‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सस्पेन्स म्युझिकल हिट ‘बीस साल बाद’ आठवतो का?
आपल्याकडे हॉरर फिल्मचा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे. बॉलिवूडच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा प्रत्येक दशकामध्ये हॉरर फिल्मची स्टाईल बदलत जाताना दिसते. पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये हॉरर फिल्म या म्युझिकली हिट फिल्म असायच्या. यामध्ये हंटिंग मेलोडीजची काही गाणी असायची. अशा हॉरर चित्रपटांचा बाप म्हणता येईल तो १९५० सालचा ‘महल’ या सिनेमाचे दिग्दर्शन कमाल अमरोही यांनी केले होते. यानंतर काही सिनेमे येतच होते. पण ज्या सिनेमाला खऱ्या अर्थाने मोठं यश मिळालं तो चित्रपट १९६२ साली आला होता. या सिनेमाचं नाव होतं ‘बीस साल बाद’.(Bees Saal Baad)
हा चित्रपट Sir Arthur Conan Doyle’s The Hound of the Baskervilles या विख्यात कलाकृतीवर अधारीत होता. याच साहित्यावर हेमेंद्र कुमार रॉय ‘निशिथीनी बिविशिका‘ हि कादंबरी लिहिली होती. या कादंबरी यांनी १९५१ साली अजोय कार ‘जिंघासा’ हा बंगाली सिनेमा बनवला होता. गायक आणि संगीतकार हेमंत कुमार मुखर्जी हे ‘बीस साल बाद’(Bees Saal Baad) या चित्रपटाचे निर्माते होते तर बिरेन नाग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. बिरेन नाग यांचा हा दिग्दर्शनातील पहिलाच प्रयत्न होता.
यापूर्वी ते कला दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये फेमस होते. प्यासा, चौदहवी का चांद, नौ दो ग्यारह, काला पानी, तेरे घर के सामने ,साहब बीबी और गुलाम हे त्यांचे गाजलेले कला दिग्दर्शन केलेले चित्रपट. ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटासाठी तर त्यांना बेस्ट आर्ट डायरेक्टरचं फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं होतं. हे अवॉर्ड यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण या अवॉर्डच्या वेळी त्यांचा मुकाबला ‘मुगल-ए- आजम’ या मेगा स्केलवर बनलेल्या चित्रपटाशी होता. या सिनेमाला टक्कर देत बिरेन नाग यांनी चौधरी का या चित्रपटासाठी बेस्ट आर्ट डायरेक्टर चे फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले होते.
‘बीस साल बाद’ या चित्रपटात विश्वजीत आणि वहीदा रहमान ही जोडी होती. चित्रपट कृष्णधवल होता. १९६२ सालचा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता. या सिनेमातली गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती. यातील सर्वच गाणी प्रचंड गाजली. विशेषत: लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘कही दीप जले कही दिल’ हे हंटिंग मेलडी सॉग प्रचंड लोकप्रिय ठरले. या चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेली दोन गाणी ‘जरा नजरो से कह दो जी निशाना चूक ना जाये’ आणि ‘बेकरार करके हमे यूं न जाइये आपको हमारी कसम लौट आईये’ प्रचंड लोकप्रिय ठरले. लताच्या स्वरातील ‘सपने सुहाने लडक पन के मेरे दिल में ’ या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमात विश्वजीत, वहिदा रहमान, मन मोहन कृष्ण, मदनपुरी, सज्जन,असित सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटाला फिल्मफेअरची सात नामांकन मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट गीतकार शकील बदायुनी यांना ‘कही दीप जले काही दिल’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचे पारितोषिक मिळाले. तसेच याच गाण्यासाठी लता मंगेशकर यांना सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट संकलकाचा पुरस्कार केशव नंदा यांना मिळाला तर सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनचा पुरस्कार एस वाय पाठक यांना मिळाला. १९६२ साली प्रदर्शित झालेला हा सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘बीस साल बाद’(Bees Saal Baad) पुढे अनेक वर्षे रिपीट रनला प्रदर्शित होत असे.
=======
हे देखील वाचा : हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
=======
सत्तरच्या दशकामध्ये मॅटिनी शोचे मोठे प्रस्थ होते. या काळात जुने सदाबहार चित्रपट पुन्हा एकदा मॅटिनी शोमध्ये प्रदर्शित होत असत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बिजनेस करत. ‘बीस साल बाद’(Bees Saal Baad) हा चित्रपट असाच वारंवार रिपीट रनला प्रदर्शित होऊन चांगला व्यवसाय करत असे. अभिनेता विश्वजीतचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश बंगाली चित्रपटातून झाला होता. बंगाली सुपरस्टार उत्तमकुमारसोबतचे विश्वजीतचे पहिले दोन्ही बंगाली चित्रपट प्रचंड यशस्वी झाले होते. खरंतर या ‘बीस साल बाद’ चित्रपटाचा नायक आधी उत्तमकुमारच होता पण त्याने नकार दिल्यावर विश्वजीत आला.
विश्वजीतचा हा पहिला हिट हिंदी सिनेमा होता. याच सुपरहिट सिनेमाची संपूर्ण टीम घेऊन बिरेन नाग यांनी १९६४ साली ‘कोहरा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला ही देखील एक जबरा सस्पेन्स मूवी होती. ऑलफ्रेड हीचकॉक यांच्या ‘रिबेका’ या चित्रपटावर ‘कोहरा’चे कथानक बेतले होते. या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर मात्र बिरेन नाग यांचे आकस्मित निधन झाले केवळ दोन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आणि दोन्ही सिनेमाला चांगले यश मिळाले!(Bees Saal Baad)