली तब्बल दहा वर्षांनी प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डाने अनेक बदल सुचविल्याने तो सिनेमा रखडला आणि ’दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला आणि आठवड्याभरात थिएटर वरून काढावा लागला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment rekha
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.